सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार NTA नी देशभरातील संपूर्ण विद्यार्थ्यांचा नीट result Center Wise/ CITY WISE प्रकाशित केला आहे.
NTA Update
Author: ANKUSH PATILNEET परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर. RE NEET RESULT DECLAIRED 2024
सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार Grace मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे Grace मार्क्स काढून घेऊन 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा NEET UG परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती.
23/06/2024 रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी पुन्हा RE NEET देण्याचा निर्णय घेऊन परीक्षा दिली.
आता त्यांचा Result जाहीर करण्यात आलेला आहे. या मुलांच्या Result मुळे बाकी विद्यार्थ्यांच्या रँक मध्ये बदल होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला result पुन्हा डाउनलोड करून घ्यावा.
Admission साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने (Formats of Documents)
medical admission documents format
📌 Admission च्या वेळी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने खालील लिंक वर क्लिक करून पाहता येतील
📌 यातील प्रोजेक्ट affected आणि Agriculturist Certificate Veterinary च्या admission साठी उपयोगी पडतील
📌 यातील जे आवश्यक आहेत ते तुम्ही काढून घेऊ शकतात
(Fitness,Gap,Status retention,Annexure C, character,defence,disability,cancellation ,religious & linguistic minority)
NEET 2024 Final Answer Key Published
NTA ने 4 दिवसापूर्वीच आपली Provisional Answer Key प्रकाशित केली होती. त्या Answer Key ला challenge करण्यासाठी NTA नी विद्यार्थ्यांना वेळ दिलेला होता. देशभरातून विद्यार्थ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या त्याची दखल घेऊन NTA आपली सुधारित फायनल answer key प्रकाशित केली आहे.
MAHARASHTRA GOVT SERVICE BOND AFTER MBBS
महाराष्ट्र राज्यात MBBS केल्या नंतर विद्यार्थ्याला द्याव्या लागणाऱ्या Service बदल शासनाचे काही नियम आहेत त्या संदर्भातला महत्वाचा GR DMER च्या website वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
NTA OFFICIAL ANSWER KEY
संपूर्ण देशभरात NEET 2024 ची परीक्षा 5 मे 2024 रोजी संपन्न झाली आहे. NEET 2024 चा Result हा 14 जून 2024 ला नियोजित आहे.
तत्पूर्वी NTA मार्फत NEET 2024 परीक्षेची प्रोविशनल Official Answer Key प्रकाशित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी खालील लिंक वर क्लिक करून Official Answer Key पाहू शकतात.
Migration सर्टिफिकेट बदल संपूर्ण माहिती
migration certificate
online migration certificate
राज्यभरातील संपूर्ण बोर्डचे बारावीचे निकाल लागलेले आहेत. थोड्याच दिवसात NEET 2024 चा निकाल सुद्धा जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक्ष Admission Process ला सुरुवात होईल. Admission Process साठी वेगवेगळ्या प्रकारची Documents ची आवश्यकता असते.
Migration Certificate हे असेच एक महत्वाचे Document. ह्या विषयी आपण माहिती घेऊयात.
जर महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश (Admission) महाराष्ट्रराज्याच्या बाहेर झाले तर अशा विद्यार्थ्याला Admission च्या वेळी Migration सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.
2024 ला बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतरच migration साठी अर्ज करावा.
Migration सर्टिफिकेट कुठून मिळवावे ? (How to Apply Migration Certificate)
Migration सर्टिफिकेट हे HSC बोर्डा मार्फत दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांची 12वी महाराष्ट्र State बोर्ड मधून झाली असेल अशा विद्यार्थ्यांना migration Certificate ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात मिळते.
1) ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या HSC बोर्डाच्या विभागीय कार्यालयात (पुणे/लातूर/नागपूर/मुंबई/संभाजीनगर/अमरावती/नाशिक/कोकण इ ) बारावी मार्कशीट ची ओरिजिनल कॉपी आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन स्वतः विद्यार्थी जाऊन अर्ज करू शकतात.
2) ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी-
ऑनलाईन पद्धतीने Migration मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून योग्य ती माहिती भरून 12वी चे ओरिजिनल मार्कशीट pdf व ओरीजिनल शाळा सोडल्याच्या दाखल्याची pdf अपलोड करून, ऑनलाईन payment करावे. व payment केल्याची पावती पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी.
Migration Certificate चे नमुने खालील प्रमाणे आहेत. (प्रत्येक विभागाचा नमुना वेगवेगळा असू शकतो)
नोट – 1) CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना migration सर्टिफिकेट हे कॉलेज मधूनच मार्कशीट बरोबर दिले जाते.
2) जर तुम्ही अगोदरच एखाद्या बॅचलर कोर्स ला प्रवेश घेतला असेल आणि NEET exam दिली असेल तर तुमचे migration तुमच्या कोर्स च्या संबंधीत विद्यापीठातून मिळवावे लागेल. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर admission झाले तरीही आणि महाराष्ट्र राज्यात admission झाले तरी दोन्ही ठिकाणी migration सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे.
Govt MBBS कॉलेज मध्ये NRI Seats ची मागणी
आता Govt कॉलेज मध्ये सुद्धा NRI कोटा उपलब्ध करून द्यावा कर्नाटक सरकारची NMC कडे मागणी.
NEET पेपर संदर्भातल्या महत्वाच्या याचिकेवर High कोर्टात सुनावणी. NTA नी रिपोर्ट सादर करण्यासाठी 10 दिवसाचा वेळ मागितला.
EDUCATION LOAN INTEREST IN INDIA
12 वी चे निकाल लागलेले आहेत.थोड्याच दिवसात वेगवेगळ्या CET आणि Entrance Exam (NEET) चे सुद्धा निकाल जाहीर होतील त्या नंतर प्रत्येक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.
विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेस ला प्रवेश घेण्याचे स्वप्न बाळगून आहेत. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांकडे पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्ण तयारी असेलच असे नाही. राज्यातील बहुतांश पालक हे बँक loan वर सुद्धा अवलंबून आहेत.
Education loan विषयी बोलायचे झाल्यास वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर वेगवेगळे आहेत.
खालील दिलेल्या button वर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर किती आहे हे पाहू शकता.
MHARASHTRA GOVT MBBS COLLEGES CAMPUS TOUR
श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील MBBS कॉलेजच्या Campus Tour video स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.
सध्या NEET चा पेपर झाला आहे. वेगवेगळ्या Coaching Classes च्या answer key वरून विद्यार्थ्यांनी आपला Score Calculate केला आहे.
आता विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजची माहिती शोधण्यात व्यस्त आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही वेगवेगळ्या कॉलेजच्या Campus Tour Video उपलब्ध करून देत आहोत.
नोट – सदर video आम्ही Youtube या सार्वजनिक प्लॅटफॉर्म वरून वेगवेगळ्या चॅनेल वरून मिळवलेले आहेत.यात दिलेल्या माहितीच्या सत्यता तपासली नसून फक्त अभ्यासासाठी हे video उपलब्ध करून देत आहोत.
कॉलेज campus video पाहण्यासाठी कॉलेज च्या नावावर क्लिक करा