NTA Update

Tag: SEBC STUDENT NEET REGISTRATION

मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीट रजिस्ट्रेशन कोणत्या कॅटेगरीतून करायचे ?

NEET 2025 REGISTRATION.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये SEBC अंतर्गत आरक्षण लागू आहे, परंतु हे आरक्षण केंद्र सरकारमध्ये सेंट्रल ला लागू नाही.

कारण केंद्र सरकारमध्ये SEBC ही कॅटेगिरी येत नाही.

त्यामुळे नीट चा अर्ज भरताना तुम्हाला SEBC ही कॅटेगरी दिसणार नाही.

त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीट चा अर्ज कोणत्या कॅटेगिरीतून भरावा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात येतो.
मराठा समाजातील विद्यार्थी केंद्रामध्ये आर्थिक आरक्षणाचा (EWS) फायदा घेऊ शकतात.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे पालक जर केंद्राच्या आर्थिक आरक्षणाचे (Central EWS) निकष पूर्ण करत असतील तर त्यांना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (Central EWS) मिळू शकते.हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले तर ते नीट चा अर्ज EWS या कॅटेगिरी मधून भरू शकतात.

मराठा समाजातील विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगिरीतून अर्ज करून मराठा आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात.

आपण नीट चा अर्ज भरताना जी कॅटेगिरी निवडतो त्याचा उपयोग मुख्यत्वे केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रिया जसे की AIIMS/JIPMER/15 % all India quota यासाठी उपयोग होतो.

थोडक्यात सारांश, मराठा समाजातील विद्यार्थी नीट चा फॉर्म भरताना EWS कॅटेगिरी मधून भरू शकतात आणि नीट चा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगिरीचा फायदा नंतर घेऊ शकतात.