महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 प्रकारचे BHMS Colleges आहेत.
1) Govt 2) Private/Semi Govt 3) Deemed
वरील पैकी Govt आणि Pvt BHMS कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया ह्या CET CELL च्या Website वरून होतात तर Deemed University BHMS महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया केंद्र शासनाच्या AACCC च्या Website वरून होतात.
महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून State Qouta Counselling प्रक्रिया महत्वाची आहे कारण राज्यातील Govt आणि Private BHMS colleges मध्ये विध्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात.
महाराष्ट्र राज्यात BHMS Colleges च्या संख्येचा विचार केला तर 1 Government BHMS आणि जवळपास 59 Private BHMS Colleges आहेत.
दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी National Testing Agency कडून विध्यार्थ्यांसाठी एक नोटीस प्रकाशित करण्यात आली आली आहे. ज्या मध्ये NTA कडून NEET परीक्षे संदर्भात Social मीडिया (समाज माध्यम ) वर पसरविल्या जाणाऱ्या अफवाना विध्यार्थ्यांनी बळी पडू नये असं सांगण्यात आले आहे.
सध्या समाज माध्यमावर NEET परीक्षा आणि लोकसभा निवडणुका या दोन्हीचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे मेसेज पसरवले जात आहे. अशाच एका अफवेच NTA कडून खंडण करण्यात आले आहे.
NTA कडून प्रकाशित झालेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की
” जे विध्यार्थी लोकसभेला मतदान करून येणार आहेत आणि त्यांच्या बोटावर मतदानाची शाई असेल अशा विध्यार्थ्यांना Exam हॉल मध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जाणार असल्याच्या अफ़वा Social Media मधून पसरवल्या जात आहेत त्याला विध्यार्थ्यांनी बळी पडू नये. विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. बोटावर शाई असल्यामुळे कोणत्याही विध्यार्थ्याची कसल्याही प्रकारची अडवणूक केली जाणार नाही. “
ह्याच बरोबर NTA नी विध्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 प्रकारचे BDS Colleges आहेत.
1) Govt 2) Private/Semi Govt 3) Deemed
वरील पैकी Govt आणि Pvt BDS कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया ह्या CET CELL च्या Website वरून होतात तर Deemed University BDS महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया केंद्र शासनाच्या MCC च्या Website वरून होतात
महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून State Qouta Counselling प्रक्रिया महत्वाची आहे कारण राज्यातील Govt आणि Private BDS colleges मध्ये विध्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात.
महाराष्ट्र राज्यात BDS Colleges च्या संख्येचा विचार केला तर 4 Government BDS आणि 26 Private BDS Colleges आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे, ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्या मार्फत 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे, परिपत्रकानुसार टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची परीक्षा फी परत मिळणार आहे.
जीआर नुसार राज्यातील दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळ आहेत यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना ही परीक्षा फी परत मिळणार आहे, म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला फी मिळणार आहे.
3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत विधार्थी/पालकांचे बँक details अकाउंट आहे ते तुमच्या शाळेमध्ये /कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे.
महाराष्ट्र राज्यात 3 प्रकारचे Physiotherapy (BPTH) कॉलेजेस आहेत.
1) Govt Physiotherapy Colleges 2) Private/ Semi Govt Physiotherapy Colleges 3) Deemed University Physiotherapy Co
1) वरील पैकी Govt आणि Semi Govt कॉलेज मधील जागा ह्या NEET Exam च्या मार्क्सच्या आधारावर होतात.
2) परंतु राज्यात Deemed University Physiotherapy Admission साठी त्या त्या Deemed University ची स्वतंत्र CET Exam होतं असते.
3) अशाच राज्यातील नावाजलेल्या Deemed University (MGM Navi Mumbai/Krishna Inst. Karad/PRAVARA LONI/BHARATI VIDYAPITH ) आहेत ज्यांनी 2024 च्या Physiotherapy Admission साठी CET Exam वेळापत्रक प्रकाशित केलं आहे.
📅 Last Date to Apply: 19th May, 2024 ⏰ Last Date to Apply with Late Fee: 24th May, 2024 💵 Application Fees: Rs. 1,500/- 📆 Examination Date: To be Declared 📝Mode of Examination: Offline
राज्यातील ज्या विध्यार्थ्यांना वरील Deemed University मध्ये physiotherapy करायचे आहे त्यांनी आपला Application फॉर्म संबंधित वेबसाईट वर जाऊन भरून घ्यावा.
Physiotherapy Deemed University Fees ही साधारपणे 2.5-3 लाख संपूर्ण कॅटेगरीच्या students साठी आहे. Deemed University मध्ये कसल्याही प्रकारचे कॅटेगरीचे फायदे मिळत नाहीत.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर सध्याचा घडीला महाराष्ट्र राज्यात 31 गव्हर्नमेंट आणि 22 private/Semi Government MBBS कॉलेज आहेत. 2024 मध्ये राज्यात आणखी काही MBBS कॉलेज सुरु होण्याची दाट शक्यता आहे.
