MH-CET Update

Tag: bams fees

राज्यातील MBBS/BAMS/BDS च्या फीस संदर्भात शासनाचे महत्वपूर्ण निर्णय.

shikshan shulk samiti

mbbs fees

bams fees

bds fees

शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा पाया आहे. पण आजकाल वैद्यकीय शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे की, सामान्य कुटुंबांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे कठीण झाले आहे. यातच खासगी शाळा आणि महाविद्यालये आपल्या मनाला येईल तशी फी आकारतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने शिक्षण शुल्क समिती (Fee Regulation Committee) स्थापन केली आहे.

NEET UG 2025 च्या आधारावर महाराष्ट्र राज्यातील MBBS/BAMS/BDS/BHMS/BUMS इ. प्रवेश प्रक्रिया या वर्षी पार पडतील

राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांवर येणारा खर्चाचा भार शासना मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या Scholarship द्वारे उचलला जातो. परंतु राज्यातील बरेचशे खासगी (private/semi govt Colleges) विद्यार्थ्यांकडून Deposite किंवा Caution Money च्या नावाखाली मोठी रक्कम वसुल करीत असतं. यावर आळा घालण्यासाठी शिक्षण शुल्क समितीने एक नोटीस publish करून Deposite स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या फीस वर नियंत्रण करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या नोटीस नुसार Colleges ला Deposite संदर्भात काही मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. त्या मर्यादेबाहेर colleges विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त deposite वसुल करू शकतं नाही.

MBBS साठी ही मर्यादा -50000/-
BDS साठी -40000/-
BAMS साठी -25000/-