NTA Update

Author: ANKUSH PATIL

NEET 2024 – Dress Code

WHAT IS DRESS CODE FOR NEET ?

Is NEET dress code strict ?

NEET EXAM DRESS CODE FOR MALE ?

NEET EXAM DRESS CODE FOR MALE ?

NEET 2024 DRESS CODE ?

NTA मार्फत देशभरात NEET Exam 5 May 2024 रोजी होणार आहे. EXAM संदर्भातील Information bulletin NTA आपल्या वेबसाईट वर प्रकाशित केले आहे. त्यात विध्यार्थ्यांना Exam संबधित काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे परीक्षेला जाताना विध्यार्थ्याची Dressing कशी असावी हा आहे.

NTA च्या information Brochoure मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपण Male आणि Female Candidates चा Dress Code काय असावा व काय नसावा हे table स्वरूपात समजावून घेऊ.

A) FOR MALE CANDIDATES-

B) FOR FEMALE CANDIDATES-

या व्यतिरिक्त खालील वस्तुंना Exam हॉल मध्ये परवानगी नाही.

BSc Nursing CET Application फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ.

राज्यातील Government आणि Private /Semi Government Bsc Nursing /ANM/GNM च्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या CET Exam च्या Application फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

या अगोदर फॉर्म भरण्यासाठी 31/03/2024 पर्यंतच मुदत होती परंतु राज्यभरातील विध्यार्थी आणि पालकांच्या विनंती वरून CET CELL नी आता 25/04/2024 पर्यंत मुदत वाढवलेली आहे.

तसेच या नंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचंही CET Cell नी आपल्या नोटीस मध्ये सांगितले आहे.

आर्थिक आरक्षणाच्या (EWS) प्रमाणपत्राबद्दल

HOW TO APPLY EWS

EWS RESERVATION

EWS म्हणजे काय ?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा Open/General कॅटेगरी मध्ये येणाऱ्या विध्यार्थ्यांना EWS अंतर्गत आरक्षण आहे.

राज्यातील प्रत्येक Govt MEDICAL कॉलेज मध्ये 10% सीट्स ह्या EWS प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तर private /Semi Govt कॉलेज मध्ये सीट्स राखीव नसल्या तरीही फीस मध्ये 50% सवलत मिळत असते.

EWS चा फायदा कोणत्या विध्यार्थ्यांना होणार ?

खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. SC, ST, OBC, VJ, NT, SEBC आरक्षणातील विध्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. अशा विध्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी साठी स्वतंत्र आरक्षनाची तरतूद आहे.

EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय अटी आहेत ?

1) विध्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे.

2) विध्यार्थ्याच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी.

3) १ हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं

महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं.

गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट जागेची अट आहे

EWS Certificate काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

Medical क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत EWS प्रमाणपत्रा बाबद महत्वाचे –

EWS प्रमाणपत्र दोन प्रकारचे असते एक केंद्राचे अनेक दुसरे राज्याचे.

कोणतेही प्रमाणपत्र एक एप्रिल 2025 नंतरच काढलेले असले पाहिजे. या प्रमाणपत्राची वैधता एक आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) अशी असते.

आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (EWS) SC/ST/NT1/NT2/NT3/VJ/SBC/OBC /SEBC या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना लागू नाही. अशा विध्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी साठी स्वतंत्र आरक्षनाची तरतूद आहे.

1) केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (Central EWS) : तुम्हाला जर AIIMS/AFMC/JIPMER/All India Quota यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरच हे प्रमाणपत्र लागते अन्यथा लागत नाही.
या प्रमाणपत्रांमध्ये जमिनी बद्दलचा उल्लेख असतो.

2) महाराष्ट्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (State EWS) : तुम्हाला जर महाराष्ट्रात MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotherapy Oher health sciences courses यापैकी कोणत्याही कोर्सला ८५% स्टेट कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र लागते.

बाहेर राज्यात कोणत्याही खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र लागत नाही.

CET (PCB) Admit Card वरील महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र राज्य CET Cell मार्फत राज्यातील PCB Group CET Exam Application फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे Admit कार्ड जाहीर करण्यात आलेले आहे. त्यावर Exam Date आणि Exam कोठे होणार या विषयीची माहिती देण्यात आली आहे. याच बरोबर Admit कार्ड वर विध्यार्थ्यांना जवळपास 16 सूचना दिलेल्या आहेत त्या पैकी विध्यार्थ्यांसाठीच्या महत्वाच्या सूचना नेमक्या काय आहेत विस्तृत जाणून घेऊयात.

1) विध्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहायचे आहे. एकदा केंद्राचा Gate बंद झाल्यानंतर प्रवेश मिळणार नाही. (विध्यार्थ्यांना Gate Closure time त्यांच्या Hall Ticket/admit card वर देण्यात आला आहे. त्याच वेळेपर्यंत विध्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचायला हवा.

2) परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्या कारणाने विध्यार्थ्यानी आपला hall ticket वरचा Roll no हा User Name म्हणून वापरायचा आहे तर पासवर्ड साठी आपली जन्म तारीख (DDMMYYYY) Date Month Year फॉरमॅट मध्ये वापरायचा आहे.

