देशभरातल्या संपूर्ण MBBS कॉलेज ची लिस्ट कुठे पाहावी ?
Top M.B.B.S. Colleges in Maharashtra 2024 ?
List of Medical Colleges in Maharashtra Course wise Seats
NEET 2024 ची परीक्षा अगदी काही दिवसावर आलेली आहे. 5 May रोजी संपूर्ण देशभरात NEET UG 2024 Exam होणार आहे. (NEET 2024 EXAMS)
दरम्यान च्या काळात राज्यातील बहुतेक पालक आणि विध्यार्थी आधीपासूनच MBBS College List तसेच BAMS College List त्याचबरोबर MBBS Cut off, BAMS Cut off त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील MBBS Fees, BAMS Fees/ BDS FEES इत्यादी यांची माहिती गोळा करत असल्याचे आपण पाहतो आहोत.
महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाल्यास राज्यातील पालक राज्यातील Top MBBS College तसेच Top BAMS Colleges, Top BDS colleges, Top BHMS colleges,Top Physiotherapy Colleges ,Top Bsc Nursing Colleges इत्यादी ची माहिती गोळा करताना दिसत आहेत.
अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी NMC (National Medical Commission) ने आपल्या Website वर List of College Teaching MBBS च्या tab खाली देशभरातील संपूर्ण राज्यातील Government MBBS colleges / Private MBBS Colleges /Deemed University MBBS colleges/Central University MBBS Colleges/ AIIMS/JIPMER/AFMC Pune इत्यादीची यादी दिलेली आहे. ज्यात विध्यार्थी आणि पालक प्रत्येक राज्यानुसार त्याचबरोबर College स्थापना तसेच College NMC permission इत्यादी ची विस्तृत माहिती पाहू शकतात . पाहण्यासाठी खालील button वर क्लिक करा.
सदर list नुसार देशभरात 706 MBBS Colleges असून त्यात 109145 MBBS Seats आहेत. 2024 मध्ये संपूर्ण देशभरात आणखी काही MBBS Colleges ला NMC कडून मान्यता मिळण्याची दाट श्यक्यता आहे.
उत्तर : तुम्ही जर 2024 किंवा त्याआधी बारावीची परीक्षा पास झालेला असाल तर बारावी परीक्षा पास झाल्यानंतर आज पर्यंत तुम्ही कुठल्याही कोर्सला प्रवेश घेतला नाही याबद्दलचे सर्टिफिकेट म्हणजेच गॅप सर्टिफिकेट (शैक्षणिक खंड) . याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुम्ही शैक्षणिक गॅप घेतलेला आहे.
2) मी बारावीची परीक्षा 2025 मध्ये उत्तीर्ण झालो तर मला गॅप सर्टिफिकेट काढावे लागेल काय ?
उत्तर : नाही
3) गॅप सर्टिफिकेट कोठून मिळते ?
उत्तर : गॅप सर्टिफिकेट तहसील ऑफिस/सेतू केंद्रातून मिळते. गॅप सर्टिफिकेट शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपर वर टाईप करून नोटरी करावे लागते.
4) गॅप सर्टिफिकेट चा काही स्टॅंडर्ड फॉरमॅट आहे का ?
उत्तर : नाही, विध्यार्थ्यांच्या सोईसाठी आम्ही लेखाच्या खाली गॅप सर्टिफिकेट चा एक फॉरमॅट देत आहोत.
5) गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का ?
उत्तर : होय, तुम्ही जर बारावीची परीक्षा 2024 किंवा त्याआधी पास झालेले असाल तर गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे.
6) गॅप सर्टिफिकेट कधी उपयोगात येते ?
उत्तर – जेंव्हा प्रवेश प्रक्रियेदरम्यान तुम्हाला एखादे कॉलेज मिळते ( Allot ) होते. कॉलेजला Admission घेत असताना तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावे लागते.
7) गॅप सर्टिफिकेट मराठी मध्ये असावे की इंग्रजी मध्ये ?
उत्तर – महाराष्ट्र राज्यात दोन्ही पैकी कुठल्याही भाषेत असले तरी चालेल.
NEET परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच Private कॉलेजच्या सर्व Medical Admission प्रक्रिया CET CELL महाराष्ट्र (cet cell maharashtra) च्या वेबसाईट वरून पार पडतात. Admission process चा फॉर्म भरत असतानाच विध्यार्थ्यांना आपल्या कौटुंबिक उत्पनाची माहिती द्यावी लागते तसेच प्रत्यक्ष Admission घेत असताना विध्यार्थ्यांना Income Certificate (उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागते) .Medical Admission Process दरम्यान हे एक अत्यंत महत्वाचे Document आहे. या बद्दलच आपण विस्तृत माहिती पाहणार आहोत.
1) उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा फायदा काय ?
