Government Yojana Update

Category: Government Yojana Update

Nationality आणि Domacile सर्टिफिकेट बदल महत्वाचे.

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही प्रवेश प्रक्रियेत (Admission Process) मध्ये भाग घेण्यासाठी Nationality and Domacile हे अत्यंत महत्वाचे Document आहे.

विशेषतः महाराष्ट्र State कोटा प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील Domacile सर्टिफिकेट असणे अत्यंत गरजेचे आहे. जर महाराष्ट्र Domacile नसेल तर विद्यार्थी महाराष्ट्र State कोटा 85% प्रवेश प्रक्रियेसाठी Merit सीट्स वर पात्र होतं नाही.

Nationality आणि Domacile Certificate तहसील कार्यालयातून दिले जाते. बऱ्याचदा ‘Certificate of Age Nationality and Domacile’ असे एकत्रित Nationality आणि Domacile दिले जाते.

तर काही ठिकाणी ‘Certificate of Age and Nationality’ आणि Certificate of Age and Domacile असे दोन वेगवेगळे सर्टिफिकेट दिले जातात.

विद्यार्थ्यानी आपले Domacile सर्टिफिकेट व्यवस्थित तपासावे त्यात दोन्ही Certificate एकत्र आहेत का याची खात्री करावी. किंवा दोन्ही वेगवेगळे असतील तरी अडचण नाही.परंतु वरील दोन्ही पैकी एकाच उल्लेख असेल तर दुसऱ्या साठी अर्ज करावा.

जर तुमच्या सर्टिफिकेट वर फक्त Age and domacile असेल तर तुमचे 12वीचे Leaving सर्टिफिकेट (T.C.) पहावी त्यावर Nationality -Indian असे लिहले असेल तर तुम्ही Leaving सर्टिफिकेट सुद्धा Nationality सर्टिफिकेट म्हणून वापरू शकता.परंतु तहसील कार्यालयातून Nationality काढले तर अधिक चांगले

विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न पडतो की Nationality आणि Domacile 2024 अगोदर काढलेले असेल तर चालेल का? तर ह्याच उत्तर हो आहे कारण Nationality आणि Domacile ला तारखेचे बंधन नाही कधीही काढलेले असेल तरी चालेल.

महत्वाचे – सध्या संपूर्ण Documents हे ऑनलाईन पद्धतीने निघत आहेत व त्यावर Digital सही चा उपयोग केला जात आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालयातून काढलेल्या किंवा Sub Divisional Office मधून काढलेल्या प्रत्येक Documents च्या शेवटी आपल्या Documents वर Digital Sign चा Right मार्क्स (✔️) आहे का बघावा. जर त्या जागी Question मार्क असेल तर अडचणी येऊ शकतात.