ज्या विद्यार्थ्यानी कर्नाटक साठी रेजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची नोटीस

ज्या विद्यार्थ्यानी कर्नाटक साठी रेजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची नोटीस

By ANKUSH PATIL 15 May 2024

Share this News

ज्या विद्यार्थ्यानी कर्नाटक रेजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना 12 वीचे मार्क्स भरण्यासाठी वेबसाईट पुन्हा सुरु

कर्नाटक other state open कोटा फॉर MBBS/BDS/BAMS रेजिस्ट्रेशन 2024 CBSE किंवा State बोर्ड परीक्षेचा निकाल येण्याअगोदरच सुरु झाले होते त्यामुळे तेंव्हा ते रेजिस्ट्रेशन 10 विच्या मार्क्स च्या आधारावर झालेले होते परंतु आता CBSE बोर्ड चा 12 विचा निकाल आल्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा login करून आपल्या फॉर्म मध्ये 12वीचे Details भरण्यासाठी 14/05/2024 पासून 20/05/2024 पर्यंत पोर्टल ओपन होणार आहे.

त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यानी या अगोदर कर्नाटक रेजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यानी कर्नाटक website वर जाऊन आपले 12 वीचे details भरायचे आहे.

2024 मध्ये महाराष्ट्र State बोर्ड (MAHARASHTRA STATE BOARD) मधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून बाकी आहे त्यांनी Result येईपर्यंत वाट पाहावी.

ज्या विद्यार्थ्याची 12वी 2024 च्या अगोदर झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 12वीचे details भरावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

Migration सर्टिफिकेट बदल संपूर्ण माहिती

migration certificate

online migration certificate

राज्यभरातील संपूर्ण बोर्डचे बारावीचे निकाल लागलेले आहेत. थोड्याच दिवसात NEET 2024 चा निकाल सुद्धा जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक्ष Admission Process ला सुरुवात होईल. Admission Process साठी वेगवेगळ्या प्रकारची Documents ची आवश्यकता असते.

Migration Certificate हे असेच एक महत्वाचे Document. ह्या विषयी आपण माहिती घेऊयात.

जर महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश (Admission) महाराष्ट्रराज्याच्या बाहेर झाले तर अशा विद्यार्थ्याला Admission च्या वेळी Migration सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.

2024 ला बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतरच migration साठी अर्ज करावा.

Migration सर्टिफिकेट कुठून मिळवावे ? (How to Apply Migration Certificate)

Migration सर्टिफिकेट हे HSC बोर्डा मार्फत दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांची 12वी महाराष्ट्र State बोर्ड मधून झाली असेल अशा विद्यार्थ्यांना migration Certificate ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात मिळते.

1) ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या HSC बोर्डाच्या विभागीय कार्यालयात (पुणे/लातूर/नागपूर/मुंबई/संभाजीनगर/अमरावती/नाशिक/कोकण इ ) बारावी मार्कशीट ची ओरिजिनल कॉपी आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन स्वतः विद्यार्थी जाऊन अर्ज करू शकतात.

2) ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी-

ऑनलाईन पद्धतीने Migration मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून योग्य ती माहिती भरून 12वी चे ओरिजिनल मार्कशीट pdf व ओरीजिनल शाळा सोडल्याच्या दाखल्याची pdf अपलोड करून, ऑनलाईन payment करावे. व payment केल्याची पावती पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी.

Migration Certificate चे नमुने खालील प्रमाणे आहेत. (प्रत्येक विभागाचा नमुना वेगवेगळा असू शकतो)

नोट – 1) CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना migration सर्टिफिकेट हे कॉलेज मधूनच मार्कशीट बरोबर दिले जाते.

2) जर तुम्ही अगोदरच एखाद्या बॅचलर कोर्स ला प्रवेश घेतला असेल आणि NEET exam दिली असेल तर तुमचे migration तुमच्या कोर्स च्या संबंधीत विद्यापीठातून मिळवावे लागेल. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर admission झाले तरीही आणि महाराष्ट्र राज्यात admission झाले तरी दोन्ही ठिकाणी migration सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे.

NEET UG आणि PCB Group च्या विध्यार्थ्यांसाठी सध्या कोणते रेजिस्ट्रेशन चालू आहेत?

