महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्यात खालील प्रमाणे MBBS कॉलेज सध्याच्या घडीला आहेत.
1) GOVERNMENT MBBS COLLEGES (41) 2) PVT/SEMI GOVERNMENT MBBS COLLEGES (23) 3)DEEMED MBBS COLLEGES (13) 4) AIIMS NAGPUR 5) AFMC PUNE
यापैकी राज्यातील Govt आणि Pvt/Semi Govt MBBS कॉलेज ची प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या CET CELL च्या वेबसाईट वरून State Quota नियमानुसार होतं असते.
गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्यमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातून जवळपास 2-3 लाख विद्यार्थी NEET UG ची तयारी करत असतात असा Data सांगतो.
महाराष्ट्र State Quota चा विचार केला तर State Quota अंतर्गत राज्यात एकूण 8161 एवढ्या MBBS च्या Seats 2024 सालच्या प्रवेश प्रक्रियेत होत्या आणि ह्या seat साठी जवळपास 55781 विद्यार्थ्यांनी Admission Application फॉर्म भरला होता. म्हणजेच 1 MBBS: 7 Students अशी स्पर्धा आहे.
परंतु राज्यात Category Reservation /Specialized Reservation/Minority Reservation असे आरक्षणाचे प्रकार आहेत व त्या अंतर्गत Seat राखीव आहेत.
राज्यातील कॅटेगरी नुसार MBBS साठीची स्पर्धा NEET UG 2024 State Quota Counselling Data आधारे खालील pdf मध्ये पाहता येईल.
2025 मधील महाराष्ट्र राज्यातील Admission प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या Exam महाराष्ट्र CET CELL मार्फत आणि Health Science Courses (MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/Physiotheraphy/Veterinary) च्या प्रवेशासाठी देश पातळीवर घेण्यात येणाऱी NEET Exam अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील संपूर्ण विध्यार्थी सध्या अभ्यासात मग्न आहेत तर बहुतांश पालक कागदपत्रांची तयारी (Documents Preparation ) करीत आहेत.
महाराष्ट्र राज्यात Admission Process दरम्यान विध्यार्थ्यांच्या कागदपत्राबरोबरच काही Condition मध्ये पालकांचे पण documents आवश्यक आहेत . अशा कोणत्या कोणत्या परिस्तिथी आणि Reservations आहेत जिथे Admission साठी पालकांच्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते विस्तृत पाहू.
A) DEFENCE कोटा –
महाराष्ट्र राज्यातील MBBS/BDS/BAMS इ. Courses साठी ज्या विद्यार्थ्यांचे पालक Defence मध्ये service देत आहेत किंवा Defence मधून निवृत्त झाले आहेत अशा विध्यार्थ्यांसाठी Defence कोट्यामधून काही सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत. त्या सीट्स चे फायदे घेण्यासाठी विध्यार्थ्यांच्या पालकांचे दोन documents महत्वाचे आहेत जे Admission process साठी आवश्यक आहेत.
B) डोंगरी आदिवास आरक्षण (Hilly Area Reservation )-
महाराष्ट्र राज्यातील काही विभाग राज्य शासनाकडून डोंगरी विभाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागातील विध्यार्थ्यांसाठी राज्यातील Govt MBBS महाविद्यालयात काही सीट्स राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या सीट्स चे फायदे घेण्यासाठी विध्यार्थ्यांना खालील documents ची आवश्यकता आहे.
1) विध्यार्थ्याचे डोंगरी प्रमाणपत्र (HILLY AREA CERTIFICATE )
2) विध्यार्थ्याचे Domacile (STUDENT DOMACILE) 3) पालकाचे domacile (PARENTS DOMACILE ) 4) Certificate Proof Showing Candidates SSC and/or HSC form Hilly Village or Taluka of Parents Domicile.
जर विध्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यात Veterinary ला प्रवेश घ्यायचा असेल तर शेती असलेल्या पालकांच्या पाल्याला (student) महाराष्ट्र राज्यातील Veterinary महाविद्यालयात 6% आरक्षण आहे. त्या साठी पालकांना आपल्या तहसील कार्यालयात जाऊन खालील प्रकारचे शेती प्रमाणपत्र बनवून घेणे आवश्यक आहे.
( NOTE-सदर प्रमाणपत्र हे Admission Year 2023 चे आहे. 2025 ला वेगळा फॉरमॅट असू शकतो* )
D ) पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (INCOME CERTIFICATE OF PARENTS)-
विद्यार्थ्याचे वडील (पालक) जर राज्य शासनाचे कर्मचारी असतील तर त्यांनी आपले service प्रमाणपत्र Additional Documents म्हणून काढून ठेवायला हरकत नाही.
F) BANK ACCOUNT-
विध्यार्थी किंवा पालकांचे कोणत्याही Nationalize bank मध्ये account असावे.
G) PARENTS EMAIL AND MOBILE NUMBER-
कोणताही Admission application फॉर्म भरत असताना विध्यार्थ्यांच्या mobile number तसेच ई-मेल id बरोबरच Additional mail id आणि Additional मोबाईल नंबर द्यावा लागतो त्यामुळे पालकांनी पण आपला Active मोबाईल नंबर आणि Email Id नसेल तर बनवून ठेवावा.