उत्तर : जर तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला काही प्रमाणात फी माफ होते. ही फी सवलत इ. बी. सी. (Economically Backward Class) अंतर्गत मिळते.
2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर किती फी माफ होते ?
उत्तर : OPEN/EWS/OBC कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांकडे जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर साधारणतः 50% फी माफ होते व 50 टक्केच फी भरावी लागते. उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कॉलेजची वार्षिक ट्यूशन फी जर दहा लाख रुपये असेल तर OPEN/EWS/OBC या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना साधारणतः पाच लाख रुपये भरावे लागतील. SBC/VJ/NT1/NT2/NT3 कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांकडे जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर साधारणतः 90% फी माफ होते व 10 टक्केच फी भरावी लागते. उदाहरणार्थ- एखाद्या खाजगी कॉलेजची वार्षिक ट्यूशन फी जर दहा लाख रुपये असेल तर SBC/VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना साधारणतः 1 लाख रुपये भरावे लागतील.
3) फी माफी चा फायदा सर्व कॉलेजेस मध्ये मिळतो का ?
उत्तर : होय ही माफी चा फायदा महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस मध्ये मिळतो.
4) फी माफी चा फायदा कोणत्या अभ्यासक्रमांसाठी मिळतो ?
उत्तर : फी माफी चा फायदा सर्वच अभ्यासक्रमांसाठी जसे की MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotherapy /Nursing/साठी मिळतो.
5) फी माफी चा फायदा ऍडमिशन घेतानाच मिळतो की ऍडमिशन घेताना पूर्ण फी भरावी लागते व नंतर फी वापस येते ?
उत्तर : महाराष्ट्र शासनाने सर्वच खाजगी कॉलेजेसना वारंवार सूचना व ताकीद दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत मिळू शकत असेल आणि जर विद्यार्थ्यांकडे त्यासंबंधीची कागदपत्रे असतील तर त्यांना प्रवेशाच्या वेळीच फी माफीची सवलत द्यावी पूर्ण फीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. म्हणजेच एखाद्या खाजगी कॉलेजची वार्षिक ट्यूशन फी दहा लाख रुपये असेल आणि VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरी च्या मुलाकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर त्या कॉलेजने प्रवेशाच्या वेळी एक लाख रुपये एवढीच ही घेतली पाहिजे. साधारणतः नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त खाजगी कॉलेजेस शासनाच्या आदेशाचे पालन करतात परंतु काही कॉलेजेस अडवणूक करू शकतात.
6) उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते काय ?
उत्तर : होय उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते. ज्या वर्षी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त होईल त्या वर्षी पूर्ण फी भरावी लागेल परंतु ऍडमिशन ला काहीही धोका होणार नाही.
7) उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा काय ?
उत्तर : यासाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत आहे.
8) मला यावर्षी 2024 मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे तर उत्पन्नाचे कोणत्या वर्षाचे प्रमाणपत्र लागेल ?
उत्तर : 2023-24 (चालू आर्थिक वर्ष) या आर्थिक वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल.
( 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणे आवश्यक )
9) उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुठून मिळते ?
उत्तर : उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील ऑफिस/सेतू केंद्र/ ई सेवा केंद्र येथून मिळू शकते.
10) माझ्याकडे मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे ते चालेल का ?
उत्तर : होय ते सुद्धा चालेल, पण त्यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा उल्लेख आलेला पाहिजे.
11) उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते काय ?
उत्तर : होय दरवर्षी द्यावे लागते.
12) पुढील वर्षी माझे उत्पन्न आठ लाखाच्या वर जाऊ शकते ?
उत्तर : पुढील किंवा त्यानंतरच्या वर्षी जर तुमचे उत्पन्न आठ लाखाच्या वर गेले तर त्या वर्षी FEES सवलत मिळणार नाही. परंतु ऍडमिशन ला काहीही धोका नाही.
13) मी SC/ST या कॅटेगिरीतुन आहे. मला सुद्धा उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढावे लागेल काय ?
उत्तर : नाही SC/ST या कॅटेगिरी साठी उत्पन्नाची मर्यादा नाही. तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागत नाही.
14) उत्पन्नाचे प्रमाणपत्र केव्हा द्यावे लागेल ?
उत्तर : ज्या वेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना जाता त्यावेळी द्यावे लागते.
15) मी OBC/SBC/SEBC/VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरीतुन आहे. माझ्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आहे, परंतु उत्पन्नाचे प्रमाणपत्र नाही.?
उत्तर : तुमच्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कॅटेगिरी ची सीट मिळते, परंतु फी मध्ये सवलत हवी असेल, स्कॉलरशिप हवी असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
16) मी OBC/SBC/SEBC/VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरीतुन आहे. माझ्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आहे, परंतु माझ्या पालकांचे या आर्थिक वर्षाचे उत्पन्न आठ लाखाच्यावर आहे ?