3) विध्यार्थ्यानी Exam Centre वर आपल्या Hall Ticket बरोबरच एखादा ओळखीचा पुरावा (Identity Proof ) ज्यात Pan Card /Passport/Driving License /Voter ID Card Bank Passbook With Photographs /any Photo Identity Proof इ. सोबत ठेवायचे आहे. Hall Ticket वरचे नाव आणि Identity Proof वरचे नाव तंतोतंत match असणे गरजेचे आहे तसे नसेल तर विध्यार्थ्याला Gazette Notification /Affidavit बनवून सोबत ठेवावे लागेल

4) ज्या दिव्यांग विध्यार्थ्यानी (PWD) पेपर सोडवायला मदतनीस (Scribe) ची मागणी केली आहे. अशा विध्यार्थ्यानी आपले Disability सर्टिफिकेट आणि Scribe performa भरून सोबत ठेवायचा आहे.

5) CET CELL ने आपल्या website वर परीक्षे संदर्भात माहिती देणारे Information Brochoure दिलेले आहे विध्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक वाचायचे आहे.

6) विध्यार्थ्यानी आपल्या सोबत परीक्षा हॉल मध्ये सही करण्यासाठी ball point pen सोबत ठेवायचा आहे.

7) तुम्ही परीक्षे दरम्यान दिलेले प्रश्नांचे उत्तर जर दुसऱ्या विध्यार्थ्याच्या Answer Seat बरोबर तंतोतंत match होत असतील तर ते परीक्षा नियमांचे उल्लंघन ठरेल

8) परीक्षा हॉल मध्ये books/Notebooks/Calculater/Watch Calculater/pagers /Mobile phone इ. गोष्टींना परवानगी नाही.

9) परीक्षे संदर्भातील Date /Session /Centre /time विध्यार्थ्यांना बदलून मिळणार नाही.

10) विध्यार्थ्यांना एखादी अडचण किंवा काही issue असेल तर त्या संदर्भात 07969134401/07969134402 या क्रमांकावर संपर्क करावा.

संपूर्ण सूचना वाचा-

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर बदल विस्तृत

All About Government Medical College Nagpur.

राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुन्या MBBS कॉलेज पैकी एक. भारतातीत इतर MBBS कॉलेज च्या तुलनेत सगळ्यात मोठा Campus हे ह्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.

कॉलेज बदल

कॉलेज चे पूर्ण नाव – Government Medical College And Hospital Nagpur

ठिकाण – हनुमान नगर नागपूर

स्थापना –1947

परिसर – 196 एकर

शिक्षण – UG/PG/Dental/ Therapy Courses उपलब्ध

कॉलेज कोड -1221

Status –Government College

सलंग्नता – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक

Intake- 250 (MBBS)

2) हॉस्पिटल बदल –

-Highest patient Flow
-first College in India to Run Occupational and Physiotheraphy

first College in Maharashtra to Installed C T Scanner Machine

कट ऑफ ( 2023 General and Average Marks )

Open- 635
OBC-623
EWS – 630
SC- 566
ST-442
VJ-597
NTB-573
NTC-606
NTD-634

(2nd आणि 3rd Round ला वरील कट ऑफ मध्ये 5-8 मार्क्स ची घट झाली होती )


महाराष्ट्र राज्य CET CELL मार्फत PCB ग्रुप साठीचे Hall Ticket/ Admit Card जाहीर.

CET ADMIT CARD RELEASED

1) आपले हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) आपला Registered Email Id भरा

3) आपला Application फॉर्म पासवर्ड टाका.

4) login केल्यानंतर Hall Ticket or Admit Card ह्या tab वर क्लिक करा

5) वरच्या side ला CET Exam हा tab दिसेल त्यावर क्लिक करून Enter करा

6) Enter केल्यानंतर डाउनलोड option वर क्लिक करून pdf save करा.

जर डाउनलोड करण्यासाठी अडचणी येतं असतील तर वेबसाईट वर लोड असल्याकारणाने technical error असू शकतो थोड्या वेळाने try करू शकता

How many marks required for GMC Nagpur?

Is GMC Nagpur good for MBBS?

Can I get GMC Nagpur with 600 marks?

How many marks are needed in the NEET to get into GMC Nagpur?

About GMC Nagpur

How to get GMC Nagpur in 4 months

How many marks are required in NEET for GMC?

GMC Nagpur MBBS Cutoff 2023 

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील video आवर्जून पहा

GMC NAGPUR FEES

CATEGORY WISE FEES GMC NAGPUR

OBC कॅटेगिरी च्या संबंधित संपूर्ण माहिती व विद्यार्थ्यांसाठी सूचना (ALL ABOUT OBC CENTRAL AND STATE)

📌 OBC प्रमाणपत्र दोन प्रकारचे असते.

  1. राष्ट्रीय (नॅशनल) OBC प्रमाणपत्र आणि
  2. महाराष्ट्राचे OBC प्रमाणपत्र.

