राज्यातील (Veterinary) प्रवेश प्रक्रिये बदल विस्तृत माहिती.
बारावी सायन्स (PCB Group) नंतर कोणते करिअर निवडायचे हा विद्यार्थी व पालकांसाठी मोठा प्रश्न असतो, कारण १२ वी नंतर निवडलेले क्षेत्र हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते.त्यादृष्टीने पशुवैद्यकीय (Veterinary) हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
आपण जेव्हा Veterinary विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर साधारणत: एक प्रतिमा येते ती म्हणजे जनावरांचा डॉक्टर, परंतु या क्षेत्राची व्याप्ती त्याहीपेक्षा खूप जास्त आहे.
Veterinary केल्यानंतर गोपालन, शेळी- मेंढी पालन आणि कुक्कुटपालन याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे हे एक विस्तृत शास्त्र आहे. पदवीधरांना सरकारी खाते,सहकार खाते, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीसह व्यवसायाच्या ही अनेक संधी उपलब्ध आहेत.
ही पदवी ५.५ वर्षांची आहे आणि यात पहिली ४.५ वर्षे महाविद्यालयीन अभ्यासक्रम असतो. यात क्लासरूम टीचिंग, थेअरी व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके यांचा समावेश होतो. या ४.५ वर्षे कालावधीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एकूण १८ विषय शिकवले जातात.
शेवटचा १ वर्ष इंटर्नशिप कालावधी असतो, यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर प्रक्षेत्रावर अनुभवासाठी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. ५.५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSc &AH ही पदवी प्रदान करण्यात येते.
महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया
१) महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. विदर्भात नागपूर, कोकण विभागातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील शिरवळ, मराठवाडा विभागात परभणी आणि उदगीर या महाविद्यालयांचा सामावेश आहे.
२) Veterinary पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता १२ विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागते.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व इंग्रजी यामध्ये एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही टक्केवारी ४७.५० टक्के एवढी आहे.
३) प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणवत्तेनुसार न होता राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) या परीक्षेच्या आधारावर होते. NEET मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित होतो. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) जाऊन माहिती मिळवणे आवश्यक असते कारण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असते.
Veterinary प्रवेश प्रक्रिया नेमकी चालते कशी विस्तृत Video स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-
2023 चा राज्यातील Veterinary Colleges 3rd ROUND चा कॅटेगरी नुसार कट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-