उत्तर : तुमच्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कॅटेगिरी ची सीट मिळेल, परंतु तुमच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखाच्यावर असल्यामुळे तुम्हाला फी मध्ये सवलत मिळणार नाही, स्कॉलरशिप मिळणार नाही, पूर्ण फी भरावी लागेल.
17) मी OPEN या कॅटेगिरीतुन आहे. माझ्या पालकांचे या आर्थिक वर्षाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे ?
उत्तर : तुमच्या पालकांचे उत्पन्न जर आठ लाखांपेक्षा कमी असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून घ्या. तुम्हाला फीमध्ये 50 टक्के सवलत मिळेल. तसेच महाराष्ट्राचे EWS प्रमाणपत्र सुधा काढून घ्या, शासकीय महाविद्यालयांमध्ये तुम्हाला EWS या जागांचा लाभ घेता येईल.
18) उत्पन्नाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र बाहेर प्रवेशासाठी चालते का ?
उत्तर : उत्पन्नाचे प्रमाणपत्र महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात कोणत्याही खाजगी कॉलेजमध्ये चालत नाही.
19) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून बारा लाखांपर्यंत वाढ होऊ शकते असे ऐकले आहे ?
उत्तर : सातवा वेतन आयोग लागल्यानंतर मागच्या दोन वर्षापासून ही चर्चा ऐकायला मिळते, परंतु आज रोजी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत आहे, भविष्यात जर उत्पन्नाची मर्यादा वाढली तर त्या प्रमाणे फायदा मिळेल.
20) उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि EWS प्रमाणपत्र या मध्ये फरक काय ?
उत्तर : उत्पन्नाच्या प्रमाणपत्रा मुळे FEES मध्ये सवलत मिळते, EWS प्रमाणपत्रा मुळे EWS साठीच्या 10% जागांचा फायदा मिळू शकतो.
1 STATE Government च्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्राच्या OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता नसते, STATE OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.
2 महाराष्ट्र राज्यात NT आणि VJ ह्या स्वतंत्र Cast आहेतत्यांना त्यांची स्वतंत्र Caste सर्टिफिकेट काढावी लागतात
3 राज्याच्या OBC सर्टिफिकेट ला तारखेचे बंधन नाही. Cast Certificate जुने असले तरी चालतं. किंवा नवीन काढलं तरी हरकत नाही
4 महाराष्ट्र राज्यातील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळी मात्र आपणास स्टेट चे ओबीसी प्रमाणपत्र आवश्यक असते त्यावेळी केंद्राचे चालत नाही. तसेच त्यावेळी
A.जात प्रमाणपत्र (CASTE CERTIFICATE)
B. उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)
C.जात पडताळणी प्रमाणपत्र (CASTE VALIDITY )
हे तिन्ही असतील तर च आरक्षणाचा लाभ मिळतो
5 सहसा STATE OBC सर्टिफिकेट वर फॉर्म नंबर -8 असतो. आणि त्यावर Government of Maharashtra असा उल्लेख असतो.
Paid Counaelling Course अगदी माफक फीस मध्ये जॉईन करा
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 प्रकारचे BHMS Colleges आहेत.
1) Govt 2) Private/Semi Govt 3) Deemed
वरील पैकी Govt आणि Pvt BHMS कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया ह्या CET CELL च्या Website वरून होतात तर Deemed University BHMS महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया केंद्र शासनाच्या AACCC च्या Website वरून होतात.
महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून State Qouta Counselling प्रक्रिया महत्वाची आहे कारण राज्यातील Govt आणि Private BHMS colleges मध्ये विध्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात.
महाराष्ट्र राज्यात BHMS Colleges च्या संख्येचा विचार केला तर 1 Government BHMS आणि जवळपास 59 Private BHMS Colleges आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे, ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्या मार्फत 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे, परिपत्रकानुसार टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची परीक्षा फी परत मिळणार आहे.
जीआर नुसार राज्यातील दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळ आहेत यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना ही परीक्षा फी परत मिळणार आहे, म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला फी मिळणार आहे.
3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत विधार्थी/पालकांचे बँक details अकाउंट आहे ते तुमच्या शाळेमध्ये /कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे.
महाराष्ट्र राज्यात 3 प्रकारचे Physiotherapy (BPTH) कॉलेजेस आहेत.
1) Govt Physiotherapy Colleges 2) Private/ Semi Govt Physiotherapy Colleges 3) Deemed University Physiotherapy Co
1) वरील पैकी Govt आणि Semi Govt कॉलेज मधील जागा ह्या NEET Exam च्या मार्क्सच्या आधारावर होतात.
2) परंतु राज्यात Deemed University Physiotherapy Admission साठी त्या त्या Deemed University ची स्वतंत्र CET Exam होतं असते.