केंद्राच्या OBC प्रमाणपत्राबाबद

1 Central Government च्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्राच्या OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.
(Central OBC Cast Certificate)

2 महाराष्ट्रातील OBC/SBC/NT1/NT2/NT3/VJ या कॅटेगिरी चे सर्व विद्यार्थी केंद्रात OBC कॅटेगिरी मध्ये येतात.

3 केंद्राचे OBC प्रमाणपत्र फक्त एक वर्ष व्हॅलिड असते.

4 केंद्राचे OBC प्रमाणपत्र सेतू (MAHA E SEVA KENDRA) केंद्रा मधून काढून मिळते.

5 NEET 2025 च्या रिझल्ट नंतर AIQ (ALL INDIA QOUTA) फॉर्म भरताना केंद्राचे OBC प्रमाणपत्र लागते महाराष्ट्राचे प्रमाणपत्र चालत नाही.

6 नीट चा रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन च्या वेळी आवश्यक असणारे केंद्राचे OBC प्रमाणपत्र एक एप्रिल 2025 नंतर काढलेले असले पाहिजे.

7 NEET 2025 AIQ चा MCC (MBBS/BDS) / AACCC(BAMS/BHMS/BUMS) कडे फॉर्म भरताना ओबीसी CAST व्हॅलिडीटी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही.

8 सहसा केंद्राच्या OBC सर्टिफिकेट वर फॉर्म नंबर -9 असतो. त्यावर Government of India असा उल्लेख असतो.

राज्याच्या OBC प्रमाणपत्रा बाबद

1 STATE Government च्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्राच्या OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता नसते, STATE OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.

2 महाराष्ट्र राज्यात NT आणि VJ ह्या स्वतंत्र Cast आहेत त्यांना त्यांची स्वतंत्र Caste सर्टिफिकेट काढावी लागतात

3 राज्याच्या OBC सर्टिफिकेट ला तारखेचे बंधन नाही. Cast Certificate जुने असले तरी चालतं. किंवा नवीन काढलं तरी हरकत नाही

4 महाराष्ट्र राज्यातील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळी मात्र आपणास स्टेट चे ओबीसी प्रमाणपत्र आवश्यक असते त्यावेळी केंद्राचे चालत नाही. तसेच त्यावेळी

A.जात प्रमाणपत्र (CASTE CERTIFICATE)

B. उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)

C.जात पडताळणी प्रमाणपत्र (CASTE VALIDITY )

हे तिन्ही असतील तर च आरक्षणाचा लाभ मिळतो

5 सहसा STATE OBC सर्टिफिकेट वर फॉर्म नंबर -8 असतो. आणि त्यावर Government of Maharashtra असा उल्लेख असतो.

Seth G S Medical College Admission

SETH G S MEDICAL COLLEGE MBBS

Seth G S Medical College Cut off

ABOUT SETH GS COLLEGE-

Long Form– Seth Gordhandas Suderdas Medical College Mumbai

Location- Parel Mumbai

Status -Municipal Corp. = Govt

स्थापना – 1926

Seats-250 For MBBS

Admission- UG (MBBS) and PG and Super Speciality Courses

संलग्न – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.

ABOUT KEM HOSPITAL-

Name- King Edward Memorial Hospital
(KEM Hospital)

Hospital Staff- 390 Physicians /550 Resident Doctors

Bed- 1800 Beds

Patient Flow- Nearly 85000 Patients per year

Hostel बद्दल –

Hostel Not Available (2023-2024) batch /या वर्षी पासून सुरु होण्याची श्यक्यता

Seth G S Medical College MumbaI 2023 Cut Off (General and Average )-

Open-676
OBC-660
EWS-661
SC-604
ST-522
VJ-641
NTB-644
NTC-650
NTD-655

Video स्वरूपात कॉलेजची माहिती पाहण्यासाठी खालल लिंक वर क्लिक करा

B.J. Medical College पुणे बद्दल सविस्तर माहिती.

ABOUT COLLEGE

Long Form– Byramjee Jejeebhoy Medical College Pune

Location– Near Pune Railway Station

Status -Govt

स्थापना – 1946

Seats-250 For MBBS

Admission– UG (MBBS) and PG Available

संलग्न – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.

हॉस्पिटल बद्दल –

Name- Sasson General Hospital

Bed- 1296 Beds

हॉस्पिटल ची स्थापना – 1867

कॉलेज विषयी Video स्वरूपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Hostel बद्दल –

Hostel Available

BJ Medical College Pune Category नुसार फीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

BJ Medical कॉलेज पुणे कॅटेगरी नुसार फीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

BJ Medical कॉलेज पुणे 2023 Round Wise कट Off-

1st Round-

OPEN-657

OBC-645

EWS-649

SC-581

ST-491

VJ-604

NTB-601

NTC-635

NTD-650

2ND ROUND-

ST-458

SC-579

VJ-604

NTB-601

NTC-633

NTD-653

OPEN-650

3RD ROUND

ST-458

SC-579

VJ-604

NTB-601

NTC-633

NTD-647

OBC-640

EWS-646

OPEN-647