NEET-2024 ची परीक्षा ही अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. प्रत्येक विध्यार्थ्यांचं स्वप्न राज्यातच MBBS कॉलेज मिळवण्याचं आहे. त्यासाठी विध्यार्थी भरपूर मेहनत करतानाही दिसत आहेत. परंतु विध्यार्थ्यांची संख्या आणि MBBS च्या सीट्स ह्या मध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे प्रत्येक विध्यार्थ्याला MBBS ला admission मिळू शकणार नाही. ज्या विध्यार्थ्यांना मार्क्स चांगले येतील अशाच विध्यार्थ्यांना राज्यात MBBS मिळणार.
चांगले मार्क्स म्हणजे नेमके किती? असा प्रश्न विध्यार्थी आणि पालकांना साहजिक पडतो. महाराष्ट्र राज्यात जर MBBS मिळवायचे असेल तर Safe स्कोर काय असू शकतो ह्याचा अंदाज आपण 2023 च्या प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या round ला कॉलेज मिळालेल्या विध्यार्थ्यांच्या मार्कवरून लावू शकतो. मागच्या वर्षी 3 ऱ्या round च्या विध्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क्स मध्ये 10-15 मार्क्स मिळवले तर आपला 2024 ला MBBS ला ऍडमिशन घेण्याचा मार्ग जवळपास मोकळा होईल. कारण मागच्या वर्षी MBBS प्रवेशासाठी CET CELL कडून 5 Round घेण्यात आलेले होते. त्यातले 2 vacancy round होते परंतु विध्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता 3ऱ्या राऊंडचा कट ऑफ महत्वाचा आहे.
विध्यार्थ्यांची संख्या/प्रश्न पत्रिकेचे स्वरूप/ कॉलेज ची संख्या ह्या सर्व गोष्टीही कट ऑफ परिणाम करणाऱ्या आहेत. परुंतु ह्या result नंतर लक्षात घेण्याच्या बाबी आहेत. सध्या मागच्या वर्षी चा कट ऑफ डोळ्यासमोर ठेवूनच विध्यार्थ्यांना वाटचाल करावी लागणार आहे.
मागच्या वर्षीचा तिसऱ्या Round चा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज चा कट off-
मागच्या वर्षीचा तिसऱ्या Round चा private MBBS कॉलेजचा कट ऑफ –
महाराष्ट्र राज्यातील शासकीय (govt) किंवा निम्न शासकीय (Private /Semi Govt) Pharamcy / Engineering /Agriculture /Bsc Nursing महाविद्यालयातील 2024 च्या प्रवेशा साठी घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या CET परीक्षा साठी राज्य भरातील विध्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे.
CET CELL वरून वेगवेगळ्या CET परीक्षेसाठी विध्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते.2-3 वेळा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती.
राज्यातल्या CET परीक्षेचे वेळापत्रकही CET CELL कडून जाहीर करण्यात आलेले आहे. थोड्याच दिवसात विध्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट ही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
ह्या दरम्यान एक महत्वाची आकडेवारी समोर येते आहे. राज्याभरातून MH-CET (PCB/PCM) -2024 या परीक्षेसाठी तबल ७ लाख २४ हजार ६४० विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले आहेत. तर Bsc Nursing CET परीक्षेसाठी तब्बल ५३ हजार ३१६ विध्यार्थ्यांनी अर्ज केले असल्याचे कळते आहे.
बारावी सायन्स (PCB Group) नंतर कोणते करिअर निवडायचे हा विद्यार्थी व पालकांसाठी मोठा प्रश्न असतो, कारण १२ वी नंतर निवडलेले क्षेत्र हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते.त्यादृष्टीने पशुवैद्यकीय (Veterinary) हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
आपण जेव्हा Veterinary विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर साधारणत: एक प्रतिमा येते ती म्हणजे जनावरांचा डॉक्टर, परंतु या क्षेत्राची व्याप्ती त्याहीपेक्षा खूप जास्त आहे.
Veterinary केल्यानंतर गोपालन, शेळी- मेंढी पालन आणि कुक्कुटपालन याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे हे एक विस्तृत शास्त्र आहे. पदवीधरांना सरकारी खाते,सहकार खाते, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीसह व्यवसायाच्या ही अनेक संधी उपलब्ध आहेत.
ही पदवी ५.५ वर्षांची आहे आणि यात पहिली ४.५ वर्षे महाविद्यालयीन अभ्यासक्रम असतो. यात क्लासरूम टीचिंग, थेअरी व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके यांचा समावेश होतो. या ४.५ वर्षे कालावधीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एकूण १८ विषय शिकवले जातात.
शेवटचा १ वर्ष इंटर्नशिप कालावधी असतो, यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर प्रक्षेत्रावर अनुभवासाठी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. ५.५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSc &AH ही पदवी प्रदान करण्यात येते.
महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया
१) महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. विदर्भात नागपूर, कोकण विभागातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील शिरवळ, मराठवाडा विभागात परभणी आणि उदगीर या महाविद्यालयांचा सामावेश आहे.
२) Veterinary पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता १२ विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागते.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व इंग्रजी यामध्ये एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही टक्केवारी ४७.५० टक्के एवढी आहे.
३) प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणवत्तेनुसार न होता राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) या परीक्षेच्या आधारावर होते. NEET मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित होतो. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) जाऊन माहिती मिळवणे आवश्यक असते कारण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असते.
Veterinary प्रवेश प्रक्रिया नेमकी चालते कशी विस्तृत Video स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-
2023 चा राज्यातील Veterinary Colleges 3rd ROUND चा कॅटेगरी नुसार कट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-