NEET UG 2024 तसेच 12 वी PCB ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कोर्सेस साठी Application Form आणि रेजिस्ट्रेशन चालू आहेत ह्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे.

1) राज्यातील महत्वाच्या 4 Deemed University Physiotheraphy/Pharmacy /Bsc Nursing etc प्रवेशा साठी वेगवेगळ्या Deemed युनिव्हर्सिटी CET Application फॉर्म ला सुरवात झाली आहे.

2) महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच Private Bsc Nursing /ANM/GNM कॉलेज मधील Admission साठी आवश्यक असणाऱ्या Bsc Nursing CET चे Application फॉर्म भरण्यासाठी 25/04/2024 पर्यंत मुदत आहे.

3) राज्यातील Govt तसेच private कॉलेज मधील विशेषतः Pharmacy प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या PCB ग्रुप CET चे Admit card/Hall ticket CET CELL मार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.

4) केरळ open state कोटा MBBS/BAMS/BHMS/BDS च्या Admission साठी Kerala CET रेजिस्ट्रेशन आवश्यक आहे. Kerala CET रेजिस्ट्रेशन ची शेवटची Date -19/04/2024 आहे.

NEET UG 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांनी कर्नाटक आणि केरळ चा फॉर्म भरावा का?

NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यां साठी Other State Open कोटा हा प्रवेश प्रक्रियेसाठीचा महत्वाचा भाग आहे. संपूर्ण देशभरात Medical Admission संदर्भात राज्यांची विभागणी दोन भागात करता येते.

1) Domacile State ( म्हणजे विध्यार्थ्याचे रहिवाशी प्रमाणपत्र ज्या राज्याचे आहे ते राज्य, इथे विध्यार्थ्यांना स्टेट कोटा राखीव असतो उदा- महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांना साठी महाराष्ट्र राज्यात 85% सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्यात या सोबत आणखी एक अट महत्वाची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या रहिवाशी प्रमाण पत्राबरोबरच विध्यार्थ्याची 10 वी आणि 12 वीचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातून झालेले असणे गरजेचे आहे. इथे विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण फायदे मिळतात)

2) Other State ( म्हणजे असे राज्य ज्या राज्यात विध्यार्थ्यांची संख्या कमी असल्या कारणाने आपल्या राज्यातील private colleges च्या seats भरण्यासाठी बाहेरील राज्यातील विध्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली जाते त्याला आपण open state कोटा राज्य असेही म्हणतो)

संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून कर्नाटक, केरळ, आंध्र, तेलंगणा, ही MBBS करण्यासाठीची सोईची आणि लगतची open state कोटा राज्य आहेत.

Open State कोटा राज्यातील Private MBBS महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर विध्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी चे फायदे किंवा कोणतीही शासकीय Scholarship मिळत नाही. येथील प्रवेशासाठी प्रवेशाची पात्रता (Eligibility) ही Open कॅटेगरी साठी लागणारी पात्रताच ग्राह्य धरली जाते. मग ती NEET Qualifying Criteria असो अथवा बारावी बोर्डाचा PCB चा 150 मार्क्स चा criteria असो.

Open State कोटा राज्यात प्रामुख्याने cut ऑफिस कमी असतो. General/OBC/EWS प्रवर्गातील विध्यार्थ्यांनी ह्या कडे सकारात्मक पद्धतीने पाहायला हरकत नाही (SC/ST Open state कोटा मधील MBBS च्या cut ऑफ मार्क्स मध्ये महाराष्ट्र राज्यातच प्रवेश मिळण्याची संधी असते)

सध्या NEET परीक्षेच्या अगोदरच कर्नाटक आणि केरळ राज्याने आपले Application forms भरून घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विध्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरलेले आहेत. कोणत्या विध्यार्थ्यांसाठी सदर फॉर्म भरणे आवश्यक आहे ह्या बदलचा विस्तृत video खाली देत आहोत विध्यार्थ्यांनी तो video अवश्य पाहावा व आपला निर्णय घ्यावा.

मागील वर्षीचा कर्नाटक राज्याचा कॉलेज नुसार MBBS Cut ऑफ आणि फीस –

मागील वर्षीचा केरळ राज्याचा कॉलेज नुसार MBBS Cut ऑफ आणि फीस-