MH-CET Update

Tag: gap certificate

गॅप सर्टिफिकेट बद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

( gap certificate format)

gap affidavite

educational gap

1) गॅप सर्टिफिकेट (gap certificate ) म्हणजे काय ?

उत्तर : तुम्ही जर 2023 किंवा त्याआधी बारावीची परीक्षा पास झालेला असाल तर बारावी परीक्षा पास झाल्यानंतर आज पर्यंत तुम्ही कुठल्याही कोर्सला प्रवेश घेतला नाही याबद्दलचे सर्टिफिकेट म्हणजेच गॅप सर्टिफिकेट (शैक्षणिक खंड) . याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुम्ही शैक्षणिक गॅप घेतलेला आहे.

2) मी बारावीची परीक्षा 2024 मध्ये उत्तीर्ण झालो तर मला गॅप सर्टिफिकेट काढावे लागेल काय ?

उत्तर : नाही

3) गॅप सर्टिफिकेट कोठून मिळते ?

उत्तर : गॅप सर्टिफिकेट तहसील ऑफिस/सेतू केंद्रातून मिळते. गॅप सर्टिफिकेट शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपर वर टाईप करून नोटरी करावे लागते.

4) गॅप सर्टिफिकेट चा काही स्टॅंडर्ड फॉरमॅट आहे का ?

उत्तर : नाही, विध्यार्थ्यांच्या सोईसाठी आम्ही लेखाच्या खाली गॅप सर्टिफिकेट चा एक फॉरमॅट देत आहोत.

5) गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का ?

उत्तर : होय, तुम्ही जर बारावीची परीक्षा 2023 किंवा त्याआधी पास झालेले असाल तर गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे.

6) गॅप सर्टिफिकेट कधी उपयोगात येते ?

उत्तर – जेंव्हा प्रवेश प्रक्रियेदरम्यान तुम्हाला एखादे कॉलेज मिळते ( Allot ) होते. कॉलेजला Admission घेत असताना तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावे लागते.

7) गॅप सर्टिफिकेट मराठी मध्ये असावे की इंग्रजी मध्ये ?

उत्तर – महाराष्ट्र राज्यात दोन्ही पैकी कुठल्याही भाषेत असले तरी चालेल.