MH-CET Update

Tag: CET ADMIT CARD

CET परीक्षेसाठी Normalization पद्धतीचा वापर.(NORMALIZATION MARKS METHOD)

राज्यात घेण्यात येणाऱ्या MHT-CET Exam संदर्भात CET CELL महाराष्ट्र तर्फे एक महत्वाची नोटीस प्रकाशित करण्यात आलेली. CET परीक्षा झाल्यानंतर विध्यार्थ्यांना मार्क्स कशाप्रकारे मिळणार या संबधित माहिती देणारी ही नोटीस आहे.

ह्या नोटीस नुसार MHT-CET मध्ये विध्यार्थ्यांना या वर्षी Normalization (NORMALIZATION MARKS METHOD IN CET ) पद्धतीने देण्यात येणार असल्याच सांगितलं आहे.

Normalization म्हणजे काय आणि आवश्यकता ?

राज्यातील CET परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होतं आहेत. विध्यार्थ्यांना admit card वर त्यांच्या exam dates आणि time दिलेले आहेत. Exam च्या तारखा विध्यार्थ्यांनुसार वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये Exam होतं आहेत. प्रत्येक शिफ्ट ला वेगळा पेपर असल्यामुळे असं होऊ शकतं की एखाद्या शिफ्ट ला पेपर सोप्पा, एका शिफ्ट ला पेपर मध्यम (medium) आणि एखाद्या शिफ्ट ला पेपर खूप अवघड (Hard) येऊ शकतो त्यामुळे विध्यार्थ्यांच्या मार्क्स मध्ये प्रचंड तफावत येऊ शकते.Easy पेपर वाल्या विध्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील आणि पेपर hard आलेल्या विध्यार्थ्यांना साहजिक कमी गुण मिळतील हीच तफावत दूर करण्यासाठी तसेच गुणांना समान श्रेणित आणण्यासाठी मार्क्सचे Normalization किंवा सामान्यीकरण केलं जातं.

सर्व shift ला समान Level वर आणण्यासाठी वेगवेगळ्या गणितीय सूत्राचा वापर केला जातो.सगळ्या विध्यार्थ्यांना एकाच श्रेणित (Level ) आणून Percentile score काढल्या जातो आणि त्यानुसार विध्यार्थ्यांना percentile दिले जातात.सगळ्या शिफ्ट च्या विध्यार्थ्यांना एकाच level वर आणून कोणत्याही विध्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो.

Normalization Method नुसार विद्यार्थ्यांना Percentile (Marks) देण्यासाठी वेगवेगळे factor काम करतात. ही प्रक्रिया किचकट असते परंतु camputer च्या मदतीने ही process पार पाडली जाते.

ह्या notice कडे विध्यार्थ्यांनी फक्त Update म्हणून पहावे. ह्या पद्धतीचा विध्यार्थ्यांच्या Merit वर फरक पडणार नाही.सध्या तरी विध्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पेपर कसाही येवो विद्यार्थ्यांनी तो चांगला सोडवावा.

महाराष्ट्र राज्य CET CELL मार्फत PCB ग्रुप साठीचे Hall Ticket/ Admit Card जाहीर.

CET ADMIT CARD RELEASED

1) आपले हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) आपला Registered Email Id भरा

3) आपला Application फॉर्म पासवर्ड टाका.

4) login केल्यानंतर Hall Ticket or Admit Card ह्या tab वर क्लिक करा

5) वरच्या side ला CET Exam हा tab दिसेल त्यावर क्लिक करून Enter करा

6) Enter केल्यानंतर डाउनलोड option वर क्लिक करून pdf save करा.

जर डाउनलोड करण्यासाठी अडचणी येतं असतील तर वेबसाईट वर लोड असल्याकारणाने technical error असू शकतो थोड्या वेळाने try करू शकता