NTA Update

Category: NTA Update

कोणत्या विध्यार्थ्यांना आपला NEET Application फॉर्म वरील फोटो बदलणे आवश्यक आहे ?

📌 NTA ने Exam City Slip बरोबरच ‘Correction In Photograph’ बदल महत्वाची नोटीस काढलेली आहे.

📌 Correction Of Photograph नोटीस नुसार काही विध्यार्थ्यांना NTA नी आपला Photo बदलण्याच्या सूचना दिलेल्या आहे.

📌 कोणत्या विध्यार्थ्यांना photo बदलण्याची आवश्यकता आहे आणि कोणत्या विध्यार्थ्यांना आवश्यकता नाही हे विस्तृत पाहू.

A) कोणत्या विध्यार्थ्यांना Photographs बदलण्याची आवश्यकता आहे ?

1) विध्यार्थ्यांनी City Slip डाउनलोड केलेली आहे.

2) City Slip वरील photo मध्ये Error आलेला आहे

3) त्याच बरोबर तुमच्या Exam City Slip वर खालील Remark आलेला आहे.

असा remark आलेल्या विध्यार्थ्यांना आपला photo बदलावा लागणार आहे. Photo बदलन्याची अंतिम मुदत 26/04/2024 रात्री 11:59 पर्यंत आहे.

Remark आलेल्या विध्यार्थ्यांनी खालील फॉरमॅट मध्ये आपला photo पुन्हा upload करावा.

B) कोणत्या विध्यार्थ्यांना Photographs बदलण्याची आवश्यकता नाही ?

1) विध्यार्थ्यांनी आपली City Slip डाउनलोड केलेली आहे

2) City Slip वरील photo व्यवस्थित प्रिंट झालेला आहे.

3) City Slip वर कोणताही Remark आलेला नाही.

City Slip वर Remark आलेल्या विध्यार्थ्यांना Photo बदलण्याची संधी

NTA मार्फत आज सकाळी Exam City Slip जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

या Exam City slip वर काही विध्यार्थ्यांना Photo संधर्भात NTA मार्फत Remark देण्यात आलेला आहे.

📌 NEET Application फॉर्म भरत असताना विध्यार्थ्यांनी जर चुकीच्या फॉरमॅट मध्ये photo Upload केला असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या Exam City Slip वर Remark देण्यात आलेला आहे. अशा विध्यार्थ्यांना आपला फोटो बदलण्याची संधी NTA कडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

📌 अशा प्रकारचा कोणताही Remark जर तुमच्या Exam City Slip वर आलेला असेल तर विध्यार्थ्यांना पुन्हा एकदा Photo correction ची संधी देण्यात आली आहे.

📌 City Slip वर Remark आलेला विध्यार्थी आपला photo 25/04/2024 ते 26/04/2024 रात्री 11:59 PM पर्यंत बदलून घेऊ शकतात.

📌 ज्या विध्यार्थ्यांच्या Exam City Slip वर त्यांचा photo व्यवस्थित प्रिंट झालाय आणि कोणताही Remark आलेला नाही अशा विध्यार्थ्यांना कोणतेही correction करण्याची आवश्यकता नाही.

NTA NOTICE-

NEET 2024 CONTENT BASED VIDEO LECTURES FROM NTA

National Testing Agency (NTA) मार्फत NEET ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ‘Content Based Lectures’ ची Series उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपल्या ऑफिसिअल Website वर NTA मार्फत IIT Professors यांच्या मार्फत बनवलेली Subject Wise Lecture Series देण्यात आलेली आहे.

सदर Lecture series देत असताना हे Lecture विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि एखाद्या विषयातील Concept समजून घेण्यासाठी दिलेली आहे ह्याचा अर्थ असा नाही की ह्याच Lecture Series मधून प्रश्न येणार आहेत .अशी सूचनाही NTA कडून देण्यात आलेली आहे.

NEET 2024 – Dress Code

WHAT IS DRESS CODE FOR NEET ?

Is NEET dress code strict ?

NEET EXAM DRESS CODE FOR MALE ?

NEET EXAM DRESS CODE FOR MALE ?

NEET 2024 DRESS CODE ?

NTA मार्फत देशभरात NEET Exam 5 May 2024 रोजी होणार आहे. EXAM संदर्भातील Information bulletin NTA आपल्या वेबसाईट वर प्रकाशित केले आहे. त्यात विध्यार्थ्यांना Exam संबधित काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे परीक्षेला जाताना विध्यार्थ्याची Dressing कशी असावी हा आहे.

NTA च्या information Brochoure मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपण Male आणि Female Candidates चा Dress Code काय असावा व काय नसावा हे table स्वरूपात समजावून घेऊ.

A) FOR MALE CANDIDATES-

B) FOR FEMALE CANDIDATES-

या व्यतिरिक्त खालील वस्तुंना Exam हॉल मध्ये परवानगी नाही.

NEET परीक्षा संदर्भातील अफवांचे NTA कडून खंडन.

दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी National Testing Agency कडून विध्यार्थ्यांसाठी एक नोटीस प्रकाशित करण्यात आली आली आहे. ज्या मध्ये NTA कडून NEET परीक्षे संदर्भात Social मीडिया (समाज माध्यम ) वर पसरविल्या जाणाऱ्या अफवाना विध्यार्थ्यांनी बळी पडू नये असं सांगण्यात आले आहे.

सध्या समाज माध्यमावर NEET परीक्षा आणि लोकसभा निवडणुका या दोन्हीचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे मेसेज पसरवले जात आहे. अशाच एका अफवेच NTA कडून खंडण करण्यात आले आहे.

NTA कडून प्रकाशित झालेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की

” जे विध्यार्थी लोकसभेला मतदान करून येणार आहेत आणि त्यांच्या बोटावर मतदानाची शाई असेल अशा विध्यार्थ्यांना Exam हॉल मध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जाणार असल्याच्या अफ़वा Social Media मधून पसरवल्या जात आहेत त्याला विध्यार्थ्यांनी बळी पडू नये. विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. बोटावर शाई असल्यामुळे कोणत्याही विध्यार्थ्याची कसल्याही प्रकारची अडवणूक केली जाणार नाही. “

ह्याच बरोबर NTA नी विध्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

NTA ची ऑफिसिअल नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.