महाराष्ट्र राज्यात BHMS ला Admission मिळवण्यासाठीचा Safe Score ?

By ANKUSH PATIL 10 April 2024
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 प्रकारचे BHMS Colleges आहेत.
1) Govt
2) Private/Semi Govt
3) Deemed
वरील पैकी Govt आणि Pvt BHMS कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया ह्या CET CELL च्या Website वरून होतात तर Deemed University BHMS महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया केंद्र शासनाच्या AACCC च्या Website वरून होतात.
महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून State Qouta Counselling प्रक्रिया महत्वाची आहे कारण राज्यातील Govt आणि Private BHMS colleges मध्ये विध्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात.
महाराष्ट्र राज्यात BHMS Colleges च्या संख्येचा विचार केला तर 1 Government BHMS आणि जवळपास 59 Private BHMS Colleges आहेत.
संपूर्ण BHMS Colleges ची यादी आणि फीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी Safe Score काय असू शकतो या साठी विध्यार्थी मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट पाहू शकतात.
2023 VACANCY ROUND कट ऑफ लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Video स्वरूपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Related News

MBBS/BAMS/BDS/BHMS Document Verification Process कशी असते ?
mbbs bams bhms bds bums physiotherapy
documents verification
cet cell document verification
महाराष्ट्र स्टेट कोटा अंतर्गत MBBS/BAMS/BDS/BHMS/BUMS इ. प्रवेश प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी (Document Verification) ही एक महत्त्वाची पायरी आहे जी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell – SCET Cell) द्वारे आयोजित केली जाते. ही प्रक्रिया सामान्यतः खालीलप्रमाणे पार पडते
NEET चा निकाल लागल्यानंतर साधारपणे 25-30 जुलै दरम्यान महाराष्ट्र State Q Counselling (प्रवेशप्रक्रियेला) सुरुवात होते.
सर्वप्रथम, उमेदवारांना CET Cell च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. यामध्ये NEET UG चे तपशील, वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले कॉपी अपलोड करावे लागतात.
अर्ज सादर केल्यानंतर, उमेदवारांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रारंभिक पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाते. यामध्ये मूलभूत कागदपत्रे जसे की NEET स्कोअरकार्ड, 10वी आणि 12वीचे गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) इत्यादींची तपासणी होते.

प्रत्यक्ष कागदपत्रे पडताळणी (Physical Verification): ऑनलाइन पडताळणीनंतर विद्यार्थ्याचे CAP Round सुरु होतात. ह्या Round मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज चा पसंतिक्रम द्यावा लागतो दिलेल्या पसंतीक्रम (Choice Filling) मधून विद्यार्थ्याला एखादे कॉलेज मिळाले तर विद्यार्थ्याला त्या कॉलेज ला एकतर Admission घेण्यासाठी किंवा मिळालेले कॉलेज hold करून पुढील round मध्ये Betterment ला जाण्यासाठी प्रत्येक्ष कॉलेज वर हजर राहावे लागते. आणि त्या ठिकाणी कॉलेज च्या Scrutiny Committee मार्फत विद्यार्थ्याचे Original Documents ची पडताळणी केली जाते.

ही माहिती video स्वरूपात पाहण्यासाठी खालील video वर क्लिक करा.
नोट-वरील नियमांमध्ये बदल होऊ शकतात.त्यासाठी विद्यार्थ्यांनी cet cell च्या website ला सुद्धा visit करत राहावे. https://cetcell.mahacet.org/
