AACCC Update

Tag: OBC CASTE CERTIFICATE

OBC कॅटेगिरी च्या संबंधित संपूर्ण माहिती व विद्यार्थ्यांसाठी सूचना (ALL ABOUT OBC CENTRAL AND STATE)

📌 OBC प्रमाणपत्र दोन प्रकारचे असते.

  1. राष्ट्रीय (नॅशनल) OBC प्रमाणपत्र आणि
  2. महाराष्ट्राचे OBC प्रमाणपत्र.

केंद्राच्या OBC प्रमाणपत्राबाबद

1 Central Government च्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्राच्या OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.
(Central OBC Cast Certificate)

2 महाराष्ट्रातील OBC/SBC/NT1/NT2/NT3/VJ या कॅटेगिरी चे सर्व विद्यार्थी केंद्रात OBC कॅटेगिरी मध्ये येतात.

3 केंद्राचे OBC प्रमाणपत्र फक्त एक वर्ष व्हॅलिड असते.

4 केंद्राचे OBC प्रमाणपत्र सेतू (MAHA E SEVA KENDRA) केंद्रा मधून काढून मिळते.

5 NEET 2024 च्या रिझल्ट नंतर AIQ (ALL INDIA QOUTA) फॉर्म भरताना केंद्राचे OBC प्रमाणपत्र लागते महाराष्ट्राचे प्रमाणपत्र चालत नाही.

6 नीट चा रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन च्या वेळी आवश्यक असणारे केंद्राचे OBC प्रमाणपत्र एक एप्रिल 2024 नंतर काढलेले असले पाहिजे.

7 NEET 2024 AIQ चा MCC (MBBS/BDS) / AACCC(BAMS/BHMS/BUMS) कडे फॉर्म भरताना ओबीसी CAST व्हॅलिडीटी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही.

8 सहसा केंद्राच्या OBC सर्टिफिकेट वर फॉर्म नंबर -9 असतो. त्यावर Government of India असा उल्लेख असतो.

राज्याच्या OBC प्रमाणपत्रा बाबद

1 STATE Government च्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्राच्या OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता नसते, STATE OBC सर्टिफिकेट ची आवश्यकता असते.

2 महाराष्ट्र राज्यात NT आणि VJ ह्या स्वतंत्र Cast आहेत त्यांना त्यांची स्वतंत्र Caste सर्टिफिकेट काढावी लागतात

3 राज्याच्या OBC सर्टिफिकेट ला तारखेचे बंधन नाही. Cast Certificate जुने असले तरी चालतं. किंवा नवीन काढलं तरी हरकत नाही

4 महाराष्ट्र राज्यातील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळी मात्र आपणास स्टेट चे ओबीसी प्रमाणपत्र आवश्यक असते त्यावेळी केंद्राचे चालत नाही. तसेच त्यावेळी

A.जात प्रमाणपत्र (CASTE CERTIFICATE)

B. उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)

C.जात पडताळणी प्रमाणपत्र (CASTE VALIDITY )

हे तिन्ही असतील तर च आरक्षणाचा लाभ मिळतो

5 सहसा STATE OBC सर्टिफिकेट वर फॉर्म नंबर -8 असतो. आणि त्यावर Government of Maharashtra असा उल्लेख असतो.