MH-CET Update

Tag: total parents income

उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि त्याचे फायदे यासंबंधी काही प्रश्न आणि उत्तरे

income certificate ?

family income certificate ?

income certificate maharashtra ?

document required for income certificate ?

2023-2024 income certificate ?

NEET परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच Private कॉलेजच्या सर्व Medical Admission प्रक्रिया CET CELL महाराष्ट्र (cet cell maharashtra) च्या वेबसाईट वरून पार पडतात. Admission process चा फॉर्म भरत असतानाच विध्यार्थ्यांना आपल्या कौटुंबिक उत्पनाची माहिती द्यावी लागते तसेच प्रत्यक्ष Admission घेत असताना विध्यार्थ्यांना Income Certificate (उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागते) .Medical Admission Process दरम्यान हे एक अत्यंत महत्वाचे Document आहे. या बद्दलच आपण विस्तृत माहिती पाहणार आहोत.

1) उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा फायदा काय ?

उत्तर : जर तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला काही प्रमाणात फी माफ होते. ही फी सवलत इ. बी. सी. (Economically Backward Class) अंतर्गत मिळते.

2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर किती फी माफ होते ?

उत्तर : OPEN/EWS/OBC कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांकडे जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर साधारणतः 50% फी माफ होते व 50 टक्केच फी भरावी लागते.
उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कॉलेजची वार्षिक ट्यूशन फी जर दहा लाख रुपये असेल तर OPEN/EWS/OBC या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना साधारणतः पाच लाख रुपये भरावे लागतील.
SBC/VJ/NT1/NT2/NT3 कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांकडे जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल तर साधारणतः 90% फी माफ होते व 10 टक्केच फी भरावी लागते.
उदाहरणार्थ- एखाद्या खाजगी कॉलेजची वार्षिक ट्यूशन फी जर दहा लाख रुपये असेल तर SBC/VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना साधारणतः 1 लाख रुपये भरावे लागतील.

3) फी माफी चा फायदा सर्व कॉलेजेस मध्ये मिळतो का ?

उत्तर : होय ही माफी चा फायदा महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस मध्ये मिळतो.

4) फी माफी चा फायदा कोणत्या अभ्यासक्रमांसाठी मिळतो ?

उत्तर : फी माफी चा फायदा सर्वच अभ्यासक्रमांसाठी जसे की MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotherapy /Nursing/साठी मिळतो.

5) फी माफी चा फायदा ऍडमिशन घेतानाच मिळतो की ऍडमिशन घेताना पूर्ण फी भरावी लागते व नंतर फी वापस येते ?

उत्तर : महाराष्ट्र शासनाने सर्वच खाजगी कॉलेजेसना वारंवार सूचना व ताकीद दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत मिळू शकत असेल आणि जर विद्यार्थ्यांकडे त्यासंबंधीची कागदपत्रे असतील तर त्यांना प्रवेशाच्या वेळीच फी माफीची सवलत द्यावी पूर्ण फीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. म्हणजेच एखाद्या खाजगी कॉलेजची वार्षिक ट्यूशन फी दहा लाख रुपये असेल आणि VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरी च्या मुलाकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर त्या कॉलेजने प्रवेशाच्या वेळी एक लाख रुपये एवढीच ही घेतली पाहिजे.
साधारणतः नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त खाजगी कॉलेजेस शासनाच्या आदेशाचे पालन करतात परंतु काही कॉलेजेस अडवणूक करू शकतात.

6) उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते काय ?

उत्तर : होय उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते. ज्या वर्षी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त होईल त्या वर्षी पूर्ण फी भरावी लागेल परंतु ऍडमिशन ला काहीही धोका होणार नाही.

7) उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा काय ?

उत्तर : यासाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत आहे.

8) मला यावर्षी 2024 मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे तर उत्पन्नाचे कोणत्या वर्षाचे प्रमाणपत्र लागेल ?

