MH-CET Update

Tag: LINGUISTIC MINORITY

राज्यातील Medical कॉलेज मधील Minority आरक्षणा बदल. (MINORITY QOUTA IN MEDICAL ADMISSION PROCESS)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या 85% State कोटा अंतर्गत येणाऱ्या राज्यातील Govt आणि semi govt/private महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे संविधानिक आरक्षण आहेत जे विध्यार्थ्यांच्या जाती /पोटजाती वर आधारित आहे (Open/ EWS/OBC/SC/ST/VJ/NT).

या व्यतिरिक्त राज्यात समांतर मायनॉरिटी साठी सुद्धा आरक्षण आहे. जे धर्म आणि भाषेच्या आधारावर आहे.हे आरक्षण प्रत्येक महाविद्यालयात मिळत नाही या साठी काही कॉलेज आरक्षित करण्यात आलेले आहेत. आणि मायनॉरिटी कोटा निर्माण करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर राज्यात 2 प्रकारचे मायनॉरिटी विद्यार्थी आहेत.

1) Religious Minority (धार्मिक अल्पसंख्यांक )– यात राज्यातील Muslim/ Chirstian /Jain धर्मातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

2) Linguistic Minority (भाषिक अल्पसंख्यांक ) – यात प्रामुख्याने हिंदी /गुजराती /सिंधी भाषिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

वरील 2 प्रकारच्या मायनॉरिटी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या Courses (MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/Physiotheraphy/Bsc Nursing) साठी कॉलेजेस राखीव (Reserve) ठेवण्यात आलेले.

या आरक्षणाचा लाभ कश्याप्रकारे मिळतो-(MINORITY PARALLEL RESERVATION)

📌 Minority मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या आरक्षणाबरोबरच राखीव ठेवण्यात आलेल्या कॉलेज मध्ये सुद्धा benifit मिळतो.

📌 जे कॉलेज राखीव आहेत तिथे विद्यार्थी minority मधून merit base वर Admission घेऊ शकतो

📌 जे कॉलेज राखीव नाहीत अशा कॉलेज मध्ये विद्यार्थी अशा कॉलेज मध्ये आपल्या मुळं कॅटेगरी मधून Merit base वर प्रवेश मिळवू शकतो.

या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणते Additional कागदपत्रे आवश्यक आहेत –

( MINORITY STUDENTS REQUIRED DOCUMENTS )

📌 या Minority कोट्याचा फायदा घेण्यासाठी विध्यार्थ्यांना Minority Certificate बनवून घ्यावे लागते.

📌 त्याच बरोबर विद्यार्थ्याचे School Leaving Certificate सुद्धा एक महत्वाचे Document आहे ज्यात विद्यार्थ्याचा धर्म तसेच मातृभाषा याचा उल्लेख असतो.

📌 Minority सर्टिफिकेट चा शासकीय फॉरमॅट नसतो.100 RS च्या bond पेपर वर वकीला (Advocate) समक्ष नोटरी (NOTARY) करून घ्यावी लागते.

राज्यातील कोणते महत्वाचे Colleges Minority साठी राखीव आहेत.

(MINORITY RESERVED MEDICAL COLLEGES)

(EX- Indian Institute of Medical Science & Research MBBS COLLEGE BADNAPUR JALNA RESERVED FOR MUSLIM MINORITY)

या विषयी संपूर्ण माहिती महाराष्ट्र CET CELL च्या Information Brochoure मधील पान नंबर 69 ते पान नंबर 85 दरम्यान मिळेल.