NTA Update

Category: NTA Update

NEET UG 2025- OMR Sheet बद्दल विद्यार्थ्यांना NTA च्या महत्वाच्या सुचना.

NATIONAL TESTING AGENCY NTA NEET NEET APPLICATION FORM NEET REGISTRATION

संपूर्ण देशभरात NEET UG 2025 ची परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. या परीक्षेत देशभरातील जवळपास 23 लाख + विद्यार्थी आपले नशीब अजमवणार आहेत.

NTA (National Testing Agency) ने ही परीक्षा पेन आणि पेपर माध्यमातून होणार असल्याचे अगोदरच नोटीस काढून सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना Test booklet आणि OMR Sheet देण्यात येईल. पेपर झाल्यानंतर OMR हे Computer सॉफ्टवेअर च्या साह्याने तपासले जातील त्यामुळे NTA कडून विद्यार्थ्यांना OMR कशी सोडवायची या बद्दल काही सुचना आणि Demo OMR आपल्या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे.

नोट – सदरची OMR ही जुनी आहे. या वर्षी पेपर पॅटर्न मध्ये बदल केलेले आहेत ( Section B optional 10 Question वगळण्यात आले आहेत )

मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीट रजिस्ट्रेशन कोणत्या कॅटेगरीतून करायचे ?

NEET 2025 REGISTRATION.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये SEBC अंतर्गत आरक्षण लागू आहे, परंतु हे आरक्षण केंद्र सरकारमध्ये सेंट्रल ला लागू नाही.

कारण केंद्र सरकारमध्ये SEBC ही कॅटेगिरी येत नाही.

त्यामुळे नीट चा अर्ज भरताना तुम्हाला SEBC ही कॅटेगरी दिसणार नाही.

त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीट चा अर्ज कोणत्या कॅटेगिरीतून भरावा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात येतो.
मराठा समाजातील विद्यार्थी केंद्रामध्ये आर्थिक आरक्षणाचा (EWS) फायदा घेऊ शकतात.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे पालक जर केंद्राच्या आर्थिक आरक्षणाचे (Central EWS) निकष पूर्ण करत असतील तर त्यांना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (Central EWS) मिळू शकते.हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले तर ते नीट चा अर्ज EWS या कॅटेगिरी मधून भरू शकतात.

मराठा समाजातील विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगिरीतून अर्ज करून मराठा आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात.

आपण नीट चा अर्ज भरताना जी कॅटेगिरी निवडतो त्याचा उपयोग मुख्यत्वे केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रिया जसे की AIIMS/JIPMER/15 % all India quota यासाठी उपयोग होतो.

थोडक्यात सारांश, मराठा समाजातील विद्यार्थी नीट चा फॉर्म भरताना EWS कॅटेगिरी मधून भरू शकतात आणि नीट चा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगिरीचा फायदा नंतर घेऊ शकतात.

NEET 2024 परीक्षेच्या आधारे विद्यार्थी कोण कोणत्या Courses ला प्रवेश घेऊ शकतो ?

वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी कोणत्या परिक्षा महत्वाच्या आहेत ?

List Of Various Courses Offered Through NEET UG 2024

जानेवारी ते मे हा 5 महिन्याचा कालावधी हा वेगवेगळ्या परीक्षेचे वेळापत्रक तसेच वेगवेगळ्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी online रेजिस्ट्रेशन चा काळ आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्रात आपले career करण्याचा निर्णय घेताना दिसतात.

वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी च्या बोर्ड च्या परीक्षेबरोबरच अन्य Entrance Test देणे सुद्धा बंधनकारक आहे.

महाराष्ट्र राज्यापुरते सांगायचे झाल्यास महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात मेडिकल फिल्ड मध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास 2 प्रकारच्या Entrance Test अत्यंत महत्वाच्या आहेत.

ही देशपातळीवर होणारी सर्वात महत्वाची परिक्षा आहे. या परीक्षेच्या मार्क्स च्या आधारावर महाराष्ट्र राज्यात खालील Courses ला विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.

ही Exam National Testing Agency (NTA) द्वारे केंद्र शासनामार्फत घेतली जाते.

Following are the NEET course details:

1) MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)

2) BDS (Bachelor of Dental Surgery)

3) BHMS (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery)

4) BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery)

5) BUMS (Bachelor of Unani Medicine and Surgery)

6) BSMS (Bachelor of Siddha Medicine and Surgery)

7) Bachelor of Naturopathy and Yoga Sciences (BNYS)

8) Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry (BVSc and AH)

9) Bachelor of Physiotherapy (BPT)

10) Bachelor of Occupational Therapy (BOTh)

11) Bachelor of Audiology, Speech and Language Pathology (BASLP)

12) Bachelor of Prosthetics and Orthotics (BP & O)

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 2 महत्वाच्या Courses साठी 2 वेगवेगळ्या CET विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे.

ही Exam ही Maharashtra CET Cell या राज्य शासनाच्या संस्थे मार्फत घेण्यात येते.

जर विद्यार्थ्यांला बारावी नंतर B. Pharm किंवा Pharm D साठी प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यानी ही CET द्यावी.

2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे प्रवेश हे नीट परीक्षेच्या आधारावरच व्हायचे परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे 2023 पासून राज्यात Bsc Nursing CET ही लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात Bsc Nursing ला प्रवेश घ्यायचा असेल तर Bsc Nursing साठी घेण्यात येणारी स्वतंत्र CET परिक्षा देणे बंधनकारक आहे.

