NEET UG 2024 चे Application Form भरून झालेत. राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी NEET चा फॉर्म भरत असताना कोणी Open तर कोणी OBC तर काही विद्यार्थ्यांनी EWS मधून आपला फॉर्म भरलेला आहे.
जेंव्हा NEET Result Declare होईल तेंव्हा वेगवेगळ्या Admission Process साठी पुन्हा Application फॉर्म भरावे लागतात त्यावेळेसही विद्यार्थ्यांना कॅटेगरी भरावी लागते. त्यावेळी विद्यार्थी जी Category भरेल ती अधिक महत्वाची आहे.
प्रवेश (MEDICAL ADMISSION ) प्रक्रियेचा विचार केला तर दोन महत्वाच्या प्रवेश प्रक्रिया आहेत.
A) State Qouta (85% Maharashtra State Qouta)
B) All India Qouta
A) State Qouta (85% maharashtra State Qouta)
ह्या Process द्वारे महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच private किंवा semi govt colleges मधील 85% seats merit base वर भरल्या जातात.
येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना Category निवडण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये 4 पर्याय आहेत.
1) Open Category – महाराष्ट्र राज्यातील ज्या मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे तसेच त्यांच्याकडे इतर कोणतेही cast certificate नाही अशा विध्यार्थ्यांना Open category निवडावी लागेल.
2) EWS Category – कोणतेही Cast Certificate नसणारे मराठा विद्यार्थी परंतु पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. आणि त्यांच्याकडे State Government चे EWS Certificate असेल असे विध्यार्थी EWS हा option निवडू शकतात. EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी State कोटा मध्ये 50% फी माफी सह राज्यातील संपूर्ण Government Colleges मध्ये 10% एवढे Seats Reservation आहे.
3) OBC Category – मराठा समाजातील असे विद्यार्थी ज्यांची नव्याने कुणबी नोंद सापडली असेल किंवा अगोदरपासूनच त्यांची Cast कुणबी आहे व विद्यार्थ्यांकडे कुणबी च्या आधारावर स्वताचे State Cast Certificate /Cast Validity /Non Creamy Layer असेल तर असे विध्यार्थी OBC Category हा पर्याय निवडू शकतात.
4) SEBC Category- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील मराठा समजतील विध्यार्थ्यांसाठी 2024 साली 10% स्वतंत्र शैक्षणिक आरक्षण मराठा समाजाला देऊ केलं आहे. मराठा समजतील असे विध्यार्थी ज्यांना या आरक्षणाच्या संदर्भात SEBC Cast Certificate /Validity /नॉन क्रीमी लेअर मिळालेले आहे किंवा Admission process चा फॉर्म भरण्या अगोदर मिळण्याची श्यक्यता आहे अशा विध्यार्थ्यांनी SEBC ही कॅटेगरी निवडायला हरकत नाही.
5) EBC Schlorship – EBC ही कॅटेगरी नसून एक शिष्यवृत्ती आहे. Open कॅटेगरी मधील असे विध्यार्थी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी असूनही त्यांना EWS सर्टिफिकेट काढता आलेले नाही परंतु उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे अशा विध्यार्थ्यांना EBC Scholarship मिळत असते. Application फॉर्म भरताना Open Category निवडावी लागेल. एकदा कॉलेज ला Admission झाल्यानंतर mahadbt च्या वेबसाईट वर scholarship अर्ज भरून 50% फी scholarship स्वरूपात परत मिळवता येऊ शकते.
नोट- मराठा समाजातील जे विध्यार्थी EWS/OBC/SEBC कॅटेगरी मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चालू आर्थिक वर्षाचे उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा काढून घ्यावे. जर उत्त्पन्न 8 लाखा पेक्षा कमी असेल तर फीस मध्ये जवळपास 50% सवलत मिळेल. जर उत्त्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर संबंधित कॅटेगरी ची सीट् मिळेल पण फीस Open कॅटेगरी ची भरावी लागेल.
नोट -विध्यार्थी कुठल्याही एकाच कॅटेगरी चे फायदे घेऊ शकतो.
B) All India Qouta –
ही Central Government ची प्रवेश प्रक्रिया आहे. मराठा समाजातील विध्यार्थ्यांना येथे 3 प्रकारच्या Category benifit मिळवता येऊ शकतात.
