MH-CET Update

Category: MH-CET Update

राज्यातील (Veterinary) प्रवेश प्रक्रिये बदल विस्तृत माहिती.

बारावी सायन्स (PCB Group) नंतर कोणते करिअर निवडायचे हा विद्यार्थी व पालकांसाठी मोठा प्रश्न असतो, कारण १२ वी नंतर निवडलेले क्षेत्र हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते.त्यादृष्टीने पशुवैद्यकीय (Veterinary) हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

आपण जेव्हा Veterinary विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर साधारणत: एक प्रतिमा येते ती म्हणजे जनावरांचा डॉक्टर, परंतु या क्षेत्राची व्याप्ती त्याहीपेक्षा खूप जास्त आहे.

Veterinary केल्यानंतर गोपालन, शेळी- मेंढी पालन आणि कुक्कुटपालन याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे हे एक विस्तृत शास्त्र आहे. पदवीधरांना सरकारी खाते,सहकार खाते, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीसह व्यवसायाच्या ही अनेक संधी उपलब्ध आहेत.

ही पदवी ५.५ वर्षांची आहे आणि यात पहिली ४.५ वर्षे महाविद्यालयीन अभ्यासक्रम असतो. यात क्लासरूम टीचिंग, थेअरी व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके यांचा समावेश होतो. या ४.५ वर्षे कालावधीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एकूण १८ विषय शिकवले जातात.

शेवटचा १ वर्ष इंटर्नशिप कालावधी असतो, यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर प्रक्षेत्रावर अनुभवासाठी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. ५.५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSc &AH ही पदवी प्रदान करण्यात येते.

महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया

१) महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. विदर्भात नागपूर, कोकण विभागातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील शिरवळ, मराठवाडा विभागात परभणी आणि उदगीर या महाविद्यालयांचा सामावेश आहे.

२) Veterinary पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता १२ विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागते.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व इंग्रजी यामध्ये एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही टक्केवारी ४७.५० टक्के एवढी आहे.

३) प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणव‌त्तेनुसार न होता राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) या परीक्षेच्या आधारावर होते. NEET मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित होतो. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) जाऊन माहिती मिळवणे आवश्यक असते कारण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असते.

Veterinary प्रवेश प्रक्रिया नेमकी चालते कशी विस्तृत Video स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-

2023 चा राज्यातील Veterinary Colleges 3rd ROUND चा कॅटेगरी नुसार कट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-

CET /Bsc Nursing CET परीक्षेचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी CET CELL कडून महत्वाची नोटीस.

महाराष्ट्र राज्यातील ज्या विध्यार्थ्यांनी महाराष्ट्र CET चा फॉर्म ( PCB Group /PCM Group/ Bsc Nursing ) भरला आहे अशा विध्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र CET CELL कडून दिनांक -03/04/2024 रोजी परीक्षेच्या दृष्टीकोनातून एक अत्यंत महत्वाची Notice प्रकाशित केली आहे.

CET CELL या वर्षीच्या वेगवेगळ्या CET Exam च्या तारखा आधीच जाहीर केलेल्या आहेत. आता परीक्षेदरम्यान विध्यार्थ्याला एखाद्या प्रश्नावर आक्षेप असेल तर तो नोंदवण्याची संधी CET CELL कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर नोटीस मध्ये CET CELL 2 प्रश्नांच्या रूपात आक्षेप नोंदीचे उत्तर दिलेले आहेत ते प्रश्न आणि CET CELL चे उत्तर समजावून घेऊ

प्रश्न क्रमांक -1) जर परीक्षा झाल्यानंतर एखाद्या विध्यार्थ्यांनी प्रश्न पत्रिकेतल्या एखाद्या प्रश्नावर आक्षेप घेतला आणि तो आक्षेप CET CELL ची आक्षेप नोंदणी फीस भरून नोंदवला आणि विध्यार्थ्याचा आक्षेप योग्य असेल तर त्याने आक्षेप नोंदी साठी जी फीस भरली ती विध्यार्थ्याला परत मिळेल का?

