Uncategorized

Tag: HSC FEE REFUND

10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे, ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्या मार्फत 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे, परिपत्रकानुसार टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची परीक्षा फी परत मिळणार आहे.

जीआर नुसार राज्यातील दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळ आहेत यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना ही परीक्षा फी परत मिळणार आहे, म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला फी मिळणार आहे.

3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत विधार्थी/पालकांचे बँक details अकाउंट आहे ते तुमच्या शाळेमध्ये /कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SSC refund मध्ये विध्यार्थ्याचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HSC refund मध्ये विध्यार्थ्याचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा