CET /Bsc Nursing CET परीक्षेचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी CET CELL कडून महत्वाची नोटीस.
महाराष्ट्र राज्यातील ज्या विध्यार्थ्यांनी महाराष्ट्र CET चा फॉर्म ( PCB Group /PCM Group/ Bsc Nursing ) भरला आहे अशा विध्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र CET CELL कडून दिनांक -03/04/2024 रोजी परीक्षेच्या दृष्टीकोनातून एक अत्यंत महत्वाची Notice प्रकाशित केली आहे.
CET CELL या वर्षीच्या वेगवेगळ्या CET Exam च्या तारखा आधीच जाहीर केलेल्या आहेत. आता परीक्षेदरम्यान विध्यार्थ्याला एखाद्या प्रश्नावर आक्षेप असेल तर तो नोंदवण्याची संधी CET CELL कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर नोटीस मध्ये CET CELL 2 प्रश्नांच्या रूपात आक्षेप नोंदीचे उत्तर दिलेले आहेत ते प्रश्न आणि CET CELL चे उत्तर समजावून घेऊ
प्रश्न क्रमांक -1) जर परीक्षा झाल्यानंतर एखाद्या विध्यार्थ्यांनी प्रश्न पत्रिकेतल्या एखाद्या प्रश्नावर आक्षेप घेतला आणि तो आक्षेप CET CELL ची आक्षेप नोंदणी फीस भरून नोंदवला आणि विध्यार्थ्याचा आक्षेप योग्य असेल तर त्याने आक्षेप नोंदी साठी जी फीस भरली ती विध्यार्थ्याला परत मिळेल का?
CET CELL चे उत्तर – आक्षेप नोंदीची फी ही non refundable आहे, ती परत मिळणार नाही. परंतु नोंदवलेला आक्षेप योग्य असेल तर त्या प्रश्ना संदर्भातला संपूर्ण फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना समान मिळेल.
प्रश्न क्रमांक -2) जर आक्षेप बरोबर असेल तर त्याचा फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना मिळेल की ज्यांनी आक्षेप नोंदणी फीस भरून आक्षेप नोंदवला अशाच विध्यार्थ्यांना मिळेल?
CET CELL चे उत्तर- जर आक्षेप बरोबर असेल तर त्या प्रश्ना संदर्भातला फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना मिळेल.
CET CELL ची Notice पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –