10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

By ANKUSH PATIL 8 April 2024

Share this News

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे, ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्या मार्फत 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे, परिपत्रकानुसार टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची परीक्षा फी परत मिळणार आहे.

जीआर नुसार राज्यातील दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळ आहेत यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना ही परीक्षा फी परत मिळणार आहे, म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला फी मिळणार आहे.

3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत विधार्थी/पालकांचे बँक details अकाउंट आहे ते तुमच्या शाळेमध्ये /कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SSC refund मध्ये विध्यार्थ्याचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HSC refund मध्ये विध्यार्थ्याचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

NEET परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर. RE NEET RESULT DECLAIRED 2024

सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार Grace मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे Grace मार्क्स काढून घेऊन 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा NEET UG परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती.

23/06/2024 रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी पुन्हा RE NEET देण्याचा निर्णय घेऊन परीक्षा दिली.

आता त्यांचा Result जाहीर करण्यात आलेला आहे. या मुलांच्या Result मुळे बाकी विद्यार्थ्यांच्या रँक मध्ये बदल होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला result पुन्हा डाउनलोड करून घ्यावा.

MAHARASHTRA GOVT SERVICE BOND AFTER MBBS

महाराष्ट्र राज्यात MBBS केल्या नंतर विद्यार्थ्याला द्याव्या लागणाऱ्या Service बदल शासनाचे काही नियम आहेत त्या संदर्भातला महत्वाचा GR DMER च्या website वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

EDUCATION LOAN INTEREST IN INDIA

12 वी चे निकाल लागलेले आहेत.थोड्याच दिवसात वेगवेगळ्या CET आणि Entrance Exam (NEET) चे सुद्धा निकाल जाहीर होतील त्या नंतर प्रत्येक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.

विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेस ला प्रवेश घेण्याचे स्वप्न बाळगून आहेत. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांकडे पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्ण तयारी असेलच असे नाही. राज्यातील बहुतांश पालक हे बँक loan वर सुद्धा अवलंबून आहेत.

Education loan विषयी बोलायचे झाल्यास वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर वेगवेगळे आहेत.
खालील दिलेल्या button वर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर किती आहे हे पाहू शकता.

MHARASHTRA GOVT MBBS COLLEGES CAMPUS TOUR

श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील MBBS कॉलेजच्या Campus Tour video स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.

सध्या NEET चा पेपर झाला आहे. वेगवेगळ्या Coaching Classes च्या answer key वरून विद्यार्थ्यांनी आपला Score Calculate केला आहे.

आता विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजची माहिती शोधण्यात व्यस्त आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही वेगवेगळ्या कॉलेजच्या Campus Tour Video उपलब्ध करून देत आहोत.

नोट – सदर video आम्ही Youtube या सार्वजनिक प्लॅटफॉर्म वरून वेगवेगळ्या चॅनेल वरून मिळवलेले आहेत.यात दिलेल्या माहितीच्या सत्यता तपासली नसून फक्त अभ्यासासाठी हे video उपलब्ध करून देत आहोत.

कॉलेज campus video पाहण्यासाठी कॉलेज च्या नावावर क्लिक करा

Nationality आणि Domacile सर्टिफिकेट बदल महत्वाचे.

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही प्रवेश प्रक्रियेत (Admission Process) मध्ये भाग घेण्यासाठी Nationality and Domacile हे अत्यंत महत्वाचे Document आहे.

विशेषतः महाराष्ट्र State कोटा प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील Domacile सर्टिफिकेट असणे अत्यंत गरजेचे आहे. जर महाराष्ट्र Domacile नसेल तर विद्यार्थी महाराष्ट्र State कोटा 85% प्रवेश प्रक्रियेसाठी Merit सीट्स वर पात्र होतं नाही.

Nationality आणि Domacile Certificate तहसील कार्यालयातून दिले जाते. बऱ्याचदा ‘Certificate of Age Nationality and Domacile’ असे एकत्रित Nationality आणि Domacile दिले जाते.

तर काही ठिकाणी ‘Certificate of Age and Nationality’ आणि Certificate of Age and Domacile असे दोन वेगवेगळे सर्टिफिकेट दिले जातात.

विद्यार्थ्यानी आपले Domacile सर्टिफिकेट व्यवस्थित तपासावे त्यात दोन्ही Certificate एकत्र आहेत का याची खात्री करावी. किंवा दोन्ही वेगवेगळे असतील तरी अडचण नाही.परंतु वरील दोन्ही पैकी एकाच उल्लेख असेल तर दुसऱ्या साठी अर्ज करावा.

जर तुमच्या सर्टिफिकेट वर फक्त Age and domacile असेल तर तुमचे 12वीचे Leaving सर्टिफिकेट (T.C.) पहावी त्यावर Nationality -Indian असे लिहले असेल तर तुम्ही Leaving सर्टिफिकेट सुद्धा Nationality सर्टिफिकेट म्हणून वापरू शकता.परंतु तहसील कार्यालयातून Nationality काढले तर अधिक चांगले

विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न पडतो की Nationality आणि Domacile 2024 अगोदर काढलेले असेल तर चालेल का? तर ह्याच उत्तर हो आहे कारण Nationality आणि Domacile ला तारखेचे बंधन नाही कधीही काढलेले असेल तरी चालेल.

महत्वाचे – सध्या संपूर्ण Documents हे ऑनलाईन पद्धतीने निघत आहेत व त्यावर Digital सही चा उपयोग केला जात आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालयातून काढलेल्या किंवा Sub Divisional Office मधून काढलेल्या प्रत्येक Documents च्या शेवटी आपल्या Documents वर Digital Sign चा Right मार्क्स (✔️) आहे का बघावा. जर त्या जागी Question मार्क असेल तर अडचणी येऊ शकतात.

NEET 2024 Exam City Slip जाहीर.

NEET 2024 EXAM CITY DECLAIRED

NEET 2024 चे Application फॉर्म भरलेल्या विध्यार्थ्यांसाठी NTA कडून Exam City जाहीर झाल्या आहेत. या वर्षी NTA ने विध्यार्थ्यांकडून Exam देण्यासाठी दोनच City चे option भरून घेतले होते. विध्यार्थ्यांनी दिलेल्या 2 पर्यायापैकी कोणत्या शहरात विद्यार्थ्याला Exam द्यावी लागेल याची माहिती जाहीर केली आहे.

सध्या फक्त शहर जाहीर झाले आहेत काही दिवसातच NEET चे Admit Card जाहीर होतील व त्यात शहरात कुठल्या ठिकाणी (कोणत्या कॉलेज) मध्ये Exam होईल याची माहिती दिली जाईल.

तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणते शहर (City ) मध्ये exam द्यावी लागणार आहे हे पहावे.

STEPS TO DOWNLOAD-

Exam City पाहण्यासाठी खालील Button वर क्लिक करा.

तिथे आपला NEET चा Application Number टाका.

आपली Date of Birth टाका.

-Security PIN टाका

Login करून पहा कोणती City Allot झाली आहे.