उत्तर : 2023-24 (चालू आर्थिक वर्ष) या आर्थिक वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल.

( 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणे आवश्यक )

9) उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुठून मिळते ?

उत्तर : उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील ऑफिस/सेतू केंद्र/ ई सेवा केंद्र येथून मिळू शकते.

10) माझ्याकडे मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे ते चालेल का ?

उत्तर : होय ते सुद्धा चालेल, पण त्यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा उल्लेख आलेला पाहिजे.

11) उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागते काय ?

उत्तर : होय दरवर्षी द्यावे लागते.

12) पुढील वर्षी माझे उत्पन्न आठ लाखाच्या वर जाऊ शकते ?

उत्तर : पुढील किंवा त्यानंतरच्या वर्षी जर तुमचे उत्पन्न आठ लाखाच्या वर गेले तर त्या वर्षी FEES सवलत मिळणार नाही. परंतु ऍडमिशन ला काहीही धोका नाही.

13) मी SC/ST या कॅटेगिरीतुन आहे. मला सुद्धा उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढावे लागेल काय ?

उत्तर : नाही SC/ST या कॅटेगिरी साठी उत्पन्नाची मर्यादा नाही. तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागत नाही.

14) उत्पन्नाचे प्रमाणपत्र केव्हा द्यावे लागेल ?

उत्तर : ज्या वेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना जाता त्यावेळी द्यावे लागते.

15) मी OBC/SBC/SEBC/VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरीतुन आहे. माझ्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आहे, परंतु उत्पन्नाचे प्रमाणपत्र नाही.?

उत्तर : तुमच्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कॅटेगिरी ची सीट मिळते, परंतु फी मध्ये सवलत हवी असेल, स्कॉलरशिप हवी असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

16) मी OBC/SBC/SEBC/VJ/NT1/NT2/NT3 या कॅटेगिरीतुन आहे. माझ्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आहे, परंतु माझ्या पालकांचे या आर्थिक वर्षाचे उत्पन्न आठ लाखाच्यावर आहे ?

उत्तर : तुमच्याकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कॅटेगिरी ची सीट मिळेल, परंतु तुमच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखाच्यावर असल्यामुळे तुम्हाला फी मध्ये सवलत मिळणार नाही, स्कॉलरशिप मिळणार नाही, पूर्ण फी भरावी लागेल.

17) मी OPEN या कॅटेगिरीतुन आहे. माझ्या पालकांचे या आर्थिक वर्षाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे ?

उत्तर : तुमच्या पालकांचे उत्पन्न जर आठ लाखांपेक्षा कमी असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून घ्या. तुम्हाला फीमध्ये 50 टक्‍के सवलत मिळेल. तसेच महाराष्ट्राचे EWS प्रमाणपत्र सुधा काढून घ्या, शासकीय महाविद्यालयांमध्ये तुम्हाला EWS या जागांचा लाभ घेता येईल.

18) उत्पन्नाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र बाहेर प्रवेशासाठी चालते का ?

उत्तर : उत्पन्नाचे प्रमाणपत्र महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात कोणत्याही खाजगी कॉलेजमध्ये चालत नाही.

19) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून बारा लाखांपर्यंत वाढ होऊ शकते असे ऐकले आहे ?

उत्तर : सातवा वेतन आयोग लागल्यानंतर मागच्या दोन वर्षापासून ही चर्चा ऐकायला मिळते, परंतु आज रोजी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत आहे, भविष्यात जर उत्पन्नाची मर्यादा वाढली तर त्या प्रमाणे फायदा मिळेल.

20) उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि EWS प्रमाणपत्र या मध्ये फरक काय ?

उत्तर : उत्पन्नाच्या प्रमाणपत्रा मुळे FEES मध्ये सवलत मिळते, EWS प्रमाणपत्रा मुळे EWS साठीच्या 10% जागांचा फायदा मिळू शकतो.

21 ) EWS आणि EBC मधील फरक काय ?