Abroad Education Update

Tag: BAMS STUDENTS

आता विध्यार्थ्यांना प्रत्येक Medical कॉलेज मध्ये Internship दरम्यान किती विद्यावेतन (Stipend) मिळते याची माहिती मिळणार.

National Medical Commission (NMC) मार्फत देशातल्या संपूर्ण MBBS UG/ MBBS PG महाविद्यालयांना विध्यार्थ्यांना शेवटच्या वर्षी कराव्या लागणाऱ्या Internship दरम्यान किती वेतन Stipend स्वरूपात देत आहात याचा सर्व data 23 एप्रिल 2024 पर्यंत NMC ला कळवण्यास सांगितले आहे. तशा आशयाची Notice NMC ने आपल्या ऑफिसिअल वेबसाईट वर Publish केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे NMC ने हे पाऊल उचलले आहे. संपूर्ण देशभरातील विध्यार्थ्यांमार्फत MBBS UG/MBBS UG महाविद्यालयात Internship दरम्यान Regular आणि पुरेसे Stipend मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने याची दखल घेत NMC कडे देशभरातल्या संपूर्ण महाविद्यालये विध्यार्थ्यांना Internship दरम्यान किती Stipend देत आहेत ह्याचा Data मागवण्याचे आदेश दिले होते.

NMC ने सर्वोच्च न्यायलयाच्या या आदेशाची तात्काळ दखल घेत देशभरातील तसेच सर्व राज्यातील महाविद्यालयाकडे सर्व data मागितला आहे तसेच विध्यार्थ्यांना किती Stipend दिला जातो याची संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईट वर सुद्धा प्रकाशित करण्याची सक्ती केली असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेल्या एका बातमी मध्ये म्हटले आहे.

जर महाविद्यालयाने आपल्या वेबसाईट वर stipend संदर्भातील सर्व Data प्रकाशित केला तर सध्या MBBS ला शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना तसेच नव्याने MBBS ला Admission घेऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे तसेच विध्यार्थ्यांना प्रत्येक Medical कॉलेज मध्ये Internship दरम्यान किती विद्यावेतन मिळते याची माहिती मिळण्यासही मदत होईल.

नुकतेच महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने राज्यातील MBBS आणि BDS अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी internship काळात Stipend दुप्पट करण्याचा प्रस्ताव पाठवलेला होता.मात्र त्यातून आयुर्वेदा (BAMS) आणि होमिओपॅथीला वगळले होते.परंतु विध्यार्थी संघटना आणि निमा स्टुडंट फोरमच्या हस्तक्षेपामुळे आता BAMS आणि BHMS च्या विध्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हा निर्णय अंतिम झाला तर राज्यातील MBBS, BDS च्या विध्यार्थ्यांना 22 हजार महिना तर BAMS/BHMS/BUMS/MBBS from Abroad यांना राज्यात 18 हजार महिना विद्यावेतन (Stipend) मिळण्याचा मार्गही मोकळा होईल.