AACCC Update

Tag: STATE EWS CERTIFICATE

आर्थिक आरक्षणाच्या (EWS) प्रमाणपत्राबद्दल

HOW TO APPLY EWS

EWS RESERVATION

EWS म्हणजे काय ?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा Open/General कॅटेगरी मध्ये येणाऱ्या विध्यार्थ्यांना EWS अंतर्गत आरक्षण आहे.

राज्यातील प्रत्येक Govt MEDICAL कॉलेज मध्ये 10% सीट्स ह्या EWS प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तर private /Semi Govt कॉलेज मध्ये सीट्स राखीव नसल्या तरीही फीस मध्ये 50% सवलत मिळत असते.

EWS चा फायदा कोणत्या विध्यार्थ्यांना होणार ?

खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. SC, ST, OBC, VJ, NT, SEBC आरक्षणातील विध्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. अशा विध्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी साठी स्वतंत्र आरक्षनाची तरतूद आहे.

EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय अटी आहेत ?

1) विध्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे.

2) विध्यार्थ्याच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी.

3) १ हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं

महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं.

गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट जागेची अट आहे

EWS Certificate काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

Medical क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत EWS प्रमाणपत्रा बाबद महत्वाचे –

EWS प्रमाणपत्र दोन प्रकारचे असते एक केंद्राचे अनेक दुसरे राज्याचे.

कोणतेही प्रमाणपत्र एक एप्रिल 2024 नंतरच काढलेले असले पाहिजे. या प्रमाणपत्राची वैधता एक आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) अशी असते.

आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (EWS) SC/ST/NT1/NT2/NT3/VJ/SBC/OBC /SEBC या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना लागू नाही. अशा विध्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी साठी स्वतंत्र आरक्षनाची तरतूद आहे.

1) केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (Central EWS) : तुम्हाला जर AIIMS/AFMC/JIPMER/All India Quota यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरच हे प्रमाणपत्र लागते अन्यथा लागत नाही.
या प्रमाणपत्रांमध्ये जमिनी बद्दलचा उल्लेख असतो.

2) महाराष्ट्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (State EWS) : तुम्हाला जर महाराष्ट्रात MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotherapy Oher health sciences courses यापैकी कोणत्याही कोर्सला ८५% स्टेट कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र लागते.

बाहेर राज्यात कोणत्याही खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र लागत नाही.