विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागद पत्रा बरोबरच NTA कडून नव्याने उपलब्ध झालेले काही Documents विद्यार्थ्यांना Admission process साठी पुन्हा अत्यंत गरजेचे आहे. ते विद्यार्थ्यानी व्यवस्थित save करून ठेवणे आणि जतन करणे आवश्यक आहेत.
1) NEET Application फॉर्म –
NEET रेजिस्ट्रेशन complete झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या mail id वर NTA (National Testing Agency) कडून विद्यार्थ्यांचा NEET application फॉर्म mail केला जातो. किंवा पुंर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यानी pdf डाउनलोड केलेली असेल तर त्या application फॉर्म ची किमान 1 कलर print विद्यार्थ्यानी जतन करून ठेवावी.
2) NEET Admit कार्ड –
पुढील Admission process साठी विद्यार्थ्याचे Admit कार्ड हे अत्यंत महत्वाचे document आहे. विद्यार्थ्यानी आपल्या Admit कार्ड च्या किमान 2-3 print काढून जतन करून ठेवाव्यात तसेच mail मध्ये आपले admit कार्ड जतन करून ठेवावे.
अगदी काही दिवसामध्ये NTA कडून Admit कार्ड लिंक काढून टाकण्यात येते त्यामुळे आपल्याला अगोदरच आपले admit कार्ड save करणे गरजेचे आहे.
3) आपला Email Id आणि Mobile नंबर –
NEET application फॉर्म भरताना विद्यार्थ्यानी जो mobile नंबर आणि Email id दिलेला आहे तो नंबर आणि Email id पुढील Admission process साठी विशेषतः ऑल इंडिया कोटा प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण ऑल इंडिया कोटा रेजिस्ट्रेशन करताना यावर OTP पाठवल्या जातो. OTP enter केल्याशिवाय आपला फॉर्म पुढे Proceed होतं नाही. त्यामुळे NEET Application फॉर्म भरताना आपण जो मोबाईल नंबर आणि Email id दिलेला आहे तो संपूर्ण process होईपर्यंत चालू असणे अत्यंत गरजेचे आहे.
NEET EXAM संपूर्ण देशभरात 5 मे रोजी होणार आहे. अगदी काही दिवसावर NEET परीक्षा येऊन ठेपली आहे. थोड्याच दिवसात विद्यार्थ्यांचे NEET Admit Card 2024 NTA कडून प्रकाशित केले जातील. तत्पूर्वी NTA नी आपल्या Information Brochoure मध्ये विद्यार्थी त्याच बरोबर पालकांना काही सूचना दिल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत ते समजून घेऊ.
NTA च्या information Brochoure page no 46 वर या सूचना दिल्या आहेत Exam साठी घर सोडण्या अगोदर विद्यार्थी त्याच बरोबर त्यांचे पालक यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. (NEET INFORMATION BROCHOURE 2024)
1) विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी दुपारी 1:30 वाजेपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. दुपारी 1:30 नंतर विद्यार्थ्याला Centre वर प्रवेश दिल्या जाणार नाही. (NEET EXAM CENTRE)
2) विद्यार्थ्यांनी NTA ने दिलेल्या सूचना आणि शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
3) विद्यार्थ्यानी Exam चा एकही नियम मोडू नये.
4) दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याकडून काही त्रास होतं असेल किंवा दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याकडून परीक्षा नियमाचे भंग होतं असेल तर विद्यार्थी लगेच Invigilator कडे तक्रार करू शकतो.
5) विद्यार्थ्याला परीक्षा हॉल मध्ये फक्त खालील गोष्टी सोबत ठेवता येतील.
6) वरील गोष्टी ज्या विद्यार्थ्यांसोबत असणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही.
7) विद्यार्थ्यांना खालील वस्तू परीक्षा हॉल मध्ये सोबत ठेवता येणार नाहीत.
8) विद्यार्थ्यानी शक्यतो लवकर Exam सेन्टर वर पोहचावे कारण त्यांना त्या ठिकाणी Physical चेकिंग ला सामोरे जावे लागणार आहे.
9) विद्यार्थ्यानी NTA ने ठरवून दिलेल्या किंवा सूचित केलेल्या Dress कोड नुसारच आपला dress परिधान करावा. (NEET EXAM DRESS CODE)
10) आपला विद्यार्थी/पाल्य परीक्षा केंद्रावर दुपारी 1:30 वाजण्या अगोदर पोहचला पाहिजे याची काळजी पालकांनी घ्यायची आहे. त्यामुळे आपले centre आणि घराचे अंतर, रस्त्यात लागणारे ट्रॅफिक, त्या दिवशीचे हवामान ह्याचा विचार करून आपण वेळेत पोहचायला पाहिजे ही काळजी पालक किंवा विद्यार्थ्यांच्या Guardian नी घ्यायला हवी.
National Testing Agency (NTA) मार्फत NEET ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी ‘Content Based Lectures’ ची Series उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या ऑफिसिअल Website वर NTA मार्फत IIT Professors यांच्या मार्फत बनवलेली Subject Wise Lecture Series देण्यात आलेली आहे.
सदर Lecture series देत असताना हे Lecture विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि एखाद्या विषयातील Concept समजून घेण्यासाठी दिलेली आहे ह्याचा अर्थ असा नाही की ह्याच Lecture Series मधून प्रश्न येणार आहेत .अशी सूचनाही NTA कडून देण्यात आलेली आहे.
NEET UG 2024 तसेच 12 वी PCB ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कोर्सेस साठी Application Form आणि रेजिस्ट्रेशन चालू आहेत ह्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे.
1) राज्यातील महत्वाच्या 4 Deemed University Physiotheraphy/Pharmacy /Bsc Nursing etc प्रवेशा साठी वेगवेगळ्या Deemed युनिव्हर्सिटी CET Application फॉर्म ला सुरवात झाली आहे.
2) महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच Private Bsc Nursing /ANM/GNM कॉलेज मधील Admission साठी आवश्यक असणाऱ्या Bsc Nursing CET चे Application फॉर्म भरण्यासाठी 25/04/2024 पर्यंत मुदत आहे.
3) राज्यातील Govt तसेच private कॉलेज मधील विशेषतः Pharmacy प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या PCB ग्रुप CET चे Admit card/Hall ticket CET CELL मार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.
4) केरळ open state कोटा MBBS/BAMS/BHMS/BDS च्या Admission साठी Kerala CET रेजिस्ट्रेशन आवश्यक आहे. Kerala CET रेजिस्ट्रेशन ची शेवटची Date -19/04/2024 आहे.