CET CELL चे उत्तर – आक्षेप नोंदीची फी ही non refundable आहे, ती परत मिळणार नाही. परंतु नोंदवलेला आक्षेप योग्य असेल तर त्या प्रश्ना संदर्भातला संपूर्ण फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना समान मिळेल.

प्रश्न क्रमांक -2) जर आक्षेप बरोबर असेल तर त्याचा फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना मिळेल की ज्यांनी आक्षेप नोंदणी फीस भरून आक्षेप नोंदवला अशाच विध्यार्थ्यांना मिळेल?

CET CELL चे उत्तर- जर आक्षेप बरोबर असेल तर त्या प्रश्ना संदर्भातला फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना मिळेल.

CET CELL ची Notice पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे सकारात्मक पाऊल.

या वर्षी फी वाढ न करण्याचा निर्णय.

महाराष्ट्र राज्यातील NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येते आहे की महाराष्ट्र राज्यातील काही MBBS कॉलेज आणि काही BDS कॉलेज नी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर वर्षी राज्यातील सेमी गव्हर्नमेंट /Private महाविद्यालयाना आपल्या फी वाढीचा चा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या Fee Regulating Authority (FRA) कडे पाठवावा लागतो.मागच्या काही वर्षाचा विचार केल्यास राज्यातील बहुतांश महाविद्यालय आपल्या फी मध्ये दर शैक्षणिक वर्षाला 3-7% फी वाढीचा प्रस्ताव पाठवत असतात. परंतु या वर्षी राज्यातील 2 MBBS कॉलेज आणि 3 Dental कॉलेज यांनी FRA कडे ‘No Upward Rivision’ हा पर्याय पाठवला आहे म्हणजेच हे महाविद्यालय आपल्या फी मध्ये कोणतीही वाढ करणार नाहीत. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये जी फीस होती तीच फीस 2024 च्या विध्यार्थ्यांना लागू असणार आहेत.

कोणत्या कॉलेजनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाविद्यालयाचे मागच्यावर्षीचे कॅटेगरी नुसार फी Structure पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –

https://drive.google.com/drive/folders/18q74TPQGLGy5y4ZTAQE1S-b0V6pCJJ-8

राज्यात BAMS साठीचा SAFE SCORE ?

महाराष्ट्र राज्य CET-85% state कोटा प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने 3 ग्रुप मध्ये विभागली आहे.

1) Group A (MBBS /BDS)
2) Group B (BAMS/BHMS/BUMS)
3) Group C (Physiotherapy and Other Therapy Courses)

विध्यार्थी एकाच वेळी तिन्ही प्रक्रियेत भाग घेऊ शकतो. 2020 पासून MBBS नंतर BAMS ही विध्यार्थ्यांची दुसरी पसंती राहिलेली आहे. MBBS नंतरचा दुसरा महत्वाचा करिअर चा मार्ग म्हणून बहुतांश विध्यार्थी BAMS कडे वळताना आपण पाहतो ह्यात प्रामुख्याने मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात BAMS मिळवण्यासाठी NEET परीक्षेत कमीत कमी किती स्कोर अपेक्षित आहे ह्याचा अंदाज विध्यार्थ्यांना यावा म्हणून 2023 च्या BAMS Counselling Process दरम्यान चा तिसऱ्या round चा कॅटेगरी नुसार Cut ऑफ पाहणे गरजेचे आहे.

BAMS THIRD ROUND CUT OFF MARKS AND ALLOTTED COLLEGES

SC-342M.S. Ayurvedic Medical College, Gondia
ST-238 -SHANTABAI SHIVSHANKAR AYURVEDIC COLLEGE JATH SANGLI
VJ -344 -SMT VIMALADEVI AYURVEDIC COLLEGE CHANDRAPUR
NT1-340-ADITYA AYURVEDIC COLLEGE BEED
NT2-347-ADITYA AYURVEDIC COLLEGE BEED
NT3-349-350-SHIVAJIRAO PAWAR AYURVEDIC MEDICAL COLLEGE NAGAR
OBC-347-PARAM PUJYA GURUMAULI ANNASAHEB MORE AYURVEDIC COLLEGE BEED
Open/EWS-348-ADITYA AYURVEDIC COLLEGE BEED

