MH-CET Update

Tag: NEET UG 2024

Admission प्रक्रियेसाठी पालकांचे कोणते Documents आवश्यक आहेत ?

2024 मधील महाराष्ट्र राज्यातील Admission प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या Exam महाराष्ट्र CET CELL मार्फत आणि Health Science Courses (MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/Physiotheraphy/Veterinary) च्या प्रवेशासाठी देश पातळीवर घेण्यात येणाऱी NEET Exam अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील संपूर्ण विध्यार्थी सध्या अभ्यासात मग्न आहेत तर बहुतांश पालक कागदपत्रांची तयारी (Documents Preparation ) करीत आहेत.

महाराष्ट्र राज्यात Admission Process दरम्यान विध्यार्थ्यांच्या कागदपत्राबरोबरच काही Condition मध्ये पालकांचे पण documents आवश्यक आहेत . अशा कोणत्या कोणत्या परिस्तिथी आणि Reservations आहेत जिथे Admission साठी पालकांच्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते विस्तृत पाहू.

A) DEFENCE कोटा –

महाराष्ट्र राज्यातील MBBS/BDS/BAMS इ. Courses साठी ज्या विद्यार्थ्यांचे पालक Defence मध्ये service देत आहेत किंवा Defence मधून निवृत्त झाले आहेत अशा विध्यार्थ्यांसाठी Defence कोट्यामधून काही सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत. त्या सीट्स चे फायदे घेण्यासाठी विध्यार्थ्यांच्या पालकांचे दोन documents महत्वाचे आहेत जे Admission process साठी आवश्यक आहेत.

1) Parents Defence Certificate (D1/D2/D3)

2) Parents Domacile Certificate (पालकांचे रहिवाशी प्रमाणपत्र)

B) डोंगरी आदिवास आरक्षण (Hilly Area Reservation )-

महाराष्ट्र राज्यातील काही विभाग राज्य शासनाकडून डोंगरी विभाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागातील विध्यार्थ्यांसाठी राज्यातील Govt MBBS महाविद्यालयात काही सीट्स राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या सीट्स चे फायदे घेण्यासाठी विध्यार्थ्यांना खालील documents ची आवश्यकता आहे.

1) विध्यार्थ्याचे डोंगरी प्रमाणपत्र (HILLY AREA CERTIFICATE )


2) विध्यार्थ्याचे Domacile (STUDENT DOMACILE)
3) पालकाचे domacile (PARENTS DOMACILE )
4) Certificate Proof Showing Candidates SSC and/or HSC form Hilly Village or Taluka of Parents Domicile.

C) VETERINARY 6 % RESERVATION-

जर विध्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात Veterinary ला प्रवेश घ्यायचा असेल तर शेती असलेल्या पालकांच्या पाल्याला (student) महाराष्ट्र राज्यातील Veterinary महाविद्यालयात 6% आरक्षण आहे. त्या साठी पालकांना आपल्या तहसील कार्यालयात जाऊन खालील प्रकारचे शेती प्रमाणपत्र बनवून घेणे आवश्यक आहे.

( NOTE-सदर प्रमाणपत्र हे Admission Year 2023 चे आहे. 2024 ला वेगळा फॉरमॅट असू शकतो* )

D ) पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (INCOME CERTIFICATE OF PARENTS)-

E ) SERVICE CERTIFICATE-

विद्यार्थ्याचे वडील (पालक) जर राज्य शासनाचे कर्मचारी असतील तर त्यांनी आपले service प्रमाणपत्र Additional Documents म्हणून काढून ठेवायला हरकत नाही.

F) BANK ACCOUNT-

विध्यार्थी किंवा पालकांचे कोणत्याही Nationalize bank मध्ये account असावे.

G) PARENTS EMAIL AND MOBILE NUMBER-

कोणताही Admission application फॉर्म भरत असताना विध्यार्थ्यांच्या mobile number तसेच ई-मेल id बरोबरच Additional mail id आणि Additional मोबाईल नंबर द्यावा लागतो त्यामुळे पालकांनी पण आपला Active मोबाईल नंबर आणि Email Id नसेल तर बनवून ठेवावा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर बदल विस्तृत

All About Government Medical College Nagpur.

राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुन्या MBBS कॉलेज पैकी एक. भारतातीत इतर MBBS कॉलेज च्या तुलनेत सगळ्यात मोठा Campus हे ह्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.

कॉलेज बदल

कॉलेज चे पूर्ण नाव – Government Medical College And Hospital Nagpur

ठिकाण – हनुमान नगर नागपूर

स्थापना –1947

परिसर – 196 एकर

शिक्षण – UG/PG/Dental/ Therapy Courses उपलब्ध

कॉलेज कोड -1221

Status –Government College

सलंग्नता – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक

Intake- 250 (MBBS)

2) हॉस्पिटल बदल –

-Highest patient Flow
-first College in India to Run Occupational and Physiotheraphy

first College in Maharashtra to Installed C T Scanner Machine

कट ऑफ ( 2023 General and Average Marks )

Open- 635
OBC-623
EWS – 630
SC- 566
ST-442
VJ-597
NTB-573
NTC-606
NTD-634

(2nd आणि 3rd Round ला वरील कट ऑफ मध्ये 5-8 मार्क्स ची घट झाली होती )


महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे सकारात्मक पाऊल.

या वर्षी फी वाढ न करण्याचा निर्णय.

महाराष्ट्र राज्यातील NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येते आहे की महाराष्ट्र राज्यातील काही MBBS कॉलेज आणि काही BDS कॉलेज नी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर वर्षी राज्यातील सेमी गव्हर्नमेंट /Private महाविद्यालयाना आपल्या फी वाढीचा चा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या Fee Regulating Authority (FRA) कडे पाठवावा लागतो.मागच्या काही वर्षाचा विचार केल्यास राज्यातील बहुतांश महाविद्यालय आपल्या फी मध्ये दर शैक्षणिक वर्षाला 3-7% फी वाढीचा प्रस्ताव पाठवत असतात. परंतु या वर्षी राज्यातील 2 MBBS कॉलेज आणि 3 Dental कॉलेज यांनी FRA कडे ‘No Upward Rivision’ हा पर्याय पाठवला आहे म्हणजेच हे महाविद्यालय आपल्या फी मध्ये कोणतीही वाढ करणार नाहीत. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये जी फीस होती तीच फीस 2024 च्या विध्यार्थ्यांना लागू असणार आहेत.

कोणत्या कॉलेजनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाविद्यालयाचे मागच्यावर्षीचे कॅटेगरी नुसार फी Structure पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –

https://drive.google.com/drive/folders/18q74TPQGLGy5y4ZTAQE1S-b0V6pCJJ-8