112 नवीन MBBS कॉलेज च्या मान्यतेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात.
राज्यातील 9 महाविद्यालयाचा समावेश
National Medical Commission नी आपल्या अधिकृत वेबसाईट वर दिनांक -2/04/2023 रोजी एक अत्यंत महत्वाची नोटीस प्रकाशित केली आहे. ह्या नोटीस नुसार संपूर्ण देशभरातून नवीन MBBS कॉलेज स्थापनेसाठी 112 प्रस्ताव तसेच अगोदरच चालू असलेल्या MBBS कॉलेज मध्ये सीट्स ची संख्या वाढवून मिळावी ह्या साठी 58 प्रस्ताव आल्याचं सांगितलं आहे.
नोटीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
NMC च्या सदर Notice मध्ये NMC ची संस्था असलेल्या MARB (The Medical Assessment and Rating board) द्वारे पुढील प्रक्रिया पार पडल्या जाणार असल्याचे म्हटले आहे.
जर संपूर्ण देशभरात 112 नवीन MBBS महाविद्यालये आणि 58 कॉलेज मधील सीट्स वाढल्या तर संपूर्ण देशभरातील NEET UG 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी निश्चितच ही एक आनंदाची बाब ठरेलं.
NMC च्या website वरील दिनांक 15/03/2024 ची नोटीस पहिली तर महाराष्ट्र राज्यातून या वर्षी खालील ठिकाणाहून नवीन महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव NMC कडे पाठवण्यात आलेला आहे.
1) Govt Medical College Bhandara
2) Govt Medical College Nashik
3)Govt Medical College Ambernath Thane
4) ShriRamchandra Inst. Of Medical Science Sambhajinagar (Private)
5) Govt Medical College Buldhana
6) Mahatma Gandi Mission Medical College Nerul, Navi Mumbai ( May be deemed)
7) Malati Multispeciality Hospital And Medical College Murtizapur Akola (Private)
8) Ideal Inst. Of Medical Sciences Palghar (Private)
9) Govt. Medical College Hingoli
चा समावेश आहे सोबतच MGM संभाजीनगर Deemed University मार्फत जागा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव पाठवल्या गेला आहे.
येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात MBBS कॉलेजची संख्या वाढली तर त्याचा फायदा राज्यातल्या विध्यार्थ्यांना निश्चितच होणार आहे. विशेषतः राज्यात Government MBBS कॉलेजची संख्या वाढली तर विध्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक भारही कमी होण्यास मदत होईल.
संपूर्ण प्रस्तावित Colleges ची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा–