MH-CET Update

Tag: CET DETAIL IMFORMATION

CET (PCB) Admit Card वरील महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र राज्य CET Cell मार्फत राज्यातील PCB Group CET Exam Application फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे Admit कार्ड जाहीर करण्यात आलेले आहे. त्यावर Exam Date आणि Exam कोठे होणार या विषयीची माहिती देण्यात आली आहे. याच बरोबर Admit कार्ड वर विध्यार्थ्यांना जवळपास 16 सूचना दिलेल्या आहेत त्या पैकी विध्यार्थ्यांसाठीच्या महत्वाच्या सूचना नेमक्या काय आहेत विस्तृत जाणून घेऊयात.

1) विध्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहायचे आहे. एकदा केंद्राचा Gate बंद झाल्यानंतर प्रवेश मिळणार नाही. (विध्यार्थ्यांना Gate Closure time त्यांच्या Hall Ticket/admit card वर देण्यात आला आहे. त्याच वेळेपर्यंत विध्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचायला हवा.

2) परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्या कारणाने विध्यार्थ्यानी आपला hall ticket वरचा Roll no हा User Name म्हणून वापरायचा आहे तर पासवर्ड साठी आपली जन्म तारीख (DDMMYYYY) Date Month Year फॉरमॅट मध्ये वापरायचा आहे.

3) विध्यार्थ्यानी Exam Centre वर आपल्या Hall Ticket बरोबरच एखादा ओळखीचा पुरावा (Identity Proof ) ज्यात Pan Card /Passport/Driving License /Voter ID Card Bank Passbook With Photographs /any Photo Identity Proof इ. सोबत ठेवायचे आहे. Hall Ticket वरचे नाव आणि Identity Proof वरचे नाव तंतोतंत match असणे गरजेचे आहे तसे नसेल तर विध्यार्थ्याला Gazette Notification /Affidavit बनवून सोबत ठेवावे लागेल

4) ज्या दिव्यांग विध्यार्थ्यानी (PWD) पेपर सोडवायला मदतनीस (Scribe) ची मागणी केली आहे. अशा विध्यार्थ्यानी आपले Disability सर्टिफिकेट आणि Scribe performa भरून सोबत ठेवायचा आहे.

5) CET CELL ने आपल्या website वर परीक्षे संदर्भात माहिती देणारे Information Brochoure दिलेले आहे विध्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक वाचायचे आहे.

6) विध्यार्थ्यानी आपल्या सोबत परीक्षा हॉल मध्ये सही करण्यासाठी ball point pen सोबत ठेवायचा आहे.

7) तुम्ही परीक्षे दरम्यान दिलेले प्रश्नांचे उत्तर जर दुसऱ्या विध्यार्थ्याच्या Answer Seat बरोबर तंतोतंत match होत असतील तर ते परीक्षा नियमांचे उल्लंघन ठरेल

8) परीक्षा हॉल मध्ये books/Notebooks/Calculater/Watch Calculater/pagers /Mobile phone इ. गोष्टींना परवानगी नाही.

9) परीक्षे संदर्भातील Date /Session /Centre /time विध्यार्थ्यांना बदलून मिळणार नाही.

10) विध्यार्थ्यांना एखादी अडचण किंवा काही issue असेल तर त्या संदर्भात 07969134401/07969134402 या क्रमांकावर संपर्क करावा.

संपूर्ण सूचना वाचा-