डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक शैक्षणिक सहाय्य योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाते. ही योजना विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत मजूर किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे, जेणेकरून त्यांचे शिक्षण पैशा अभावी खंडित होणार नाही.

1) व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना (उदा., MBBS, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पदवी इ.) प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
शासकीय, अशासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित, किंवा कायम विनाअनुदानित महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी (खाजगी अभिमत किंवा स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून).
2) पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असलेले विद्यार्थी.
3) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी

विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे (EWS साठी).
विद्यार्थ्याने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) प्रवेश घेतलेला असावा.
विद्यार्थी पूर्णवेळ नोकरी करत नसावा.
वसतिगृहात राहत असल्याचा पुरावा (शासकीय/खाजगी वसतिगृह किंवा पेइंग गेस्ट करार).

उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले).
अधिवास प्रमाणपत्र.
पालकांचे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र.
वसतिगृहात राहत असल्याचा पुरावा.
बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र.
आधार संलग्न बँक खाते तपशील.

पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट निर्वाह भत्ता जमा केला जातो.
नोट- वर दिलेली माहिती ही शासनाच्या वेगवेगळ्या Website वरून घेतलेली आहे. योजनेत वेळोवेळी होणारे बदल लाभाची रक्कम इ बाबतीत अधिक माहिती विद्यार्थी संबंधित महाविद्यालयातून घेऊ शकतात
