MH-CET Update

Tag: MBBS

राज्यात MBBS साठीचा Safe स्कोर काय असू शकतो ?

महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर सध्याचा घडीला महाराष्ट्र राज्यात 31 गव्हर्नमेंट आणि 22 private/Semi Government MBBS कॉलेज आहेत. 2024 मध्ये राज्यात आणखी काही MBBS कॉलेज सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

NEET-2024 ची परीक्षा ही अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. प्रत्येक विध्यार्थ्यांचं स्वप्न राज्यातच MBBS कॉलेज मिळवण्याचं आहे. त्यासाठी विध्यार्थी भरपूर मेहनत करतानाही दिसत आहेत. परंतु विध्यार्थ्यांची संख्या आणि MBBS च्या सीट्स ह्या मध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे प्रत्येक विध्यार्थ्याला MBBS ला admission मिळू शकणार नाही. ज्या विध्यार्थ्यांना मार्क्स चांगले येतील अशाच विध्यार्थ्यांना राज्यात MBBS मिळणार.

चांगले मार्क्स म्हणजे नेमके किती? असा प्रश्न विध्यार्थी आणि पालकांना साहजिक पडतो. महाराष्ट्र राज्यात जर MBBS मिळवायचे असेल तर Safe स्कोर काय असू शकतो ह्याचा अंदाज आपण 2023 च्या प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या round ला कॉलेज मिळालेल्या विध्यार्थ्यांच्या मार्कवरून लावू शकतो. मागच्या वर्षी 3 ऱ्या round च्या विध्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क्स मध्ये 10-15 मार्क्स मिळवले तर आपला 2024 ला MBBS ला ऍडमिशन घेण्याचा मार्ग जवळपास मोकळा होईल. कारण मागच्या वर्षी MBBS प्रवेशासाठी CET CELL कडून 5 Round घेण्यात आलेले होते. त्यातले 2 vacancy round होते परंतु विध्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता 3ऱ्या राऊंडचा कट ऑफ महत्वाचा आहे.

विध्यार्थ्यांची संख्या/प्रश्न पत्रिकेचे स्वरूप/ कॉलेज ची संख्या ह्या सर्व गोष्टीही कट ऑफ परिणाम करणाऱ्या आहेत. परुंतु ह्या result नंतर लक्षात घेण्याच्या बाबी आहेत. सध्या मागच्या वर्षी चा कट ऑफ डोळ्यासमोर ठेवूनच विध्यार्थ्यांना वाटचाल करावी लागणार आहे.

मागच्या वर्षीचा तिसऱ्या Round चा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज चा कट off-

मागच्या वर्षीचा तिसऱ्या Round चा private MBBS कॉलेजचा कट ऑफ –