NATIONAL TESTING AGENCY NTA NEET NEET APPLICATION FORM NEET REGISTRATION
संपूर्ण देशभरात NEET UG 2025 ची परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. या परीक्षेत देशभरातील जवळपास 23 लाख + विद्यार्थी आपले नशीब अजमवणार आहेत.
NTA (National Testing Agency) ने ही परीक्षा पेन आणि पेपर माध्यमातून होणार असल्याचे अगोदरच नोटीस काढून सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना Test booklet आणि OMR Sheet देण्यात येईल. पेपर झाल्यानंतर OMR हे Computer सॉफ्टवेअर च्या साह्याने तपासले जातील त्यामुळे NTA कडून विद्यार्थ्यांना OMR कशी सोडवायची या बद्दल काही सुचना आणि Demo OMR आपल्या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे.
✔️ यात विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून ते Admission होईपर्यंतचे संपूर्ण Updates मिळणार आहेत सोबतच खालील सेवांचा समावेश आहे
1) Video Lecture 2) College Details 3)Cut Off बुकलेट्स/फीस Structures 4)Ideal Preference List/Choice Filling List by Team SCA Academy 5) Demo Forms 6) MBBS/BAMS/BDS/BHMS साठीचे स्वतंत्र फोल्डर्स. 7) महाराष्ट्र राज्यातील CET CELL च्या प्रवेश प्रक्रियेबरोबरच बाहेरील राज्यातील प्रवेश प्रक्रियेची माहिती. 8) CHAT SUPPORT 9) संपूर्ण Admission प्रक्रिया होईपर्यंत Updates
इ. गोष्टी मिळणार आहेत.
ऑनलाईन counselling join करण्यासाठी खालील steps follow करा.
1) आमचे ऑनलाईन app डाउनलोड करा.
2) त्यात विचारलेले Details भरून log in करा.
3) तिथे NEET 2025 चा Counselling Course Available आहे. त्यावर क्लिक करून 2499/- RS payment करा.
4) Paymemt झाल्यानंतर तुम्हाला App मध्येच 2025 Counselling ग्रुप मध्ये Join केल्या जाईल.
5) सोबतच Chat box available करून दिल्या जाईल ज्यात तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास अंकुश पाटील सरांसोबत Direct Chat करू शकता.
महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्यात खालील प्रमाणे MBBS कॉलेज सध्याच्या घडीला आहेत.
1) GOVERNMENT MBBS COLLEGES (41) 2) PVT/SEMI GOVERNMENT MBBS COLLEGES (23) 3)DEEMED MBBS COLLEGES (13) 4) AIIMS NAGPUR 5) AFMC PUNE
यापैकी राज्यातील Govt आणि Pvt/Semi Govt MBBS कॉलेज ची प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या CET CELL च्या वेबसाईट वरून State Quota नियमानुसार होतं असते.
गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्यमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातून जवळपास 2-3 लाख विद्यार्थी NEET UG ची तयारी करत असतात असा Data सांगतो.
महाराष्ट्र State Quota चा विचार केला तर State Quota अंतर्गत राज्यात एकूण 8161 एवढ्या MBBS च्या Seats 2024 सालच्या प्रवेश प्रक्रियेत होत्या आणि ह्या seat साठी जवळपास 55781 विद्यार्थ्यांनी Admission Application फॉर्म भरला होता. म्हणजेच 1 MBBS: 7 Students अशी स्पर्धा आहे.
परंतु राज्यात Category Reservation /Specialized Reservation/Minority Reservation असे आरक्षणाचे प्रकार आहेत व त्या अंतर्गत Seat राखीव आहेत.
राज्यातील कॅटेगरी नुसार MBBS साठीची स्पर्धा NEET UG 2024 State Quota Counselling Data आधारे खालील pdf मध्ये पाहता येईल.
HILLY CERTIFICATE HILLY RESERVATION MBBS HILLY CUT OFF
DONGARI DAKHLA
महाराष्ट्र राज्यातील 41 शासकीय (Govt) MBBS महाविद्यालयातील प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी प्रदेशातील (Hilly Area) विद्यार्थ्यांसाठी specified reservation अंतर्गत 3% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
1) विद्यार्थ्याच्या पालकाचे Domacile (अधिवास प्रमाणपत्र ) हे शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी प्रदेशातील गावामधील असणे आवश्यक आहे.
2) विद्यार्थ्याची दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) किंवा दोन्ही परीक्षा पालकाचे Domacile असलेल्या डोंगरी प्रदेशातील गावात असणाऱ्या महाविद्यालय/शाळा /संस्था मधून दिलेल्या असाव्यात.
Medical Courses मध्ये NEET UG 2025 अंतर्गत फक्त राज्यातील 85% State Quota मधील MBBS Government College मध्येच Hilly साठी 3% जागा राखीव आहेत. बाकी BDS/BAMS/BHMS साठी Hilly Reservation नसते.
श्री छत्रपती अकॅडमी पुणे ही NEET प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था आहे.
NEET चा result लागल्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होतात ज्यात Mhcet(85%)/ AIQ (15%) /Other State counselling चा समावेश होतो. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती व प्रवेश प्रक्रिया सुलभ सोप्पी करून देणे या साठी छत्रपती अकॅडमी पुणे हे राज्यातील आघाडीचे मार्गदर्शन केंद्र आहे.
1) Video Lecture 2) College Details 3)Cut Off बुकलेट्स/फीस Structures 4)Ideal Preference List/Choice Filling List by Team SCA Academy 5) Demo Forms 6) MBBS/BAMS/BDS/BHMS साठी स्वतंत्र मार्गदर्शन 7) महाराष्ट्र राज्यातील CET CELL च्या प्रवेश प्रक्रियेबरोबरच बाहेरील राज्यातील प्रवेश प्रक्रियेची माहिती. 8) ऑनलाईन Application फॉर्म filling. 9) Morning 10 AM To Evening 6 PM Calling Support. 10) Personal One To One Guidance
A) STATE QUOTA / ALL INDIA QUOTA COUNSEELING -15000/-
B) OTHER STATE (INCLUDES UTTAR PRADESH MBBS/TELANGANA MBBS/JHARKHAND MBBS/CHATTISGARH MBBS/MADHYA PRADESH MBBS AND BAMS/KARNATAKA MBBS AND BAMS) -10000/-
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये SEBC अंतर्गत आरक्षण लागू आहे, परंतु हे आरक्षण केंद्र सरकारमध्ये सेंट्रल ला लागू नाही.
कारण केंद्र सरकारमध्ये SEBC ही कॅटेगिरी येत नाही.
त्यामुळे नीट चा अर्ज भरताना तुम्हाला SEBC ही कॅटेगरी दिसणार नाही.
त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नीट चा अर्ज कोणत्या कॅटेगिरीतून भरावा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात येतो. मराठा समाजातील विद्यार्थी केंद्रामध्ये आर्थिक आरक्षणाचा (EWS) फायदा घेऊ शकतात. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे पालक जर केंद्राच्या आर्थिक आरक्षणाचे (Central EWS) निकष पूर्ण करत असतील तर त्यांना केंद्राचे आर्थिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (Central EWS) मिळू शकते.हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले तर ते नीट चा अर्ज EWS या कॅटेगिरी मधून भरू शकतात.
मराठा समाजातील विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगिरीतून अर्ज करून मराठा आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात.
आपण नीट चा अर्ज भरताना जी कॅटेगिरी निवडतो त्याचा उपयोग मुख्यत्वे केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रिया जसे की AIIMS/JIPMER/15 % all India quota यासाठी उपयोग होतो.
थोडक्यात सारांश, मराठा समाजातील विद्यार्थी नीट चा फॉर्म भरताना EWS कॅटेगिरी मधून भरू शकतात आणि नीट चा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी SEBC या कॅटेगिरीचा फायदा नंतर घेऊ शकतात.
वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी कोणत्या परिक्षा महत्वाच्या आहेत ?
List Of Various Courses Offered Through NEET UG 2024
जानेवारी ते मे हा 5 महिन्याचा कालावधी हा वेगवेगळ्या परीक्षेचे वेळापत्रक तसेच वेगवेगळ्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी online रेजिस्ट्रेशन चा काळ आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्रात आपले career करण्याचा निर्णय घेताना दिसतात.
वैद्यकीय क्षेत्रात Career करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी च्या बोर्ड च्या परीक्षेबरोबरच अन्य Entrance Test देणे सुद्धा बंधनकारक आहे.
महाराष्ट्र राज्यापुरते सांगायचे झाल्यास महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात मेडिकल फिल्ड मध्ये प्रवेश घ्यायचा झाल्यास 2 प्रकारच्या Entrance Test अत्यंत महत्वाच्या आहेत.
1) NEET ( National Eligibility-cum-Entrance Test)
ही देशपातळीवर होणारी सर्वात महत्वाची परिक्षा आहे. या परीक्षेच्या मार्क्स च्या आधारावर महाराष्ट्र राज्यात खालील Courses ला विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.
ही Exam National Testing Agency (NTA) द्वारे केंद्र शासनामार्फत घेतली जाते.
Following are the NEET course details:
1) MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)
2) BDS (Bachelor of Dental Surgery)
3) BHMS (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery)
4) BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery)
5) BUMS (Bachelor of Unani Medicine and Surgery)
6) BSMS (Bachelor of Siddha Medicine and Surgery)
The following list provides the list of Paramedical courses under NEET:
7) Bachelor of Naturopathy and Yoga Sciences (BNYS)
8) Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry (BVSc and AH)
9) Bachelor of Physiotherapy (BPT)
10) Bachelor of Occupational Therapy (BOTh)
11) Bachelor of Audiology, Speech and Language Pathology (BASLP)
12) Bachelor of Prosthetics and Orthotics (BP & O)
2) CET Exam (Common Entrance Test With PCB Group)
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 2 महत्वाच्या Courses साठी 2 वेगवेगळ्या CET विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे.
ही Exam ही Maharashtra CET Cell या राज्य शासनाच्या संस्थे मार्फत घेण्यात येते.
1) PCB CET (For Pharmacy )-
जर विद्यार्थ्यांला बारावी नंतर B. Pharm किंवा Pharm D साठी प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यानी ही CET द्यावी.
2) Bsc Nursing CET-
2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे प्रवेश हे नीट परीक्षेच्या आधारावरच व्हायचे परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे 2023 पासून राज्यात Bsc Nursing CET ही लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात Bsc Nursing ला प्रवेश घ्यायचा असेल तर Bsc Nursing साठी घेण्यात येणारी स्वतंत्र CET परिक्षा देणे बंधनकारक आहे.
NEET 2024 आणि CET 2024 या दोन्ही Exam चे स्वरूप आपण पुढील लेखात पाहूयात.
अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण Updates साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या Whats App Channel ला follow करा.
सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार Grace मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे Grace मार्क्स काढून घेऊन 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा NEET UG परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती.
23/06/2024 रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी पुन्हा RE NEET देण्याचा निर्णय घेऊन परीक्षा दिली.
आता त्यांचा Result जाहीर करण्यात आलेला आहे. या मुलांच्या Result मुळे बाकी विद्यार्थ्यांच्या रँक मध्ये बदल होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला result पुन्हा डाउनलोड करून घ्यावा.