Medical Sector Update

Tag: mbbs mbbs admission

NEET UG 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांनी कर्नाटक आणि केरळ चा फॉर्म भरावा का?

NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यां साठी Other State Open कोटा हा प्रवेश प्रक्रियेसाठीचा महत्वाचा भाग आहे. संपूर्ण देशभरात Medical Admission संदर्भात राज्यांची विभागणी दोन भागात करता येते.

1) Domacile State ( म्हणजे विध्यार्थ्याचे रहिवाशी प्रमाणपत्र ज्या राज्याचे आहे ते राज्य, इथे विध्यार्थ्यांना स्टेट कोटा राखीव असतो उदा- महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांना साठी महाराष्ट्र राज्यात 85% सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्यात या सोबत आणखी एक अट महत्वाची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या रहिवाशी प्रमाण पत्राबरोबरच विध्यार्थ्याची 10 वी आणि 12 वीचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातून झालेले असणे गरजेचे आहे. इथे विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण फायदे मिळतात)

2) Other State ( म्हणजे असे राज्य ज्या राज्यात विध्यार्थ्यांची संख्या कमी असल्या कारणाने आपल्या राज्यातील private colleges च्या seats भरण्यासाठी बाहेरील राज्यातील विध्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली जाते त्याला आपण open state कोटा राज्य असेही म्हणतो)

संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून कर्नाटक, केरळ, आंध्र, तेलंगणा, ही MBBS करण्यासाठीची सोईची आणि लगतची open state कोटा राज्य आहेत.

Open State कोटा राज्यातील Private MBBS महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर विध्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी चे फायदे किंवा कोणतीही शासकीय Scholarship मिळत नाही. येथील प्रवेशासाठी प्रवेशाची पात्रता (Eligibility) ही Open कॅटेगरी साठी लागणारी पात्रताच ग्राह्य धरली जाते. मग ती NEET Qualifying Criteria असो अथवा बारावी बोर्डाचा PCB चा 150 मार्क्स चा criteria असो.

Open State कोटा राज्यात प्रामुख्याने cut ऑफिस कमी असतो. General/OBC/EWS प्रवर्गातील विध्यार्थ्यांनी ह्या कडे सकारात्मक पद्धतीने पाहायला हरकत नाही (SC/ST Open state कोटा मधील MBBS च्या cut ऑफ मार्क्स मध्ये महाराष्ट्र राज्यातच प्रवेश मिळण्याची संधी असते)

सध्या NEET परीक्षेच्या अगोदरच कर्नाटक आणि केरळ राज्याने आपले Application forms भरून घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विध्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरलेले आहेत. कोणत्या विध्यार्थ्यांसाठी सदर फॉर्म भरणे आवश्यक आहे ह्या बदलचा विस्तृत video खाली देत आहोत विध्यार्थ्यांनी तो video अवश्य पाहावा व आपला निर्णय घ्यावा.

मागील वर्षीचा कर्नाटक राज्याचा कॉलेज नुसार MBBS Cut ऑफ आणि फीस –

मागील वर्षीचा केरळ राज्याचा कॉलेज नुसार MBBS Cut ऑफ आणि फीस-