2023 चा तिसऱ्या round नंतरही महाराष्ट्र CET CELL मार्फत आणखी 3 Vacancy Round घेतले होते त्यात हा Cut ऑफ आणखी 20-25 मार्कांनी खाली आलेला होता. परंतु कुठल्याही परिस्थिती मध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यात BAMS मिळावायचे असेल तर तिसऱ्या round चा कट ऑफ पाहणेच जास्त योग्य ठरेल कारण वरील मार्कांचे टार्गेट ठेवून विध्यार्थ्यांनी आपले Planning केले तर महाराष्ट्र राज्यात निश्चित त्यांना एखादं Private BAMS कॉलेज मेरिट वर आधारित मिळेल.

वरील कॉलेज चा Cut ऑफ पाहून तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील कमी Cut ऑफ चे आयुर्वेदिक महाविद्यालय कोणती आहेत ह्याचा सुद्धा अंदाज येइल.

महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing प्रवेश प्रक्रिया कशी असते ?

2023 च्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे Admission हे NEET Exam च्या मार्क्स वर होतं होते. परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाने Bsc Nursing प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र CET Exam घेण्याचे ठरवले.2023 पासून राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट तसेच सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण Private Colleges म्हणतो यांचे Admission हे Bsc Nursing CET Exam च्या मार्क्सच्या आधारावर होतात.

राज्यात महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रनाखाली
1) Govt Bsc Nursing College
2) Private /Semi Government Bsc Nursing College

अशा दोन प्रकारच्या कॉलेजचा समावेश आहे. ह्या मध्ये विध्यार्थ्यांच्या CET परीक्षेच्या गुणाच्या मेरिट वर आधारित कॉलेजचे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवून साधारण प्रवेश प्रक्रियेच्या 3-4 round मधून प्रवेश प्रक्रिया पार पडतात.

Bsc Nursing Admission साठी कोणते विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत (Eligibility Criteria)-

1) विध्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.

2)विध्यार्थ्याचे Domacile (रहिवासी प्रमाणपत्र ) महाराष्ट्र राज्यातील असावे. (बाहेरील राज्यातील विध्यार्थी फक्त NRI कोटा /Institutional कोटा /Management कोटा साठीच पात्र असतील)

3) Candidate should have passed in the subjects of PCB and English individually and must have obtained a minimum of 45% marks taken together in PCB at the qualified examination i.e. (10 + 2)

4) The candidates belonging to SC / ST or other backward classes, the marks obtained in PCB taken together in qualifying examination be 40% instead of 45% as stated above. English is a compulsory subject in 10 + 2 for being eligible for admission to B.Sc Nursing OR as prescribed by the Indian Nursing Council from time to time.

Bsc Nursing केल्यानंतरच्या करिअर च्या संधी?

सध्याचे वातावरण आणि रोगराईचे प्रमाण पाहता या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहे. करोना काळात या सगळ्याचे महत्व आपण जाणलेच. त्यामुळे नर्सिंग हे अनेक मोठ्या संधींनी भरलेले क्षेत्र आहे. ज्यामध्ये सरकारी, निम सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यामध्ये तुम्ही नोकरी करू शकता. याशिवाय सरकारी आस्थापना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह अशा ठिकाणीही परिचर आणि परिचारिका यांना उत्तम संधी असते. सध्या या क्षेत्रात वेतनही भरपूर दिले जात आहे. एवढेच नव्हे तर परदेशातही संधी उपलब्ध आहेत.

Bsc Nursing प्रवेश प्रक्रियेबाबतची संपूर्ण विस्तृत माहिती खालील pdf मध्ये देण्यात आलेली आहे ज्यात राज्यातील Bsc Nursing कॉलेजची नावे. कॉलेज फीस, प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या इ. माहिती वाचण्यासाठी खालील pdf लिंक वर क्लिक करा –