MH-CET Update

Category: Uncategorized

महाराष्ट्र राज्यातील Deemed University Physiotherapy Admission प्रक्रियेला सुरुवात

महाराष्ट्र राज्यात 3 प्रकारचे Physiotherapy (BPTH) कॉलेजेस आहेत.

1) Govt Physiotherapy Colleges
2) Private/ Semi Govt Physiotherapy Colleges
3) Deemed University Physiotherapy Co

1) वरील पैकी Govt आणि Semi Govt कॉलेज मधील जागा ह्या NEET Exam च्या मार्क्सच्या आधारावर होतात.

2) परंतु राज्यात Deemed University Physiotherapy Admission साठी त्या त्या Deemed University ची स्वतंत्र CET Exam होतं असते.

3) अशाच राज्यातील नावाजलेल्या Deemed University (MGM Navi Mumbai/Krishna Inst. Karad/PRAVARA LONI/BHARATI VIDYAPITH ) आहेत ज्यांनी 2024 च्या Physiotherapy Admission साठी CET Exam वेळापत्रक प्रकाशित केलं आहे.

A) MGM CET बदल –

Courses :

B.Physiotherapy ,BPO, B.Pharmacy, D.Pharmacy.

Campus : MGM Navi Mumbai (Kamothe), MGM Aurangabad

Last date to apply:
5th July 2024

Exam Date :14th July 2024

Note : ही परीक्षा MBBS BDS admissions साठी नाही

B) Krishna Institute Karad CET बदल-

Courses Offered:

  • B.Sc Nursing
  • ⁠Physiotherapy
  • B.Pharmacy
  • Pharm D
  • B.Sc Medical Imaging Technology
  • B.Sc Perfusion Technology
  • B.Sc Cardiac Care
  • B.Sc Neurophysiology

📅 Exam Date: 29th May 2024

🕚 Timing: 11 am to 12.15 pm

🖥️ Online Proctored Exam

📝Application Dates:

  • Start Date: 04th April 2024
  • Last Date: 25th May 2024

Entrance Fee: Rs. 500/-

C) Bharati विद्यापीठ

Campus : Pune & Sangli

Courses :

  • B.Optometry
  • B.Physiotherapy
  • B.Sc.Biotechnology
  • BASLP

Deadline to apply for:
1st session : 1st June 2024
2nd session : 13th June 2024

Exam Dates :
Session 1 : 9th June 2024
Session 2 : 23th June 2024

Application Fees: 1500₹

D) PRAVARA INSTITUTE OF MEDICAL SCIENCES LONI

Programs offered:
🩺 BPth
👩‍⚕️ B.Sc Nursing
💊 BPharm
🧬 B.Sc (Hons.) R.T.T
🔬 B.Sc (Hons.) MRIT
🧫 B.Sc (Hons.) Medical Biotechnology
🩺 BPH (Hons.)

📅 Last Date to Apply: 19th May, 2024
Last Date to Apply with Late Fee: 24th May, 2024
💵 Application Fees: Rs. 1,500/-
📆 Examination Date: To be Declared
📝Mode of Examination: Offline

राज्यातील ज्या विध्यार्थ्यांना वरील Deemed University मध्ये physiotherapy करायचे आहे त्यांनी आपला Application फॉर्म संबंधित वेबसाईट वर जाऊन भरून घ्यावा.

Physiotherapy Deemed University Fees ही साधारपणे 2.5-3 लाख संपूर्ण कॅटेगरीच्या students साठी आहे. Deemed University मध्ये कसल्याही प्रकारचे कॅटेगरीचे फायदे मिळत नाहीत.

राज्यातील (Veterinary) प्रवेश प्रक्रिये बदल विस्तृत माहिती.

बारावी सायन्स (PCB Group) नंतर कोणते करिअर निवडायचे हा विद्यार्थी व पालकांसाठी मोठा प्रश्न असतो, कारण १२ वी नंतर निवडलेले क्षेत्र हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते.त्यादृष्टीने पशुवैद्यकीय (Veterinary) हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

आपण जेव्हा Veterinary विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर साधारणत: एक प्रतिमा येते ती म्हणजे जनावरांचा डॉक्टर, परंतु या क्षेत्राची व्याप्ती त्याहीपेक्षा खूप जास्त आहे.

Veterinary केल्यानंतर गोपालन, शेळी- मेंढी पालन आणि कुक्कुटपालन याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे हे एक विस्तृत शास्त्र आहे. पदवीधरांना सरकारी खाते,सहकार खाते, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीसह व्यवसायाच्या ही अनेक संधी उपलब्ध आहेत.

ही पदवी ५.५ वर्षांची आहे आणि यात पहिली ४.५ वर्षे महाविद्यालयीन अभ्यासक्रम असतो. यात क्लासरूम टीचिंग, थेअरी व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके यांचा समावेश होतो. या ४.५ वर्षे कालावधीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एकूण १८ विषय शिकवले जातात.

शेवटचा १ वर्ष इंटर्नशिप कालावधी असतो, यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर प्रक्षेत्रावर अनुभवासाठी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. ५.५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSc &AH ही पदवी प्रदान करण्यात येते.

महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया

१) महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. विदर्भात नागपूर, कोकण विभागातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील शिरवळ, मराठवाडा विभागात परभणी आणि उदगीर या महाविद्यालयांचा सामावेश आहे.

२) Veterinary पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता १२ विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागते.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व इंग्रजी यामध्ये एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही टक्केवारी ४७.५० टक्के एवढी आहे.

३) प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणव‌त्तेनुसार न होता राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) या परीक्षेच्या आधारावर होते. NEET मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित होतो. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) जाऊन माहिती मिळवणे आवश्यक असते कारण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असते.

Veterinary प्रवेश प्रक्रिया नेमकी चालते कशी विस्तृत Video स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-

2023 चा राज्यातील Veterinary Colleges 3rd ROUND चा कॅटेगरी नुसार कट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे सकारात्मक पाऊल.

या वर्षी फी वाढ न करण्याचा निर्णय.

महाराष्ट्र राज्यातील NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येते आहे की महाराष्ट्र राज्यातील काही MBBS कॉलेज आणि काही BDS कॉलेज नी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर वर्षी राज्यातील सेमी गव्हर्नमेंट /Private महाविद्यालयाना आपल्या फी वाढीचा चा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या Fee Regulating Authority (FRA) कडे पाठवावा लागतो.मागच्या काही वर्षाचा विचार केल्यास राज्यातील बहुतांश महाविद्यालय आपल्या फी मध्ये दर शैक्षणिक वर्षाला 3-7% फी वाढीचा प्रस्ताव पाठवत असतात. परंतु या वर्षी राज्यातील 2 MBBS कॉलेज आणि 3 Dental कॉलेज यांनी FRA कडे ‘No Upward Rivision’ हा पर्याय पाठवला आहे म्हणजेच हे महाविद्यालय आपल्या फी मध्ये कोणतीही वाढ करणार नाहीत. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये जी फीस होती तीच फीस 2024 च्या विध्यार्थ्यांना लागू असणार आहेत.

कोणत्या कॉलेजनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाविद्यालयाचे मागच्यावर्षीचे कॅटेगरी नुसार फी Structure पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –

https://drive.google.com/drive/folders/18q74TPQGLGy5y4ZTAQE1S-b0V6pCJJ-8

Recent News