Abroad Education Update

Tag: mbbs abroad

NMC कडूनFMGE विध्यार्थ्यांना अंतिम संधी ?

nmc

fmge

mbbs abroad mbbs russia mbbs georgia mbbs phillipines mbbs krygyz republic mbbs kazakh

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) परदेशी वैद्यकीय पदवीधरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी FMGE (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा) साठी पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करण्याची अंतिम मुदत चुकवली आहे, त्यांच्यासाठी वैद्यकीय शिक्षण नियामक मंडळाने (EMRB) आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

यापूर्वी परदेशी वैद्यकीय पदवीधरांना पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र, अनेक विध्यार्थी विविध कारणांमुळे पात्रता प्रमाणपत्र (Eligibility) मिळवू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर, EMRB ने या विध्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

EMRB च्या या निर्णयानुसार, ज्या विध्यार्थ्यांनी अद्याप पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही किंवा त्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळेल. यासाठी उमेदवारांना NMC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 6 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

1) कागदपत्रे तयार ठेवा: विध्यार्थ्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे, परदेशी वैद्यकीय पदवी, पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

2) पोर्टलवर नोंदणी: NMC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पात्रता प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी.

3) मुदतीचे पालन: EMRB ने जाहीर केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत (6 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ) सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.

FMGE ही परीक्षा परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अनिवार्य आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी परवाना मिळतो. त्यामुळे, पात्रता प्रमाणपत्र मिळवणे ही या प्रक्रियेची पहिली पायरी आहे.

पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही अंतिम संधी आहे आणि यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. त्यामुळे विध्यार्थ्यांनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन NMC ने केले आहे.

अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी NMC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

विदेशातून MBBS पूर्ण करणाऱ्या विध्यार्थ्यांनाही भारतात समान Medical Internship Stipend मिळायला हवा – सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.

भारत देशातील Medical Admission प्रक्रियेचा विचार केला तर दरवर्षी NEET परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2024 चा विचार केला तर जवळपास 27 लाख विध्यार्थ्यांनी NEET चा Application फॉर्म भरल्याच बोललं जात आहे. यालाच समांतर देशभरातील MBBS सीट्स चा विचार केला तर देशात सध्याच्या घडीला 706 MBBS महाविद्यालयात एकूण 109145 एवढ्याच MBBS सीट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक NEET Qualified विध्यार्थ्याला मेरिट बेसिस वर भारतात MBBS मिळणे शक्य होतं नाही म्हणून देशातील बरेचशे विध्यार्थी MBBS करण्यासाठीचा दुसरा पर्याय म्हणून Abroad हा Option निवडतात .

Abroad ला MBBS ला प्रवेश मिळवून पुन्हा भारतात येऊन विध्यार्थ्याला प्रॅक्टिस करायची असल्यास NMC (National Medical Commission) च्या काही अटी आणि शर्ती नक्कीच आहेत त्या आपण वेगळ्या लेखात पाहुयात.परंतु सध्या तरी भारत देशा बाहेर MBBS करणारे विध्यार्थी तसेच या वर्षी बाहेर देशात MBBS करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

देशाबाहेरून MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही देशात इंटर्नशिप करताना समान विद्यावेतन अर्थात
Medical Internship Stipend मिळणे गरजेचे आहे असा आदेशच भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायमूर्ति सुधांशु धूलिया आणि न्यायमूर्ति प्रसन्ना भालचंद्र वराले यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. त्यामुळे इंटर्नशिप बाबत Abroad च्या विध्यार्थ्यांसोबत अगोदर पासूनच होणारा दुजाभाव आता टाळल्या जाणार आहे.

Abroad मध्ये MBBS करणारे विध्यार्थी आणि भारतात MBBS करणारे विध्यार्थी या मध्ये NMC किंवा भारत सरकार नेहमीच दुजाभाव करत असते असा आरोपही Abroad मधून MBBS करणाऱ्या विध्यार्थ्यांचा असतो परंतु आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे Abroad मधून MBBS करणाऱ्या विध्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Recent News