MH-CET Update

Tag: MAHARASHTRA CET

राज्यातील MBBS/BAMS/BDS च्या फीस संदर्भात शासनाचे महत्वपूर्ण निर्णय.

shikshan shulk samiti

mbbs fees

bams fees

bds fees

शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा पाया आहे. पण आजकाल वैद्यकीय शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे की, सामान्य कुटुंबांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे कठीण झाले आहे. यातच खासगी शाळा आणि महाविद्यालये आपल्या मनाला येईल तशी फी आकारतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने शिक्षण शुल्क समिती (Fee Regulation Committee) स्थापन केली आहे.

NEET UG 2025 च्या आधारावर महाराष्ट्र राज्यातील MBBS/BAMS/BDS/BHMS/BUMS इ. प्रवेश प्रक्रिया या वर्षी पार पडतील

राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांवर येणारा खर्चाचा भार शासना मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या Scholarship द्वारे उचलला जातो. परंतु राज्यातील बरेचशे खासगी (private/semi govt Colleges) विद्यार्थ्यांकडून Deposite किंवा Caution Money च्या नावाखाली मोठी रक्कम वसुल करीत असतं. यावर आळा घालण्यासाठी शिक्षण शुल्क समितीने एक नोटीस publish करून Deposite स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या फीस वर नियंत्रण करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या नोटीस नुसार Colleges ला Deposite संदर्भात काही मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. त्या मर्यादेबाहेर colleges विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त deposite वसुल करू शकतं नाही.

MBBS साठी ही मर्यादा -50000/-
BDS साठी -40000/-
BAMS साठी -25000/-

Admission आवश्यक असणाऱ्या Voter Id Card विषयी सविस्तर

ADMISSION VOTER ID CARD

VOTER ID IS MANDATORY?

महाराष्ट्र राज्यात State Quota अंतर्गत MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotheraphy साठीच्या Admission ची पूर्ण ऑथॉरिटी ही CET CELL कडे आहे.

NEET Result लागल्या नंतर CET CELL मार्फत Admisaion Process च्या अगोदर एक Information Bulletin प्रकाशित केले जाते त्या मध्ये त्या वर्षीच्या Admission प्रक्रियेचे संपूर्ण नियम आणि लागणाऱ्या कागद पत्राची माहिती दिलेली असते. CET CELL च्या Information Bulletin 2024 मध्ये Voter Id mandatory असल्याचा कसलाही उल्लेख नाही परंतु CAP Round द्वारे एखाद्या विद्यार्थ्याला एखादे कॉलेज मिळाले तर संबंधित कॉलेज विद्यार्थ्याकडे Voter ID ची मागणी करू शकते.

अशा परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांचे दोन प्रकार पडतात.

अशा विद्यार्थ्यांनी आपल्या voter id ची xerox copy कॉलेजला देणे.

  • Voter id नसेल तरीही काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण CET CELL चा Application फॉर्म भरताना Voter Id ची मागणी केली जातं नाही.

  • कॉलेज Allot झाले आणि Voter id card ची मागणी केली तर विद्यार्थी Annexure C भरून कॉलेज ला देऊ शकतात.

Voter ID असायलाच पाहिजे असा कोणताही नियम सध्या तरी नाही.

MBBS/BAMS/BDS/BHMS Document Verification Process कशी असते ?

mbbs bams bhms bds bums physiotherapy

documents verification

cet cell document verification

महाराष्ट्र स्टेट कोटा अंतर्गत MBBS/BAMS/BDS/BHMS/BUMS इ. प्रवेश प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी (Document Verification) ही एक महत्त्वाची पायरी आहे जी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell – SCET Cell) द्वारे आयोजित केली जाते. ही प्रक्रिया सामान्यतः खालीलप्रमाणे पार पडते

NEET चा निकाल लागल्यानंतर साधारपणे 25-30 जुलै दरम्यान महाराष्ट्र State Q Counselling (प्रवेशप्रक्रियेला) सुरुवात होते.
सर्वप्रथम, उमेदवारांना CET Cell च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. यामध्ये NEET UG चे तपशील, वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले कॉपी अपलोड करावे लागतात.
अर्ज सादर केल्यानंतर, उमेदवारांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रारंभिक पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाते. यामध्ये मूलभूत कागदपत्रे जसे की NEET स्कोअरकार्ड, 10वी आणि 12वीचे गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) इत्यादींची तपासणी होते.