3) अशाच राज्यातील नावाजलेल्या Deemed University (MGM Navi Mumbai/Krishna Inst. Karad/PRAVARA LONI/BHARATI VIDYAPITH ) आहेत ज्यांनी 2024 च्या Physiotherapy Admission साठी CET Exam वेळापत्रक प्रकाशित केलं आहे.
📅 Last Date to Apply: 19th May, 2024 ⏰ Last Date to Apply with Late Fee: 24th May, 2024 💵 Application Fees: Rs. 1,500/- 📆 Examination Date: To be Declared 📝Mode of Examination: Offline
राज्यातील ज्या विध्यार्थ्यांना वरील Deemed University मध्ये physiotherapy करायचे आहे त्यांनी आपला Application फॉर्म संबंधित वेबसाईट वर जाऊन भरून घ्यावा.
Physiotherapy Deemed University Fees ही साधारपणे 2.5-3 लाख संपूर्ण कॅटेगरीच्या students साठी आहे. Deemed University मध्ये कसल्याही प्रकारचे कॅटेगरीचे फायदे मिळत नाहीत.
बारावी सायन्स (PCB Group) नंतर कोणते करिअर निवडायचे हा विद्यार्थी व पालकांसाठी मोठा प्रश्न असतो, कारण १२ वी नंतर निवडलेले क्षेत्र हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते.त्यादृष्टीने पशुवैद्यकीय (Veterinary) हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
आपण जेव्हा Veterinary विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर साधारणत: एक प्रतिमा येते ती म्हणजे जनावरांचा डॉक्टर, परंतु या क्षेत्राची व्याप्ती त्याहीपेक्षा खूप जास्त आहे.
Veterinary केल्यानंतर गोपालन, शेळी- मेंढी पालन आणि कुक्कुटपालन याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे हे एक विस्तृत शास्त्र आहे. पदवीधरांना सरकारी खाते,सहकार खाते, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीसह व्यवसायाच्या ही अनेक संधी उपलब्ध आहेत.
ही पदवी ५.५ वर्षांची आहे आणि यात पहिली ४.५ वर्षे महाविद्यालयीन अभ्यासक्रम असतो. यात क्लासरूम टीचिंग, थेअरी व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके यांचा समावेश होतो. या ४.५ वर्षे कालावधीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एकूण १८ विषय शिकवले जातात.
शेवटचा १ वर्ष इंटर्नशिप कालावधी असतो, यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर प्रक्षेत्रावर अनुभवासाठी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. ५.५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSc &AH ही पदवी प्रदान करण्यात येते.
महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया
१) महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. विदर्भात नागपूर, कोकण विभागातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील शिरवळ, मराठवाडा विभागात परभणी आणि उदगीर या महाविद्यालयांचा सामावेश आहे.
२) Veterinary पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता १२ विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागते.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व इंग्रजी यामध्ये एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही टक्केवारी ४७.५० टक्के एवढी आहे.
३) प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणवत्तेनुसार न होता राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) या परीक्षेच्या आधारावर होते. NEET मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित होतो. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) जाऊन माहिती मिळवणे आवश्यक असते कारण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असते.
Veterinary प्रवेश प्रक्रिया नेमकी चालते कशी विस्तृत Video स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-
2023 चा राज्यातील Veterinary Colleges 3rd ROUND चा कॅटेगरी नुसार कट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-
महाराष्ट्र राज्यातील NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येते आहे की महाराष्ट्र राज्यातील काही MBBS कॉलेज आणि काही BDS कॉलेज नी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दर वर्षी राज्यातील सेमी गव्हर्नमेंट /Private महाविद्यालयाना आपल्या फी वाढीचा चा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या Fee Regulating Authority (FRA) कडे पाठवावा लागतो.मागच्या काही वर्षाचा विचार केल्यास राज्यातील बहुतांश महाविद्यालय आपल्या फी मध्ये दर शैक्षणिक वर्षाला 3-7% फी वाढीचा प्रस्ताव पाठवत असतात. परंतु या वर्षी राज्यातील 2 MBBS कॉलेज आणि 3 Dental कॉलेज यांनी FRA कडे ‘No Upward Rivision’ हा पर्याय पाठवला आहे म्हणजेच हे महाविद्यालय आपल्या फी मध्ये कोणतीही वाढ करणार नाहीत. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये जी फीस होती तीच फीस 2024 च्या विध्यार्थ्यांना लागू असणार आहेत.
कोणत्या कॉलेजनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
1) Kashibai Navale Medical College Pune (MBBS)
2) Ashwini Rural Medical College Solapur (MBBS)
3) Yogita Dental College Ratnagiri (BDS)
4) SMBT Dental College Nagar(BDS)
5) KBH Dental College Nashik (BDS)
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाविद्यालयाचे मागच्यावर्षीचे कॅटेगरी नुसार फी Structure पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –