MH-CET Update

Tag: neet syllabus 2025

NEET 2024 परीक्षेच्या आधारे विद्यार्थी कोण कोणत्या Courses ला प्रवेश घेऊ शकतो ?

वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी कोणत्या परिक्षा महत्वाच्या आहेत ?

List Of Various Courses Offered Through NEET UG 2024

जानेवारी ते मे हा 5 महिन्याचा कालावधी हा वेगवेगळ्या परीक्षेचे वेळापत्रक तसेच वेगवेगळ्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी online रेजिस्ट्रेशन चा काळ आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्रात आपले career करण्याचा निर्णय घेताना दिसतात.

वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी च्या बोर्ड च्या परीक्षेबरोबरच अन्य Entrance Test देणे सुद्धा बंधनकारक आहे.

महाराष्ट्र राज्यापुरते सांगायचे झाल्यास महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात मेडिकल फिल्ड मध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास 2 प्रकारच्या Entrance Test अत्यंत महत्वाच्या आहेत.

ही देशपातळीवर होणारी सर्वात महत्वाची परिक्षा आहे. या परीक्षेच्या मार्क्स च्या आधारावर महाराष्ट्र राज्यात खालील Courses ला विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.

ही Exam National Testing Agency (NTA) द्वारे केंद्र शासनामार्फत घेतली जाते.

Following are the NEET course details:

1) MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)

2) BDS (Bachelor of Dental Surgery)

3) BHMS (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery)

4) BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery)

5) BUMS (Bachelor of Unani Medicine and Surgery)

6) BSMS (Bachelor of Siddha Medicine and Surgery)

7) Bachelor of Naturopathy and Yoga Sciences (BNYS)

8) Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry (BVSc and AH)

9) Bachelor of Physiotherapy (BPT)

10) Bachelor of Occupational Therapy (BOTh)

11) Bachelor of Audiology, Speech and Language Pathology (BASLP)

12) Bachelor of Prosthetics and Orthotics (BP & O)

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 2 महत्वाच्या Courses साठी 2 वेगवेगळ्या CET विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे.

ही Exam ही Maharashtra CET Cell या राज्य शासनाच्या संस्थे मार्फत घेण्यात येते.

जर विद्यार्थ्यांला बारावी नंतर B. Pharm किंवा Pharm D साठी प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यानी ही CET द्यावी.

2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे प्रवेश हे नीट परीक्षेच्या आधारावरच व्हायचे परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे 2023 पासून राज्यात Bsc Nursing CET ही लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात Bsc Nursing ला प्रवेश घ्यायचा असेल तर Bsc Nursing साठी घेण्यात येणारी स्वतंत्र CET परिक्षा देणे बंधनकारक आहे.