1) Open Category – ज्यांच्याकडे कोणतेही Cast सर्टिफिकेट नाही आणि पालकांचे उत्त्पन्न 8 लाखाच्या वर आहे अशा विध्यार्थ्यांसाठी.
2) OBC Category-मराठा समाजातील असे विध्यार्थी ज्यांच्या कडे महाराष्ट्र शासनाचे OBC सर्टिफिकेट आहे आणि त्या आधारावर त्यांनी केंद्राचे OBC सर्टिफिकेट मिळवलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी.
3) EWS Category- मराठा समाजातील असे विध्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या कडे राज्याचे तसेच केंद्राचे EWS सर्टिफिकेट आहे अशा विध्यार्थ्यांसाठी.
नोट – All India Qouta मध्ये SEBC ही कॅटेगरी येणार नाही करण SEBC हे महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यपुरत दिलेलं आरक्षण आहे. केंद्रात SEBC हा प्रवर्ग नाही.
नोट – विध्यार्थी फॉर्म भरत असताना कोणत्याही एका कॅटेगरीचे benifit घेऊ शकतो.
EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा Open/General कॅटेगरी मध्ये येणाऱ्या विध्यार्थ्यांना EWS अंतर्गत आरक्षण आहे.
राज्यातील प्रत्येक Govt MEDICAL कॉलेज मध्ये 10% सीट्स ह्या EWS प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तर private /Semi Govt कॉलेज मध्ये सीट्स राखीव नसल्या तरीही फीस मध्ये 50% सवलत मिळत असते.
EWS चा फायदा कोणत्या विध्यार्थ्यांना होणार ?
खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. SC, ST, OBC, VJ, NT, SEBC आरक्षणातील विध्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. अशा विध्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी साठी स्वतंत्र आरक्षनाची तरतूद आहे.
EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय अटी आहेत ?
1) विध्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे.
2) विध्यार्थ्याच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी.
3) १ हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं
महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं.
गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट जागेची अट आहे
EWS Certificate काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
Medical क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत EWS प्रमाणपत्रा बाबद महत्वाचे –
EWS प्रमाणपत्र दोन प्रकारचे असते एक केंद्राचे अनेक दुसरे राज्याचे.
कोणतेही प्रमाणपत्र एक एप्रिल 2024 नंतरच काढलेले असले पाहिजे. या प्रमाणपत्राची वैधता एक आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) अशी असते.
आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (EWS) SC/ST/NT1/NT2/NT3/VJ/SBC/OBC /SEBC या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना लागू नाही. अशा विध्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी साठी स्वतंत्र आरक्षनाची तरतूद आहे.
1) केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (Central EWS) : तुम्हाला जर AIIMS/AFMC/JIPMER/All India Quota यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरच हे प्रमाणपत्र लागते अन्यथा लागत नाही. या प्रमाणपत्रांमध्ये जमिनी बद्दलचा उल्लेख असतो.
2) महाराष्ट्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (State EWS) : तुम्हाला जर महाराष्ट्रात MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotherapy Oher health sciences courses यापैकी कोणत्याही कोर्सला ८५% स्टेट कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र लागते.
बाहेर राज्यात कोणत्याही खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र लागत नाही.
1 STATE Government च्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्राच्या OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता नसते, STATE OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.
2 महाराष्ट्र राज्यात NT आणि VJ ह्या स्वतंत्र Cast आहेतत्यांना त्यांची स्वतंत्र Caste सर्टिफिकेट काढावी लागतात
3 राज्याच्या OBC सर्टिफिकेट ला तारखेचे बंधन नाही. Cast Certificate जुने असले तरी चालतं. किंवा नवीन काढलं तरी हरकत नाही
4 महाराष्ट्र राज्यातील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळी मात्र आपणास स्टेट चे ओबीसी प्रमाणपत्र आवश्यक असते त्यावेळी केंद्राचे चालत नाही. तसेच त्यावेळी
A.जात प्रमाणपत्र (CASTE CERTIFICATE)
B. उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)
C.जात पडताळणी प्रमाणपत्र (CASTE VALIDITY )
हे तिन्ही असतील तर च आरक्षणाचा लाभ मिळतो
5 सहसा STATE OBC सर्टिफिकेट वर फॉर्म नंबर -8 असतो. आणि त्यावर Government of Maharashtra असा उल्लेख असतो.