Job vacancies Update

Tag: bsc nursing cut off

महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing प्रवेश प्रक्रिया कशी असते ?

2023 च्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे Admission हे NEET Exam च्या मार्क्स वर होतं होते. परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाने Bsc Nursing प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र CET Exam घेण्याचे ठरवले.2023 पासून राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट तसेच सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण Private Colleges म्हणतो यांचे Admission हे Bsc Nursing CET Exam च्या मार्क्सच्या आधारावर होतात.

राज्यात महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रनाखाली
1) Govt Bsc Nursing College
2) Private /Semi Government Bsc Nursing College

अशा दोन प्रकारच्या कॉलेजचा समावेश आहे. ह्या मध्ये विध्यार्थ्यांच्या CET परीक्षेच्या गुणाच्या मेरिट वर आधारित कॉलेजचे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवून साधारण प्रवेश प्रक्रियेच्या 3-4 round मधून प्रवेश प्रक्रिया पार पडतात.

Bsc Nursing Admission साठी कोणते विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत (Eligibility Criteria)-

1) विध्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.

2)विध्यार्थ्याचे Domacile (रहिवासी प्रमाणपत्र ) महाराष्ट्र राज्यातील असावे. (बाहेरील राज्यातील विध्यार्थी फक्त NRI कोटा /Institutional कोटा /Management कोटा साठीच पात्र असतील)

3) Candidate should have passed in the subjects of PCB and English individually and must have obtained a minimum of 45% marks taken together in PCB at the qualified examination i.e. (10 + 2)

4) The candidates belonging to SC / ST or other backward classes, the marks obtained in PCB taken together in qualifying examination be 40% instead of 45% as stated above. English is a compulsory subject in 10 + 2 for being eligible for admission to B.Sc Nursing OR as prescribed by the Indian Nursing Council from time to time.

Bsc Nursing केल्यानंतरच्या करिअर च्या संधी?

सध्याचे वातावरण आणि रोगराईचे प्रमाण पाहता या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहे. करोना काळात या सगळ्याचे महत्व आपण जाणलेच. त्यामुळे नर्सिंग हे अनेक मोठ्या संधींनी भरलेले क्षेत्र आहे. ज्यामध्ये सरकारी, निम सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यामध्ये तुम्ही नोकरी करू शकता. याशिवाय सरकारी आस्थापना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह अशा ठिकाणीही परिचर आणि परिचारिका यांना उत्तम संधी असते. सध्या या क्षेत्रात वेतनही भरपूर दिले जात आहे. एवढेच नव्हे तर परदेशातही संधी उपलब्ध आहेत.

Bsc Nursing प्रवेश प्रक्रियेबाबतची संपूर्ण विस्तृत माहिती खालील pdf मध्ये देण्यात आलेली आहे ज्यात राज्यातील Bsc Nursing कॉलेजची नावे. कॉलेज फीस, प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या इ. माहिती वाचण्यासाठी खालील pdf लिंक वर क्लिक करा –