MH-CET Update

Tag: migration certificate

Migration सर्टिफिकेट बदल संपूर्ण माहिती

migration certificate

online migration certificate

राज्यभरातील संपूर्ण बोर्डचे बारावीचे निकाल लागलेले आहेत. थोड्याच दिवसात NEET 2024 चा निकाल सुद्धा जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक्ष Admission Process ला सुरुवात होईल. Admission Process साठी वेगवेगळ्या प्रकारची Documents ची आवश्यकता असते.

Migration Certificate हे असेच एक महत्वाचे Document. ह्या विषयी आपण माहिती घेऊयात.

जर महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश (Admission) महाराष्ट्रराज्याच्या बाहेर झाले तर अशा विद्यार्थ्याला Admission च्या वेळी Migration सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.

2024 ला बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतरच migration साठी अर्ज करावा.

Migration सर्टिफिकेट कुठून मिळवावे ? (How to Apply Migration Certificate)

Migration सर्टिफिकेट हे HSC बोर्डा मार्फत दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांची 12वी महाराष्ट्र State बोर्ड मधून झाली असेल अशा विद्यार्थ्यांना migration Certificate ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात मिळते.

1) ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या HSC बोर्डाच्या विभागीय कार्यालयात (पुणे/लातूर/नागपूर/मुंबई/संभाजीनगर/अमरावती/नाशिक/कोकण इ ) बारावी मार्कशीट ची ओरिजिनल कॉपी आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन स्वतः विद्यार्थी जाऊन अर्ज करू शकतात.

2) ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी-

ऑनलाईन पद्धतीने Migration मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून योग्य ती माहिती भरून 12वी चे ओरिजिनल मार्कशीट pdf व ओरीजिनल शाळा सोडल्याच्या दाखल्याची pdf अपलोड करून, ऑनलाईन payment करावे. व payment केल्याची पावती पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी.

Migration Certificate चे नमुने खालील प्रमाणे आहेत. (प्रत्येक विभागाचा नमुना वेगवेगळा असू शकतो)

नोट – 1) CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना migration सर्टिफिकेट हे कॉलेज मधूनच मार्कशीट बरोबर दिले जाते.

2) जर तुम्ही अगोदरच एखाद्या बॅचलर कोर्स ला प्रवेश घेतला असेल आणि NEET exam दिली असेल तर तुमचे migration तुमच्या कोर्स च्या संबंधीत विद्यापीठातून मिळवावे लागेल. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर admission झाले तरीही आणि महाराष्ट्र राज्यात admission झाले तरी दोन्ही ठिकाणी migration सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे.