NEET 2024 परीक्षेसंदर्भातील कोणते Documents Save करणे आवश्यक आहे ?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागद पत्रा बरोबरच NTA कडून नव्याने उपलब्ध झालेले काही Documents विद्यार्थ्यांना Admission process साठी पुन्हा अत्यंत गरजेचे आहे. ते विद्यार्थ्यानी व्यवस्थित save करून ठेवणे आणि जतन करणे आवश्यक आहेत.
1) NEET Application फॉर्म –
NEET रेजिस्ट्रेशन complete झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या mail id वर NTA (National Testing Agency) कडून विद्यार्थ्यांचा NEET application फॉर्म mail केला जातो. किंवा पुंर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यानी pdf डाउनलोड केलेली असेल तर त्या application फॉर्म ची किमान 1 कलर print विद्यार्थ्यानी जतन करून ठेवावी.
2) NEET Admit कार्ड –
पुढील Admission process साठी विद्यार्थ्याचे Admit कार्ड हे अत्यंत महत्वाचे document आहे. विद्यार्थ्यानी आपल्या Admit कार्ड च्या किमान 2-3 print काढून जतन करून ठेवाव्यात तसेच mail मध्ये आपले admit कार्ड जतन करून ठेवावे.
अगदी काही दिवसामध्ये NTA कडून Admit कार्ड लिंक काढून टाकण्यात येते त्यामुळे आपल्याला अगोदरच आपले admit कार्ड save करणे गरजेचे आहे.
3) आपला Email Id आणि Mobile नंबर –
NEET application फॉर्म भरताना विद्यार्थ्यानी जो mobile नंबर आणि Email id दिलेला आहे तो नंबर आणि Email id पुढील Admission process साठी विशेषतः ऑल इंडिया कोटा प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण ऑल इंडिया कोटा रेजिस्ट्रेशन करताना यावर OTP पाठवल्या जातो. OTP enter केल्याशिवाय आपला फॉर्म पुढे Proceed होतं नाही. त्यामुळे NEET Application फॉर्म भरताना आपण जो मोबाईल नंबर आणि Email id दिलेला आहे तो संपूर्ण process होईपर्यंत चालू असणे अत्यंत गरजेचे आहे.