NEET UG-2024 Result तिसऱ्यांदा जाहीर

सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार NTA नी देशभरातील संपूर्ण विद्यार्थ्यांचा नीट result Center Wise/ CITY WISE प्रकाशित केला आहे.

NEET परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर. RE NEET RESULT DECLAIRED 2024

सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार Grace मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे Grace मार्क्स काढून घेऊन 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा NEET UG परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती.

23/06/2024 रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी पुन्हा RE NEET देण्याचा निर्णय घेऊन परीक्षा दिली.

आता त्यांचा Result जाहीर करण्यात आलेला आहे. या मुलांच्या Result मुळे बाकी विद्यार्थ्यांच्या रँक मध्ये बदल होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला result पुन्हा डाउनलोड करून घ्यावा.

NEET 2024 Final Answer Key Published

NTA ने 4 दिवसापूर्वीच आपली Provisional Answer Key प्रकाशित केली होती. त्या Answer Key ला challenge करण्यासाठी NTA नी विद्यार्थ्यांना वेळ दिलेला होता. देशभरातून विद्यार्थ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या त्याची दखल घेऊन NTA आपली सुधारित फायनल answer key प्रकाशित केली आहे.

NTA OFFICIAL ANSWER KEY

संपूर्ण देशभरात NEET 2024 ची परीक्षा 5 मे 2024 रोजी संपन्न झाली आहे. NEET 2024 चा Result हा 14 जून 2024 ला नियोजित आहे.

तत्पूर्वी NTA मार्फत NEET 2024 परीक्षेची प्रोविशनल Official Answer Key प्रकाशित करण्यात आलेली आहे.

विद्यार्थी खालील लिंक वर क्लिक करून Official Answer Key पाहू शकतात.

Govt MBBS कॉलेज मध्ये NRI Seats ची मागणी

आता Govt कॉलेज मध्ये सुद्धा NRI कोटा उपलब्ध करून द्यावा कर्नाटक सरकारची NMC कडे मागणी.

NEET पेपर संदर्भातल्या महत्वाच्या याचिकेवर High कोर्टात सुनावणी. NTA नी रिपोर्ट सादर करण्यासाठी 10 दिवसाचा वेळ मागितला.

NEET 2024 परीक्षेसंदर्भातील कोणते Documents Save करणे आवश्यक आहे ?

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागद पत्रा बरोबरच NTA कडून नव्याने उपलब्ध झालेले काही Documents विद्यार्थ्यांना Admission process साठी पुन्हा अत्यंत गरजेचे आहे. ते विद्यार्थ्यानी व्यवस्थित save करून ठेवणे आणि जतन करणे आवश्यक आहे.

1) NEET Application फॉर्म –

NEET रेजिस्ट्रेशन complete झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या mail id वर NTA (National Testing Agency) कडून विद्यार्थ्यांचा NEET application फॉर्म mail केला जातो. किंवा पुंर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यानी pdf डाउनलोड केलेली असेल तर त्या application फॉर्म ची किमान 1 कलर print विद्यार्थ्यानी जतन करून ठेवावी.

2) NEET Admit कार्ड –

पुढील Admission process साठी विद्यार्थ्याचे Admit कार्ड हे अत्यंत महत्वाचे document आहे. विद्यार्थ्यानी आपल्या Admit कार्ड च्या किमान 2-3 print काढून जतन करून ठेवाव्यात तसेच mail मध्ये आपले admit कार्ड जतन करून ठेवावे.

अगदी काही दिवसामध्ये NTA कडून Admit कार्ड लिंक काढून टाकण्यात येते त्यामुळे आपल्याला अगोदरच आपले admit कार्ड save करणे गरजेचे आहे.

3) आपला Email Id आणि Mobile नंबर –

NEET application फॉर्म भरताना विद्यार्थ्यानी जो mobile नंबर आणि Email id दिलेला आहे तो नंबर आणि Email id पुढील Admission process साठी विशेषतः ऑल इंडिया कोटा प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण ऑल इंडिया कोटा रेजिस्ट्रेशन करताना यावर OTP पाठवल्या जातो. OTP enter केल्याशिवाय आपला फॉर्म पुढे Proceed होतं नाही. त्यामुळे NEET Application फॉर्म भरताना आपण जो मोबाईल नंबर आणि Email id दिलेला आहे तो संपूर्ण process होईपर्यंत चालू असणे अत्यंत गरजेचे आहे.

NTA ने NEET Admit कार्ड वरील Post Card Size फोटो Space वाढवला

NTA मार्फत विद्यार्थ्यांना NEET 2024 चे Admit Card 1 एप्रिल रोजी उपलब्ध करून देण्यात आलेले होते.

परंतु त्यामध्ये Post Card Size फोटो साठी जो Space दिला होता तो box लहान असल्याचे लक्षात आल्यानंतर NTA नी त्यात सुधारणा केली आहे आणि box ची size Rectangular पद्धतीने वाढवून दिलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांचा फोटो अगोदरच्या admit card वर व्यवस्थित पेस्ट होतं नव्हता अशा विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा खालील लिंक वर क्लिक करून आपले Admit Card नव्याने डाउनलोड करून घ्यावे त्यात तुम्हाला post card size फोटो साठी योग्य space मिळेल.

नव्याने Admit Card डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.