प्रत्यक्ष कागदपत्रे पडताळणी (Physical Verification): ऑनलाइन पडताळणीनंतर विद्यार्थ्याचे CAP Round सुरु होतात. ह्या Round मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज चा पसंतिक्रम द्यावा लागतो दिलेल्या पसंतीक्रम (Choice Filling) मधून विद्यार्थ्याला एखादे कॉलेज मिळाले तर विद्यार्थ्याला त्या कॉलेज ला एकतर Admission घेण्यासाठी किंवा मिळालेले कॉलेज hold करून पुढील round मध्ये Betterment ला जाण्यासाठी प्रत्येक्ष कॉलेज वर हजर राहावे लागते. आणि त्या ठिकाणी कॉलेज च्या Scrutiny Committee मार्फत विद्यार्थ्याचे Original Documents ची पडताळणी केली जाते.

ही माहिती video स्वरूपात पाहण्यासाठी खालील video वर क्लिक करा.

नोट-वरील नियमांमध्ये बदल होऊ शकतात.त्यासाठी विद्यार्थ्यांनी cet cell च्या website ला सुद्धा visit करत राहावे. https://cetcell.mahacet.org/

NEET 2024 परीक्षेच्या आधारे विद्यार्थी कोण कोणत्या Courses ला प्रवेश घेऊ शकतो ?

वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी कोणत्या परिक्षा महत्वाच्या आहेत ?

List Of Various Courses Offered Through NEET UG 2024

जानेवारी ते मे हा 5 महिन्याचा कालावधी हा वेगवेगळ्या परीक्षेचे वेळापत्रक तसेच वेगवेगळ्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी online रेजिस्ट्रेशन चा काळ आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्रात आपले career करण्याचा निर्णय घेताना दिसतात.

वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी च्या बोर्ड च्या परीक्षेबरोबरच अन्य Entrance Test देणे सुद्धा बंधनकारक आहे.

महाराष्ट्र राज्यापुरते सांगायचे झाल्यास महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात मेडिकल फिल्ड मध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास 2 प्रकारच्या Entrance Test अत्यंत महत्वाच्या आहेत.

ही देशपातळीवर होणारी सर्वात महत्वाची परिक्षा आहे. या परीक्षेच्या मार्क्स च्या आधारावर महाराष्ट्र राज्यात खालील Courses ला विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.

ही Exam National Testing Agency (NTA) द्वारे केंद्र शासनामार्फत घेतली जाते.

Following are the NEET course details:

1) MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)

2) BDS (Bachelor of Dental Surgery)

3) BHMS (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery)

4) BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery)

5) BUMS (Bachelor of Unani Medicine and Surgery)

6) BSMS (Bachelor of Siddha Medicine and Surgery)

7) Bachelor of Naturopathy and Yoga Sciences (BNYS)

8) Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry (BVSc and AH)

9) Bachelor of Physiotherapy (BPT)

10) Bachelor of Occupational Therapy (BOTh)

11) Bachelor of Audiology, Speech and Language Pathology (BASLP)

12) Bachelor of Prosthetics and Orthotics (BP & O)

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 2 महत्वाच्या Courses साठी 2 वेगवेगळ्या CET विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे.

ही Exam ही Maharashtra CET Cell या राज्य शासनाच्या संस्थे मार्फत घेण्यात येते.

जर विद्यार्थ्यांला बारावी नंतर B. Pharm किंवा Pharm D साठी प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यानी ही CET द्यावी.

2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे प्रवेश हे नीट परीक्षेच्या आधारावरच व्हायचे परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे 2023 पासून राज्यात Bsc Nursing CET ही लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात Bsc Nursing ला प्रवेश घ्यायचा असेल तर Bsc Nursing साठी घेण्यात येणारी स्वतंत्र CET परिक्षा देणे बंधनकारक आहे.

CET (PCB) Admit Card वरील महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र राज्य CET Cell मार्फत राज्यातील PCB Group CET Exam Application फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे Admit कार्ड जाहीर करण्यात आलेले आहे. त्यावर Exam Date आणि Exam कोठे होणार या विषयीची माहिती देण्यात आली आहे. याच बरोबर Admit कार्ड वर विध्यार्थ्यांना जवळपास 16 सूचना दिलेल्या आहेत त्या पैकी विध्यार्थ्यांसाठीच्या महत्वाच्या सूचना नेमक्या काय आहेत विस्तृत जाणून घेऊयात.

1) विध्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहायचे आहे. एकदा केंद्राचा Gate बंद झाल्यानंतर प्रवेश मिळणार नाही. (विध्यार्थ्यांना Gate Closure time त्यांच्या Hall Ticket/admit card वर देण्यात आला आहे. त्याच वेळेपर्यंत विध्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचायला हवा.

2) परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्या कारणाने विध्यार्थ्यानी आपला hall ticket वरचा Roll no हा User Name म्हणून वापरायचा आहे तर पासवर्ड साठी आपली जन्म तारीख (DDMMYYYY) Date Month Year फॉरमॅट मध्ये वापरायचा आहे.

3) विध्यार्थ्यानी Exam Centre वर आपल्या Hall Ticket बरोबरच एखादा ओळखीचा पुरावा (Identity Proof ) ज्यात Pan Card /Passport/Driving License /Voter ID Card Bank Passbook With Photographs /any Photo Identity Proof इ. सोबत ठेवायचे आहे. Hall Ticket वरचे नाव आणि Identity Proof वरचे नाव तंतोतंत match असणे गरजेचे आहे तसे नसेल तर विध्यार्थ्याला Gazette Notification /Affidavit बनवून सोबत ठेवावे लागेल

4) ज्या दिव्यांग विध्यार्थ्यानी (PWD) पेपर सोडवायला मदतनीस (Scribe) ची मागणी केली आहे. अशा विध्यार्थ्यानी आपले Disability सर्टिफिकेट आणि Scribe performa भरून सोबत ठेवायचा आहे.

5) CET CELL ने आपल्या website वर परीक्षे संदर्भात माहिती देणारे Information Brochoure दिलेले आहे विध्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक वाचायचे आहे.

6) विध्यार्थ्यानी आपल्या सोबत परीक्षा हॉल मध्ये सही करण्यासाठी ball point pen सोबत ठेवायचा आहे.

7) तुम्ही परीक्षे दरम्यान दिलेले प्रश्नांचे उत्तर जर दुसऱ्या विध्यार्थ्याच्या Answer Seat बरोबर तंतोतंत match होत असतील तर ते परीक्षा नियमांचे उल्लंघन ठरेल

8) परीक्षा हॉल मध्ये books/Notebooks/Calculater/Watch Calculater/pagers /Mobile phone इ. गोष्टींना परवानगी नाही.

9) परीक्षे संदर्भातील Date /Session /Centre /time विध्यार्थ्यांना बदलून मिळणार नाही.

10) विध्यार्थ्यांना एखादी अडचण किंवा काही issue असेल तर त्या संदर्भात 07969134401/07969134402 या क्रमांकावर संपर्क करावा.

संपूर्ण सूचना वाचा-

CET /Bsc Nursing CET परीक्षेचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी CET CELL कडून महत्वाची नोटीस.

महाराष्ट्र राज्यातील ज्या विध्यार्थ्यांनी महाराष्ट्र CET चा फॉर्म ( PCB Group /PCM Group/ Bsc Nursing ) भरला आहे अशा विध्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र CET CELL कडून दिनांक -03/04/2024 रोजी परीक्षेच्या दृष्टीकोनातून एक अत्यंत महत्वाची Notice प्रकाशित केली आहे.

CET CELL या वर्षीच्या वेगवेगळ्या CET Exam च्या तारखा आधीच जाहीर केलेल्या आहेत. आता परीक्षेदरम्यान विध्यार्थ्याला एखाद्या प्रश्नावर आक्षेप असेल तर तो नोंदवण्याची संधी CET CELL कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर नोटीस मध्ये CET CELL 2 प्रश्नांच्या रूपात आक्षेप नोंदीचे उत्तर दिलेले आहेत ते प्रश्न आणि CET CELL चे उत्तर समजावून घेऊ

प्रश्न क्रमांक -1) जर परीक्षा झाल्यानंतर एखाद्या विध्यार्थ्यांनी प्रश्न पत्रिकेतल्या एखाद्या प्रश्नावर आक्षेप घेतला आणि तो आक्षेप CET CELL ची आक्षेप नोंदणी फीस भरून नोंदवला आणि विध्यार्थ्याचा आक्षेप योग्य असेल तर त्याने आक्षेप नोंदी साठी जी फीस भरली ती विध्यार्थ्याला परत मिळेल का?

CET CELL चे उत्तर – आक्षेप नोंदीची फी ही non refundable आहे, ती परत मिळणार नाही. परंतु नोंदवलेला आक्षेप योग्य असेल तर त्या प्रश्ना संदर्भातला संपूर्ण फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना समान मिळेल.

प्रश्न क्रमांक -2) जर आक्षेप बरोबर असेल तर त्याचा फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना मिळेल की ज्यांनी आक्षेप नोंदणी फीस भरून आक्षेप नोंदवला अशाच विध्यार्थ्यांना मिळेल?

CET CELL चे उत्तर- जर आक्षेप बरोबर असेल तर त्या प्रश्ना संदर्भातला फायदा सगळ्या विध्यार्थ्यांना मिळेल.

CET CELL ची Notice पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –