NEET परीक्षा संदर्भातील अफवांचे NTA कडून खंडन.
दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी National Testing Agency कडून विध्यार्थ्यांसाठी एक नोटीस प्रकाशित करण्यात आली आली आहे. ज्या मध्ये NTA कडून NEET परीक्षे संदर्भात Social मीडिया (समाज माध्यम ) वर पसरविल्या जाणाऱ्या अफवाना विध्यार्थ्यांनी बळी पडू नये असं सांगण्यात आले आहे.
सध्या समाज माध्यमावर NEET परीक्षा आणि लोकसभा निवडणुका या दोन्हीचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे मेसेज पसरवले जात आहे. अशाच एका अफवेच NTA कडून खंडण करण्यात आले आहे.
NTA कडून प्रकाशित झालेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की
” जे विध्यार्थी लोकसभेला मतदान करून येणार आहेत आणि त्यांच्या बोटावर मतदानाची शाई असेल अशा विध्यार्थ्यांना Exam हॉल मध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जाणार असल्याच्या अफ़वा Social Media मधून पसरवल्या जात आहेत त्याला विध्यार्थ्यांनी बळी पडू नये. विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. बोटावर शाई असल्यामुळे कोणत्याही विध्यार्थ्याची कसल्याही प्रकारची अडवणूक केली जाणार नाही. “
ह्याच बरोबर NTA नी विध्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
NTA ची ऑफिसिअल नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.